अमेरिकन्स आणि आपण : पत्रकार हेमंत जोशी

अमेरिकन्स आणि आपण : पत्रकार हेमंत जोशी 

जे जे म्हणून चांगले आहे पाश्चिमात्यांचे अनुकरण करणे वावगे नाही पण जे जे आपले सर्वोत्कृष्ट आहे ते ते सोडून त्यांचे वाईट तेवढे घेणे नक्की चुकीचे. त्यांना देखील हिंदूंचे जे चांगले आहे ते उशिरा कळले यावेळी मला ते अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणावर जाणवले. योगासने आणि भारतीय शाकाहार याकडे अमेरिकन्स झुकलेले दिसले. जिकडे नजर टाकावी तिकडे योगासनांचा प्रभाव, उर भरून आले. बाबा रामदेव आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या प्रभावाखाली अमेरिकन्स झुकल्याचे त्यांच्या बोलण्यातून तसे जाणवले. मी तर नेहमीच सांगत आलोय, लबाड भामट्या लुटारू बुवा बाबांना डोक्यावर घेतल्यापेक्षा जणू आधुनिक परमेश्वरी अवतार रामदेव बाबा केव्हाही या देशाचे, आपले भले करणारा, अशांना पुजण्यास किंवा त्यांचे अनुकरण केव्हाही फायद्याचे ठरणारे….

न्यू जर्सीला एका भारतीय मित्राकडे जेवायला गेलो. त्याचा स्वतःचा उत्तम व्यवसाय, वास्तविक एकुलत्या एक मुलाने तो सांभाळावा त्या दाम्पत्याची इच्छा पण अमेरिकेत वाढलेली मुले स्वतंत्र विचारांची असतात. मुलगा ऐकायला तयार नाही, तो फुटकळ नोकरी करतो, चाळिशीला आलाय पण लग्न करायला तयार नाही, गेल्या तीन चार वर्षांपासून गोऱ्या मैत्रिणीसंगे लग्न न करता घरातच तळ ठोकून आहे. आमचे छान जमले पटले तर दोन तीन वर्षांनी लग्न करू, मूल तर त्या दोघांनाही नको आहे, दोघेही ड्रग्स च्या अमलाखाली, अनेक घरातून हे असेच बेधुंद वागणे, मुलाच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता सतत जाणवत होती. हेच आता आपल्याकडे सर्हास घडायला लागलेले आहे. ज्यांच्या घरी काळा हरामाचा पैसा मोठ्या प्रमाणावर येतो आहे असे एकही कुटुंब नाही जेथे मुले आणि मायबाप देखील संस्कारांना धरून आहेत…


मुले अतिशय खुबीने आईवडिलांच्या वाईट सवयी आत्मसात करीत असतात. मायबापांना वाटते कि आपले चोरून व्यसनाधीन होणे मुलांच्या लक्षात येत नाही पण हि पिढी अनेक पटींनी चतुर हुशार आहे, काही वर्षांनी अशा संस्कारात वाढलेली मुले बिघडलेल्या माय बापाच्या कितीतरी पटीने पुढे निघून जातात म्हणून पाश्चिमात्यांचे पेज थ्री अनुकरण हि आता आपल्या समाजाला लागलेली मोठी कीड आहे. मी तर आगाऊपणाने असे म्हणेन कि फडणवीसांनी जसे शाळेतून मराठी सक्तीचे केले तसे त्यांनी संघशाखेसारखे प्रत्येक शाळेतून असे काहीतरी घडवून आणावे जेणेकरून संघ शाखेवर केल्या जाणारे उत्तमोत्तम हिंदू संस्कार मुलांच्या, शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर होतील, केल्या जातील. इतर धर्मात देखील उत्तम कसे वागावे सांगितले आहेच पण कुराणातले अत्युत्तम विचार बाजूला ठेवून नको ते हिंसक पाकिस्थानी वागणे काही मुसलमानांच्या डोक्यात शिरते तेव्हा मात्र फार वाईट वाटते. मला खात्री आहे जसे हिंदू नसलेल्यांनी देखील म्हणजे थेट काही मुस्लिमांनी देखील जसे योगासने गरजेचे मानले तसे संघ संस्कार देखील त्यांच्याही मुलांवर व्हावेत असे त्यांनाही एक दिवस नक्की वाटेल…

www.vikrantjoshi.com

अलीकडे शरद पवारांनी संघाचे केलेले समर्थन, बहुतेकांनी ते मोठ्या थट्टेने घेतले जे नक्की रुचण्यासारखे नव्हते. विशेषतः पवारांच्या त्या वाक्यांवर संघ आणि भाजपा समर्थकांनीच अधिक तीव्र खालच्या पातळीवर येऊन थट्टा केली म्हणजे पवारांचे कौतुक स्वागत करायचे सोडून, आता कशी जिरली, पद्धतीने तोंडे वाकडी करून ज्या मंडळींनी पवारांवर तोंडसुख घेतले ते नालायक आहेत होते म्हणणे अधिक योग्य ठरेल. शेवटी मोठ्या प्रमाणावर आलेला काळा पैसा त्यातून घडणारे घडलेले दुष्परिणाम, पवारांनी स्वतः त्यांच्या कदाचित घराण्यात किंवा काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्यांच्या खानदानात जवळून अनुभवले बघितले म्हणून त्यांनाही हे कुठेतरी वाटले कि उत्तम हिंदू संस्कारापासून दूर गेले तर जे घडते ते नक्की वाईट असते. आणखी एक अतिशय महत्वाचे सांगतो कि संघात किंवा संघाशी संबंधित क्षेत्रात पक्षात काम करणारे जर मुंडे महाजन पद्धतीने वागत गेलेत तर केवळ उशाशी संघ संस्कृती ठेवून भागत नसते, विचार आचरणातही आणावे लागतात….

तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *