पाजी बुवाबाजी : पत्रकार हेमंत जोशी

पाजी बुवाबाजी : पत्रकार हेमंत जोशी 

अलीकडे भाजपातले एक उद्योगपती आणि नामवंत नेते महत्वाचे म्हणजे मनाने दिलदार आणि तोंडाने फटकळ असलेले हे नेते इंदोरला गेले होते, जाण्यापूर्वी त्यांनी मला विचारले महाराजांना पहिल्यांदाच भेटतोय, पायावर काय ठेवू, मी म्हणालो पैसे बाटली आणि सिगारेट्स त्यांनी तेच केले असावे कारण दोन तीन दिवस त्यांचे महाराजांकडून जंगी स्वागत झाले. हे असे श्रीमंत तावडीत सापडलेत कि त्यांना महाराजांच्या बंगल्यावर महाराजांच्या मांडीला मांडी लावून जेवायलाही मिळते. तेथून परतल्यावर त्यांचा मला फोन आला, ते काही बोलण्याच्या आधीच मी त्यांना म्हणालो, त्या दोन तीन दिवसात महाराज आणि त्यांचे शिष्य तुमच्याशी काय काय बोलले असतील आणि कसे वागले असतील आधी मी ते सांगतो, मी ते त्यांना सांगितले आणि सांगितल्यानंतर, हुबेहूब…हुबेहूब…असे म्हणून ते पलीकडून फोनवर अक्षरश: किंचाळलेच….


सेम किस्सा काही वर्षांपूर्वीचा. माझे अतिशय जवळचे मित्र, ते एक सरकारी अधिकारी, मला त्यांनी तेच विचारले होते, महाराजांना भेटायला जातोय, काय नेता येईल, म्हणालो,घरातल्या तारण्या मुलींना तुमच्या सुंदर दिसणाऱ्या बायकोला घेऊन जा कि…त्यांनी माझे बोलणे पॉझेटिव्ह घेतले, आणि दोन तीन दिवसांनी मला भेटायला आले, माझा हात हातात घेऊन त्यांनी डोळ्यातून पाणी काढले….चौकशी केली आणि तुम्ही वाचवलेत म्हणून तुमचे आभार मानायला आलो आहे. माझा एक मित्र मुंबईतल्या अनिरुद्ध बापूंचा भक्त होता, त्यानेही एकदा तेच विचारले, त्यांच्या पायावर काय ठेवू, म्हटले सिगारेट्स ठेव कि, त्याने तेच त्यानंतर अनेकदा केले, पुढे त्याची गणना जवळच्या भक्तांमध्ये झाली…


भाजपचा इंदोरला महाराजांना भेटायला गेलेला तो मोठा उद्योगपती विचारता झाला, तुम्ही हे कसे ओळखलंत कि नेमके काय घडले किंवा नेमके त्यांच्या पायावर ठेवण्यासाठी काय न्यायला हवे, त्यावर मी म्हणालो, तुमच्यासारखे उल्लू बनलेले बहुतेक, बहुसंख्य स्त्री पुरुष महाराजांच्या दुर्दैवाने आणि तुमच्या साऱ्यांच्या सुदैवाने माझ्या चांगले ओळखीचे आहे, ते जे सारे सांगतात तेच तुमच्याही बाबतीत हुबेहूब घडणारे असते म्हणून मला सांगणे किंवा म्हणाल तर सावध करणे सोपे जाते. जगातली महागडी ३५००० रुपयांची ब्लू लेबल त्यांना किंवा त्यांच्या एखाद्या जवळच्या भक्ताला भेट दिल्यानंतर तुम्ही लगेच पुढल्या क्षणी पाठच्या रांगेतून थेट महाराजांच्या ढुंगणाला ढुंगण लावून बसणे, हे असे नेहमीच तेथे घडते. म्हणजे मी येथे मुंबईत बसून सांगू शकतो कोणत्या भक्ताला तेथे कसे वागवले जाणार आहे ते…


जाऊ द्या, वाचक मित्रांनो, चांगली पुस्तके वाचा, कायम सकारात्मक बिचार डोक्यात ठेवून, वाटचाल करा, म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या घरातल्या तारण्या स्त्रियांना नको ते संकट झेलावे लागणार नाही. ज्या विषय वासनेकडे किंवा काटकटींमुळे आपले वाटोळे होते आहे, त्या त्या विषयांच्या मुळाशी जाऊन त्यावर मार्ग शोधणे गरजेचे आहे, भलत्या सलत्या नको त्या नरेंद्र महाराजांसारख्या बुवांच्या पायावर डोके ठेवून का म्हणून आपण आपली संकटे अधिक गडद करवून घेतो…चांगले उत्तम मार्ग शोधावे, ह्या असल्या बुवा महाराजांपासून कायम दूर राहावे आणि घरातल्यानाही दूर राहण्यास सांगावे. ईश्वराचे नामस्मरण आणि दिवसभरतले एखादे समाजपयोगी काम, तुमचे नक्की भले होते. मित्रहो, बुवाबाकडे, जे विपुल धानाचे मालक आहेत ते ब्राम्हण नसले तरी पूज्य असतात कारण त्यांचे धन बोलते, प्रसंगी फाल्तुक बुवांचे शिष्य देखील महाराजांकडे दुर्लक्ष करून अशा धनाढ्यांकडे अधिक लक्ष देऊन मोकळे होतात. आणि हो, काही भक्त अगदी चंद्रप्रमाणे निर्मल असलेत तरी ते श्रीमंत आणि सत्तेतले नसल्याने त्यांचा सर्वांदेखत तिरस्कार केल्या जातो. असे भक्त बुवांच्या दर्शनासाठी पुढे जरी आलेत तरी त्यांना अक्षरश: ढकलून मागे केल्या जाते….


भय्यू महाराजांच्या ‘ अलिकडल्या’ लग्नाची नेमकी तारीख आठवत असेल तर मला लगेच कळवावे कारण एक गोड बातमी आहे, त्यांना ‘ अलिकडल्या ‘ पत्नीपासून कन्यारत्न प्राप्त झाले आहे आणि हे अपत्य म्हणे चांगले दोन अडीच महिन्यांचे झाले आहे. महाराजांचे या वयातले हे देशासाठीचे योगदान, मुलगी झाली ना…त्यांचे मनापासून अभिनंदन…पहिल्या कन्येच्या पाठीवर म्हणजे तब्बल १५ वर्षानंतर महाराजांना अधिकृतपणे अपत्य झाले, करावे तेवढे कौतुक कमी पण ज्या स्त्रीने, हा मुलगा मला महाराजांपासून झालेला आहे, इंदोरमध्ये थेट जाहीर आरोप केले होते, त्या स्त्रीचे आणि तिच्या त्या मुलाचे पुढे काय झाले, कोणी इंदोर मध्ये गेलेच तर त्यांनी महाराजांच्या आश्रमाशेजारी त्यांचे जे मावशे नामें शरद पवार राहायला आहेत, त्यांना अवश्य विचारून यावे, आल्यानंतर माझ्या कानावर घालावे. म्हणजे त्या स्त्रीचा ठावठिकाणा घ्या, त्यावर नेमके लिहिता येईल कारण त्या सामान्य स्त्रीला त्यानंतर मनोरुग्ण ठरविण्यात आले होते, जे आसाराम बापूंच्या आश्रमात वारंवार घडत होते ते तसे त्या स्त्रीचे पुढे काय झाले, सर्वांना कळणे गरजेचे आहे कारण तिने थेट परमेश्वरावर, परमेश्वरी अवतारावर म्हणजे भय्यू महाराजांवर आरोप केले होते, ज्यांच्या पायावर आपले पंतप्रधान आपले मोहन भागवत आपले नितीन गडकरी आपले राष्ट्रपती तसेच वळसे पाटलांसारखे कित्येक कुटुंब, अनेक दिग्गज डोके ठेवून मोकळे झालेले आहेत…


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *