अण्णा सामंत : भाग २: पत्रकार हेमंत जोशी


अण्णा सामंत : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 

माझ्या आवडत्या सिनेमांपैकी राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांचा अवतार हा सिनेमा. पोटची मुले या जोडप्याला नोव्हेअर करतात त्यानंतर त्या वृद्धवस्थेतही राजेश खन्ना स्वतःच्या व्यवसायाचे मोठे जाळे उभे करून मुलांना अद्दल घडवितो, आणखी एक आवडता सिनेमा अमिताभ आणि हेमाचा बागबान त्याचेही कथानक अवतार शी मिळते जुळते. अण्णा उर्फ रवींद्र द्वारकानाथ सामंत  फेब्रुवारी १७ तारखेला वयाची ७५ वी पार करताहेत, अण्णा यांचे असेही नाही कि पोटची  मुले नालायक निघाली कि त्यांना विचारात नाहीत. व्यावसायिक किरण आणि मंत्री उदय दोघेही कर्तबगार हुशार मेहनती गुणवान बुद्धिमान तडफदार दूरदर्शी थोडक्यात सर्वगुणसंपन्न तरीही अण्णा सामंत अवतारच्या राजेश खन्नाची किंवा बागबान च्या अमिताभ बच्चन ची पदोपदी क्षणोक्षणी आठवण  करून देतात किंबहुना प्रत्यक्षातले अवतार किंवा बागबान म्हणजे अण्णा सामंत. कवडीची आज त्यांना काम करण्याची गरज नाही, उठावे आणि सरळ या जोडप्याने तीर्थयात्रेला निघून जावे पण तसे या जोडप्याच्या मनातही येत नाही, अण्णा म्हणतात त्यापेक्षा मी येथे बसून जी लोकपूजा लोकसेवा करतो ते कोणत्याही तीर्थयात्रेपेक्षा कितीतरी मोठे असे काम आहे….

वयाच्या साठीनंतर या वृद्ध तरुणाने व्यवसायातली आणखी हौस भागवून घेतली आहे. किरण व उदय उत्तम व्यवसाय सांभाळू लागल्यानंतर अण्णांनी आपले लक्ष थेट शेतीकडे वळविले आज त्या अवतार बागबान सारखे हेच अण्णा अख्ख्या कोकणातले नामवंत यशस्वी उत्तम शेतकरी म्हणून नावारूपाला आले आहेत. आमच्या विदर्भातल्या अनेक आळशी शेतकऱ्यांनी अण्णा सामंतांच्या पायाचे तीर्थ पिऊन मोकळे व्हावे. अण्णांना मुलांच्या पैशांची आजपर्यंत गरज पडलेली नाही पण उदय आणि किरण दरक्षणी अण्णांचा सल्ला घेतल्याशिवाय त्यांचा कोणत्याही निर्णयात ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय कधीही पुढे जात नाहीत. अलीकडे उद्योगपती किरण सामंत यांच्या पत्नी वर्षा सामंत म्हणाल्या, जेव्हा मी आदित्यच्या वेळी गर्भार होते तेव्हा माझ्या मनात हेच कायम असायचे कि माझे जन्माला येणारे मूल सासरे अण्णा सामंतांची कॉपी असावी, म्हणजे दुसऱ्या घरातून आलेल्या सुनेला देखील हेच वाटले कि तिचे मूल दुसरे अण्णा सामंत असावे निघावे एवढे यशस्वी आणि कर्तबगार अण्णांचे आयुष्यमान परिपूर्ण भरलेले आहे…


www.vikrantjoshi.com

उच्च व तंत्र हिक्षण मंत्री उदय सामंत उत्तम राजकारणी आहेत यशस्वी व्यावसायिक आहेत त्यांना अभिनय येत, गाणे येते ते गावातले महाविद्यालयातले नावाजलेले खेळाडू आहेत पण उदय यांचा लिखाणाचा लेखणीचा संबंध नाही गंध नाही. उदय यांनी लिखाणात उतरणे म्हणजे उदय तानपाठक यांनी अभिनयात उतारण्यासारखे म्हणावे लागेल किंवा न हसणाऱ्या जयंत पाटलांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये रोल मिळविल्यासारखे ते ठरेल पण वडिलांच्या कर्तबगारीवर फिदा होऊन उदय महाशय पुढल्या वर्षभरात, बाप हा बाप असतो, हे बापावर म्हणजे रवींद्र उर्फ अण्णा सामंत यांच्यावर पुस्तक लिहून काढून मोकळे होताहेत. म्हणजे उदय आता आमच्यासारख्या लेखकांवर पत्रकारांवर उपासमारीची वेळ आणून ठेवतात कि काय असे आता अनेकांना वाटू लागलेले आहे कारण उदय ज्या क्षेत्रात उतरतात बाप अण्णांसारखे पहिले स्थान मिळवून मोकळे होतात. त्यामुळे त्यांनी लिहिलेले वडिलांवरचे आयुष्यकथन उत्कृष्ट पुस्तकांपैकी एक असेल हे सांगायला येथे कोणत्याही भविष्य कथन करणाऱ्याची गरज नाही आवश्यकता नाही. उदय सामंतांचे पार वृद्धत्वाकडे झुकलेले आईवडील आजही स्वतःला वृद्ध मानायला तयार नाहीत. अण्णा म्हणतात, मनात कायम सकारात्मक विचार आणले ठेवले म्हणजे संकटातही यश मिळते आणि आयुष्यात सर्व काही चांगले घडते. अण्णा सामंत प्रचंड यशस्वी आहेत, दोन्ही कर्तबगार मुलांच्या आजही कितीतरी पुढे आहेत…

क्रमश: हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *