आम्ही सारे ब्राम्हण : पत्रकार हेमंत जोशी

अलीकडे अनेक ब्राम्हण कुटुंबातील हे दृश्य, साध्या वरण भाताच्या जेवणाला आमच्यातले अनेक,म्हणजे आम्ही ब्राम्हण आपापल्या मुलांना पाठवतो आणि,दारू,मटणाच्या पार्टीला मात्र चेहऱ्यावर उगाचच गंभीर भाव आणून म्हणतो…

मलाच जावे लागेल, 

नाहीतर….

भाऊला राग येईल…..!! 

नेमके आम्ही ब्राम्हण कुठे कसे वाईट आणि कुठे किती चांगले,त्यावर तुम्हाला येथे सांगायचे आहे…तृप्ती देसाई हाजीआली दर्ग्यात घुसणार असल्याचे कळताच, सारे मुस्लिम एकवटले, मग तो समाजवादी अबू आझमी असो कि त्याच्या विरोधातला भायखळ्याचा आमदार, शिवसेनेचा हाजी अराफत असो कि अन्य कुठल्याही विचारांचा मुसलमान, सार्यांच्या तोंडून भाषा एकाच होती, आदेश मग ते कोणाचेहि येवोत, तृप्तीला आत जाऊ देणार नाही, आणि तिने जाण्याचा प्रयत्न केलाच तर तिला मारत मारत बाहेर काढू.आणि घडलेही तेच, जेव्हा तृप्ती तेथे गेली, दर्ग्याबाहेर अनेक मुसलमान त्यांच्या नेहमीच्या तयारीत होते म्हणजे काठ्या, चाकू, तलवारी हाती घेऊन तृप्तीच्या विरोधात आंदोलन करत होते, तिला त्यातून गाडीबाहेर पडण्याची देखील संधी मिळाली नाही. आणि मी हे जेव्हा केव्हा माहितीच्या अधिकारात मुंबईतल्या आयकर भवनात जातो, तिथल्या माझ्या उच्च अधिकारी असलेल्या मित्रांना हेच म्हणतो, हिंदूंच्या घरी तुम्ही रुबाबात धाडी घालता, भेंडी बाजार किंवा कुर्ल्यातल्या मुसलमानांच्या घरी कधी धाडी टाकल्या आहेत का, छोटा राजन अखेरीस शरण आला पण दाउद मसणात जाण्याची त्याची वेळ आलेली असली तरी भारतीयांच्या नाक्कावर टिच्चून तिकडे पाकिस्थानात अगदी उघड वावरतो आहे, मात्र येथे कौतुक त्या तृप्ती देसाईचे, तिने निदान हिम्मत तर दाखवली, दर्ग्यात घुसण्याची….

या जगात मी अगदी मनापासून दोन लोकांवर प्रेम करतो आणि येथे ते तुम्हाला अगदी उघड सांगतांना मला दडपण नाही किंवा मी संकुचित विचारांचा, असे जरी तुम्ही म्हणालात तरी चालेल. मी फक्त आणि फक्त या राज्यातल्या मराठी  माणसांवर अगदी मनापासून प्रेम करतो आणि मी जातपात मानत नसलो तरी मला माझ्या ब्राम्हण जातीचा अभिमान आहे आणि मला वाटते, प्रत्येकालाच आपल्या जातीचा अभिमान वाटतो. परवा मला कोणीतरी सांगितले, मुख्यमंत्र्यांचा तो शीलवंत आडनावाचा खाजगी सचिव आहे ना, तो तेथे बसून फक्त त्यांच्या बौद्ध समाजातून येणाऱ्या लोकांची कामे करतो, त्यावर मी म्हणालो, त्यात गैर ते कसले, शेवटी कायम अडचणीत असणार्या त्या ज्ञातीतल्या लोकांचे देखील कोणीतरी तारणहार हवेतच कि,फक्त तो इतरांना त्रास देत नाही, तेवढे बघा…मी ब्राम्हण आणि मराठी लोकांवर प्रेम करतो याचा अर्थ इतरांचा दुस्वास करतो, असे अजिबात नाही. या राज्यातल्या मराठींना अजय संचयनि सारखे भामटे शेटजी जर कायम लुटून खात असतील तर मात्र मी अगदी उघड मराठी माणसाची बाजू घेतो. मराठींना लुटून खाणार्या कुठल्याही अमराठी माणसाची गय करायची नाही, अशी जणू मी शपथ घेतलेली आहे. आणि माझ्या ब्राम्हण ज्ञातीबिषयी सांगायचे झाल्यास जसे रामदास आठवले किंवा सुशीलकुमार शिंदे किंवा विनायक मेटे किंवा पुरुषोत्तम खेडेकर किंवा मुंडे परिवार किंवा भुजबळ कुटुंबीय किंवा अबू आझमी किंवा अण्णा डांगे इत्यादी त्यांच्या त्यांच्या ज्ञाती साठी अगदी उघड भूमिका मांडतात, पाठराखण करतात, भूमिका घेतात, ती तशी बरी वाईट भूमिका आपण का ब्राम्हणांसाठी मांडायची घ्यायची नाही, मनात विचार आला आणि समाजात पत्र पाठवून कळवले, मी तुमच्या आनंदात भलेही येणार नाही पण अडचणीत सापडलात तर अवश्य माझी आठवण करा, अर्ध्या रात्री धावत येईन, अर्थात मी या राज्यातला अगदीच common man , आपापल्या जातीचे नेतृत्व करणारे ते ते नेते फार मोठे आहेत त्यांच्यासमोर मी म्हणजे अमिताभसमोर एखादा अति सामान्य कलाकार पण मनातून ठरविले आहे कि याराज्यातल्या मराठी माणसासाठी आणि ब्राम्हणांसाठी वाट्टेल ते….

मला राहून राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटते आणि वाईट देखील वाटते कि या राज्यात अनेक ‘ भुजबळ ‘ वृत्तीचे नेते असतांना ते अगदी मोकाट फिरताहेत आणि ज्या ज्ञाती जातीमुळे भुजबळ तुरुंगात गेले तो त्यांचा समाज त्यांच्यासाठी एकदाही रस्त्यावर उतरला नाही. भुजबळ यांनी आपल्या ज्ञातीसाठी घेतलेली उघड भूमिका त्यांना अधिक अडचणीची ठरली. कारण भ्रष्ट नेते तर अनेक होते, ते सेफ आहेत, भुजबळ मात्र आत आहेत आणि त्यांचा समाज मुग गिळून गप्प आहे. चालायचेच, सुखके सब साठी….आम्ही ब्राम्हण नेमके कसे आहोत म्हणजे लायक कसे आणि नालायक कुठे, त्यावर 

माझे पुढले लिखाण असेल….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *