विषामुळे विनाशाकडे : पत्रकार हेमंत जोशी


विषामुळे विनाशाकडे : पत्रकार हेमंत जोशी 
जुहू चौपाटी वर सकाळी फिरतांना एक दिवस रेतीवर फतकल मारून बसलेल्या एका वयस्क बाईकडे सहज लक्ष गेले, बायकांकडे निरखून बघण्याची जुनी सवय खोड माझी, निरखून बघितले, लक्षात आले अरे हि तर कधीकाळी आपली अत्यंत आवडती असलेली अभिनेत्री लीना चंदावरकर, तेवढ्यात नेहमी वॉक घेणारा अमित कुमार पण दिसला…तसेही किशोर कुमार नंतर म्हणे किशोरची पत्नी लीना आणि मुलगा अमित धाकट्या सुमितचे जवळपास आई बाबाच होते, खरे खोटे देव जाणो, पण लज्जा सोडलेल्या हिंदी किंवा मराठी चित्रपट सृष्टीत असे कितीतरी लीना चंदावरकर, महेश भट्ट आहेत. या प्रसंगाची यासाठी आठवण झाली कि दोन तीन दिवसांपूर्वी मी आणि माझा एक जवळचा मित्र जुहूच्या मेरियट हॉटेलमध्ये फ्रेश ब्रेड् आणण्यास जात असतांना वाटेत लगेच रिया चक्रवर्तीची इमारत लागली, एकाचवेळी आम्ही दोघेही पटकन सेम वाक्य बोलून गेलो कि हीच ती रिया एवढी निर्ढावलेली असेल असे कधीही तिच्याकडे बघतांना वाटायचे नाही जेव्हा कि जुहूला सकाळी वॉक घेतांना अनेकदा आमच्या आसपास फिरतांना ती दिसायची, असायची. म्हणतात तेच सत्य आहे, स्त्रियांचे चरित्र आणि पुरुषांचे भाग्य काय असेल साक्षात देवाला देखील सांगता येत नाही… 

न्यायालयात रिया चक्रवर्तीची रिमांड मागितल्या गेली नाही थेट १४ दिवसांची न्यायालयीन कस्टडी मागण्यात आली. उद्या रियाला माफीची साक्षीदार म्हणून सोडल्या गेले तर मला त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही कारण देशातल्या राज्यातल्या मुंबईतल्या फार मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या ड्रग्स व्यवसायाची रियाने अनेक गुपिते फोडलेली आहेत त्यातून तिने ईडी, सीबीआय आणि नार्कोटीज या तिघांचेही काम सोपे करून सोडले आहे. राहिला प्रश्न रियाच्या तुरुंगात जाण्याचा, या तिन्ही केंद्रीय संस्थांनी, माझे असे थेट येथे सांगणे आहे कि त्यांनी तिला अटक करून तिचा जीव नक्की वाचवला आहे कारण जसे दिशा सुशांत आणि आणखी काही या दिवसात ज्या पद्धतीने खतम करण्यात आले, त्या बदमाशांच्या रडारवर शेवटचा दुवा रिया हीच उरलेली आहे, एकदा का रियाला खतम केले असते तर ड्रग माफिया आणि त्यांच्याशी संबंधित अनेक नेते, कदाचित काही मंत्री, बडे सरकारी अधिकारी आणि चित्रपट सृष्टीतले अरबाज, ऋत्तीक, शाहरुख सारख्या अनेकांचे फार मोठे संकट नक्की त्याक्षणी संपले असते. 

याठिकाणी अत्यंत अत्यंत महत्वाचा मुद्दा जो मलाही माहित आहे कि जे काही नेते अभिनेते कंगना राणावतला त्रास देताहेत, आव्हान करताहेत त्या नेत्यांनी अभिनेत्यांनी किंवा अन्य मंडळींनी एक बोट कंगना कडे दाखवतांना हेही नक्की तपासून घ्यायला हवे कि ते स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातले सदस्य ड्रग्सच्या आहारी गेले आहेत का ? कारण कंगना राणावतचे प्राप्त माहितीनुसार हे तर नक्की ठरलेले आहे कि ड्रग्स माफिया किंवा ड्रग्स घेणाऱ्या बड्या धेंडांची नावे तेही थेट पत्रकार पारिषद घेऊन ती जाहीर करणार आहे. विशेषतः पदावर असलेल्या किंवा नसलेल्या नेत्यांनी कंगना वर आरोप करतांना किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी त्यात सामील होतांना हे नक्की तपासून घ्यावे किंवा कुटुंबातील मुलांना भावांना मुलींना थोडक्यात कुटुंब सदस्यांना नक्की विचारून घ्यावे कि तुम्ही केवळ दारूच्या आहारी आहात कि तुम्हाला ड्रग्स घेण्याचे देखील व्यसन आहे का, अन्यथा उगाचच अनेकांचा कित्येकांचा राहुल महाजन होऊन नको ते बिंग फुटायचे. चुनायसेठ, जीनके अपने घर सिसेके हो वो दुसरे के घर पत्थर नही मारते!  माझा हे लिखाण, हा लेख राजकीय वर्तुळाशी सत्तेशी शासनाशी संबंधित असलेल्यांनी अवश्य अनेकदा वाचून नेमके काय करायचे आहे ते ठरवावे. मुंबई पुणे ठाणे नागपूर किंवा अन्य ठिकाणचे ड्रग्स घेणारे बडे मासे कोण याची जी यादी समोर येणार आहे त्यातले जवळपास निम्मे नावे तर माझ्याही जवळ आहेत. उगाच का मराठीत ती म्हण आहे कि दुसऱ्याकडे बोट दाखवतांना तीन बोटे आपल्याकडे असतात. अजूनही वेळ गेलेली नाही, उगाच उसने अवसान आणतांना आधी तुम्ही साऱ्यांनी अवश्य आपापली घरे आणि स्वतःला देखील तपासून घ्या, अन्यथा आरोप करणाऱ्यांचीच पळता भुई थोडी होईल. दिवंगत भय्यू महाराज आज जिवंत असते तर काही मंडळींना तर त्यांनीच सावध केले असते कि तुमची चड्डी फाटकी असतांना दुसऱ्याचे ढुंगण निरखून का बघता ? अर्थात महागुरु बालाजी तांबे यांनी देखील अशावेळी मौनव्रत सोडायला हरकत नाही. गप्प बसा, असे रागावून सांगायला हरकत नाही अनेकांचे तारणहार म्हणून… 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *