कोण कसे : तावडे असे: पत्रकार हेमंत जोशी

कोण कसे : तावडे असे: पत्रकार हेमंत जोशी 

मित्रहो, आंधळं प्रेम म्हणजे काय…? 

उत्तर सोप्प आहे, 

ती आपली होणार नाही हे 

ठाऊक असूनही, 

फेसबुकवरील तिच्या डीपी कडे 

भिक्कारयासारखे बघणे म्हणजे 

आंधळं प्रेम….!! 

नेत्यांच्या, मंत्र्यांच्या बाबतीतही तेच, भेटणाऱ्याने फक्त ताटकळत राहायचे, मंत्र्याकडे एकटक बघत राहायचे भेटीसाठी आसुसले व्हायचे याला म्हणतात जनतेचे एकतर्फी प्रेम पण ते प्रेम फारकाळ टिकत नाही, एकदा का जनतेने पाठ फिरवली कि जनतेचे मन हे सनी देओलच्या ढ़ाई किलो हातासारखे असते म्हणजे पुढारी पुन्हा आयुष्यातून उठत नाही, सार्वजनिक जीवनातून उठ जाता है…

जे जनतेच्या मनातले ओळखतात, जे सामान्य माणसात रमतात, त्यांना प्रेमाने जवळ घेऊन विचारपूस करतात, शक्य असेल ती मदत करतात, आज या उद्या या परवा बघू जमले तर करतो शक्य असेल तर नक्की करतो अशी बीनभरवशाची भाषा वापरून भेटणाऱ्या लोकांना हाती पोकळ वचनांचे लॉलीपॉप न देता खरीखुरी मदत करतात ते नक्की आयुष्यातली अनेक वर्षे नेतृत्व नेता म्हणून मोठे होतात, त्यांच्यातलाच एक 

म्हणजे राज्याचे शालेय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण क्रीडा आणि युवक कल्याण औकाफ तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे. त्यांना मी मासिक पाळी जाण्यापूर्वी म्हणजे उशीर लग्न झालेल्या मुलीची उपमा देतो कारण तावडे नेते म्हणून फॉर्म मध्ये आले आणि २००० साली युतीचे राज्य गेले त्यामुळे तावडे यांना मंत्री होण्यासाठी पुढली तब्बल १५ वर्षे वाट बघावी लागली, ते दिसतात तेवढे तरुण पण नेते म्हणून भाजपच्या सिनियर रांगेतले तावडे आहेत, मध्यंतरीच्या काळात युती सत्तेत नसल्याने तशी मंत्री होण्याची संधी तावडेंना उशिरा चालून आलेली आहे पण संधीचे बऱ्यापैकी सोने करण्यात ते नक्कीच यशस्वी ठरले आहे, एकाच वेळी अनेक वाद्ये वाजविणाऱ्या वादकासारखे तावडे, म्हणजे त्यांना त्यांचा बोरिवली विधान सभा मतदारसंघ संभाळायचा असतो त्याचवेळी मी परफेक्ट मंत्री कसा हे देखील केवळ दिखाव्यातून नव्हे तर मंत्रालयात राबून आणि जनतेत रमून दाखवायचे असते, महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे कोकणचे, मुंबईचे, कधी कधी उभ्या राज्याचेही लोकनेतृत्व म्हणून बघितल्या जाते, त्यातही त्यांना कमी आहोत हे दाखवायचे नसते प्लस भाजपच्या अंतर्गत संघटना घडामोडीत देखील त्यांना कायम सहभाग करून घेतल्या जाते, आणि तावडे हे सारे एन्जॉय करतांना दिसतात, ते थकलेभागले, गायब झाले असे कधी घडत नाही, नेतृत्व म्हणजे त्यांना चढलेली नशा, लहान वयापासून जडलेले हे सामाजिक व्यसन, आता त्यांना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही या जडलेल्या व्यसनातुन बाहेर काढणे अशक्य, उद्या अगदी एखादी अभिनेत्री जरी डोळा मारून म्हणाली, सोडा हे सारे आणि चला आपण कुठेतरी दूर निघून जाऊ, तरीही शक्य नाही. त्यांना समाजकारणाच्या आणि राजकारणाच्या व्यसनाने जखडले आहे, हे असे व्यसन अनेकांनी लावून घ्यावे, ये दाग अच्छे लगते है…

आक्रमक केव्हा व्हायचे, चार पावले मागे केव्हा सरकायचे, कुठे शांत बसायचे, समोरच्याला कसे शांत करायचे, प्रसंगी विरोध कसा करायचा किंवा पुढल्या क्षणी एखाद्या कट्टर विरोधकाला देखील कसे आपलेसे करायचे, बोलीभाषेतून एखाद्याला क्षणार्धात कसे जिंकायचे हे तावडे यांना छान जमते त्यामुळे असे नेते राजकारणात टिकून राहतात, सुरुवातीला वाटले होते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे विनोद तावडे पुढे मंत्री झाले आणि फारशी महत्वाची खाती देखील त्यांच्याकडे आली नाहीत, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ खाते विनोद तावडे यांच्याकडे देणे म्हणजे बकरा बळी देतांना पूजेला दादासाहेब धर्माधिकारींना किंवा पांडुरंगशास्त्री आठवले यांना बोलाविण्यासारखे किंवा मुलबाळ न होणाऱ्या स्त्रीला सहकार्य करण्यासाठी प्रसंगी वीर्य दान करण्यासाठी करण कपूरला पाचारण करण्यासारखे, पण तावडे यांनी तेथेही, कमी महत्वाच्या खात्यांमध्येही मी कमी नाही, खाते मग ते कोणतेही असो, त्यातही मी वेगळी छाप मारू शकतो, त्यांच्या पक्ष श्रेष्ठींना दाखवून दिले, विशेष म्हणजे जे खडसे यांचे चुकले ती चूक तावडे यांनी केली नाही, चाणाक्ष तावडे यांना आपले जुने सहकारी देवेंद्र फडणवीसांची राजकीय ताकद मुख्यमंत्री म्हणून कशी मोठी ठरू शकते, माहित होते, त्यांनी ते ताडले होते त्यातून तावडेंनी फडणवीस यांच्याशी कुठलीही कटुता अगदी सुरुवातीपासून न ठेवता आवश्यक तो सन्मान त्यांना दिला, फायदा नक्की झाला, फडणवीस आणि तावडे यांचे हे मधुर संबंध, तावडे आपली राजकीय छाप त्यातून मारून मोकळे झाले, त्यांचे नेतृत्व मंत्री झाल्यावर मग अधिकच बहरले….

मला वाटते खूप वर्षानंतर म्हणजे मधुकरराव चौधरीनंतर या राज्याला तावडेंच्या रूपात असा शिक्षण मंत्री मिळाला कि तो या राज्यातल्या प्रत्येक विद्यार्थाला आपला वाटतो एवढे तावडे विद्यार्थीमय होतात, सतत या ना त्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतात आणि हे असे संपर्कात राहणे त्यांना अजिबात नवीन नाही, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आधी पूर्णवेळ कार्यकर्ते नंतर प्रमोट होऊन विद्यार्थ्यांचे नेते म्हणून ते तसेही सतत विद्यार्थ्यांच्या गराड्यात पडलेले, त्यांच्या विधान सभा परिघातही तेच, स्टुडंट बेस प्रोग्रॅम राबविण्यावर त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सतत कटाक्ष असतो, तावडेंच्या या अशा बिद्यार्थिप्रिय नेतृत्वातून ते आपोआप घराघरात पोहोचतात, ज्या त्या विद्यार्थ्यांच्या घरातले ते चर्चेचा, कौतुकाचा विषय ठरतात, तावडें यांची त्यातून या राज्यातली लोकप्रियता वाढत गेली आहे. राजयातल्या मराठा नेत्यांनी कसे लोकप्रिय व्हावे ठरावे हे विदर्भ, मराठवाडा, खान्देश किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा नेत्यांनी कायम, नेहमी सतत कोकणातल्या या अशा मराठा नेत्यांकडून शिकत जावे मग ते कधी नारायण राणे असतील तर कधी विनोद तावडे किंवा आशिष शेलार….

अपूर्ण :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *