महाप्रतापी लोकप्रतिनिधी : पत्रकार हेमंत जोशी

महाप्रतापी लोकप्रतिनिधी : पत्रकार हेमंत जोशी 

एखाद्याच्या हातून चांगले काम घडले तर विरोधक देखील कौतूक करतात. अलीकडे ठाणे मुलुंड मधून म्हणजे कुठूनतरी मला एका पत्रकार मित्राचा फोन आला होता. त्याने माझ्याचबाबतीत घडलेला एक किस्सा सांगितलं. म्हणाला, एकदा आम्ही काही पत्रकार मित्र आणि तुमचे एक जवळचे नातेवाईक गप्पा मारत असतांना तुमचा विषय निघाल्यावर त्या नातेवाईकाने तुमच्याविषयी वाट्टेल ते आणि तसे वाईट वाईट आम्हाला सांगितले. नंतर तो निघून गेला नेमके तुम्ही आम्हाला दिसलात मग आम्ही अगदी ठरवून तुम्हाला बसवून घेतले आणि मुद्दाम त्या नातेवाईकाचा विषय काढताच पुढला अर्धा तास तुम्ही त्याचे कौतुक करून मोकळे झालात असे का? मी म्हणालो, त्यात विशेष ते काय, मी वाईट माणूस आहे म्हणून त्याने तसे सांगितले. माझे एखाद्याशी मनभेद मतभेद असू शकतात याचा अर्थ त्याचे गुण न सांगता मी एखाद्याविषयी विनाकारण वाईट बरळणे योग्य नाही. संघर्षातून मोठ्या कष्टातून एखादा नातेवाईक यशाचे शिखर गाठतो आणि मी वाईट हेतूने एखाद्याविषयी सांगायचे हे असे  वागणे बोलणे कधीही योग्य नसते. अलीकडे मी ठाणे ओवळा माजिवडा विधान सभा मतदारसंघातले कायमस्वरूपी निवडून येणाऱ्या आमदार प्रताप सरनाईक यांच्याविषयी चार चांगले वाक्यें लिहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या लिखाणावर मला एका मोठ्या भाजपा नेत्याचा फोन आला. ते म्हणाले, सरनाईकयांनी या कोरोना महामारीत त्यांच्या मतदसरसंघात जे काम केले आहे, एखाद्या आमदाराने जीवघेण्या संकटात मतदारांच्या पाठीशी कसे उभे राहायचे असते त्याचे प्रतापजी हे या राज्यातले सर्वोत्तम उत्तम असे उदाहरण आहे, माझा त्यांना सलाम…

www.vikrantjoshi.com

एखाद्या मंत्र्याची पहिली बायको थेट कशी सांताक्रूझला आणि दुसरी पुण्यात राहायला असते ते तसे हुबेहूब प्रताप सरनाईक यांच्या विधानसभा परिघाचे मतदारसंघाचे आहे म्हणजे त्यांच्या मतदारसंघातील एक भाग ठाण्यातील ओवळा माजिवडा आहे तर दुसरे टोक थेट मीरा भायंदर आहे थोडक्यात विस्कळीत असा हा मतदारसंघ असूनही कोरोना महामारीत केंद्राने आणि राज्याने जनतेसाठी ज्या योजना केवळ जाहीर केल्या किंवा बिचकत बिचकत कशातरी एकदाच्या सुरु केल्या वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या संपूर्ण योजना तेही स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून आमदार प्रताप सरनाईक यांनी सरकारी मदतीची अजिबात वाट न बघता त्यांच्या मतदारांसाठी राबविल्या अमलात आणल्या. म्हणजे तुम्ही राज्य किंवा केंद्र सरकारची मला कोणतीही योजना सांगा ती ती प्रत्येक योजना कोणत्याही शासकीय आर्थिक मदतीची वाट न पाहता सरनाईक राबवून मोकळे झाले. सरनाईक म्हणतात कोरोना महामारीचे संकट संपेपर्यंत माझे हे कार्य सुरूच राहणार आहे मग ते मतदसरसंघातल्या सोसायट्यांचे सॅनिटायझेशन असेल किंवा गरिबांना जेवण असेल, अन्नधान्य पुरवठा असेल किंवा मास्क पुरविण्याचे महत्वाचे काम असेल आणि महत्वाचे म्हणजे माझ्या विधानसभा मतदारसंघातली शिवसेनेची प्रत्येक  शाखा मी छोटेखानी इस्पितळात त्यांचे रूपांतर केले आहे आणि रांग लावून माझे मतदार या इस्पितळांचा लाभ घेताहेत. योग्य उपचार आणि मतदारांना उपाशीपोटी न राहू देणे याची मी शपथ  घेतली आहे, माझे सैनिक कार्यकर्ते दिवसरात्र राबून माझ्या मतदारांना चिंताविरहित ठेवण्याचे मोठे काम करताहेत….

आजकाल कंगाल लोकप्रतिनिधी अभावाने आढळतात बहुतेक लोकप्रतिनिधी नवश्रीमंत गडगंज श्रीमंत आहेत असतात पण नेमके मन मोठे असायला हवे आणि मतदारांचे भले करण्याची मानसिकता असायला हवी जी सरनाईक यांच्यासारखी अभावाने आढळते. दुर्दैवाने प्रताप सरनाईक महापराक्रमी नेते असूनही त्यांना कायम शिवसेनेत किंवा मातोश्रीवर महाभारतातल्या कर्णासारखी वागणूक मिळाली. सरनाईक नक्की या अशा कायमस्वरूपी सावत्र वागणुकीतून अस्वस्थ होत असावेत पण कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता ठाणे जिल्ह्यातली शिवसेना अधिकाधिक बळकट कारण्याचे काम ते करीत आले आहेत आणि ते तसेच नक्की कंटिन्यू ठेवतील, मला त्यांचा तो कष्टाळू स्वभाव माहित आहे, उद्धवजींना मात्र काही केल्या या बाळाच्या बाबतीत पाझर फुटत नाही, हे बाळ स्वतःशी आसवे गाळत तसेच दररोज झोपी जात असावे….

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *