बावनकुळे तुमच्यामुळे,फिटे अंधाराचे जाळे ३ : पत्रकार हेमंत जोशी

केव्हातरी एकदा मी तुम्हाला म्हणालो होतो, तुम्हाला फेस बुकचा स्वतःसाठी 

कितपत फायदा आणि उपयोग करवून घेता आला मला ठाऊक नाही पण
मला स्वतःला मात्र फेसबुकमुळे प्रचंड विविध फायदे झालेत, माझे वाचक
जगभरात वाढलेत, माझ्या वेबसाईटच्या हिट्स जगभरातल्या लाखो वाचकांत
वाढल्या, मित्रपरिवार वाढला, मला प्रसिद्धी मिळाली, विशेष म्हणजे काही कामे
करवून घेणे अगदी सोपे झाले. अगदी कालपरवा फेसबुकवर आवाहन केले कि
किडनी स्टोनवर आयुर्वेदिक उपचार करणारे तद्न्य माहित असल्यास कळवावे,
आवाहन केल्यानंतर दिवसभरात अतिशय छान रिस्पॉन्स मिळालेला, ओळखीच्या
पेशंटची समस्या आपोआप अगदी सहज दूर झाली. नागपूर अधिवेशनानंतर आवाहन
करणार आहे, अडगळीत पडलेली किंवा नको असलेली पुस्तके मला दान करण्याचे,
अशी पुस्तके मी जयराजजी साळगावकर यांच्या प्रिंटिंग प्रेस मधून व्यवस्थित बाइंडिंग
करवून घेऊन ती गरजू संस्थांना जातीने भेट देऊन दान करणार आहे, त्याचा तंतोतंत
हिशेब देखील लोकांसमोर मांडण्याची काळजी घेईन. साळगावकर कुटुंबाच्या
मालकीच्या अत्याधुनिक प्रिंटिंग प्रेस बघण्यासारख्या, तुम्हाला माहित आहे का तेथे
वर्षभर फक्त कालनिर्णय दिनदर्शिका आणि साळगावकर यांच्या मालकीचे इतर काही
प्रकाशाने छापण्याचे काम सुरु असते, मराठी माणसाचे करावे तेवढे कौतुक कमी….
लग्नसराईचा सिझन आल्यानंतर आणखी एक लग्न करण्यासाठी मला स्थळ सुचवा
असेही मी आवाहन करणार आहे त्यावेळी समस्त बुजुर्ग पुरुषांनी, आमची घेऊन जा,
असे निरोप मला कृपया पाठवू नये. मी भंगार मालाचा व्यापारी नाही, हे प्लिज लक्षात
ठेवून त्यावेळी मला छान छान मस्त मस्त सुंदर सुंदर तरुण तरुण असे काहीतरी
सुचवा, उपकार होतील….
अलीकडे एक झक्कास लघुकथा वाचण्यात आली. लेखक त्यात सांगतो,
दुपारी दुकान बंद करून मी जेवायला चाललोच होतो तेवढ्यात एक कुत्रा
तोंडात पिशवी घेऊन दुकानात आला. त्या पिशवीत हव्या असलेल्या सामानाची
यादी आणि पैसे होते. मी अवाक झालो. लगेच पिशवीत सामान भरले, पैसे
घेतले, उरलेले पैसे पिशवीत ठेवले…
कुत्रा ती पिशवी पुन्हा तोंडात घेऊन निघाला. माझी उत्सुकता शिगेला
पोहोचली, मी पण त्या कुत्र्यामागोमाग निघालो. कुत्रा बस स्टॉपवर आला,
नेमकी बस येताच त्यात चढला, मी पण पाठोपाठ, पिशवीवर उतरण्याचे
ठिकाण लिहिले होते. कंडक्टरने पिशवीतून नेमके पैसे घेतले, बस निघाली.
स्टॉप आल्यावर कुत्रा उतरला, मी पण उतरून त्याच्या मागोमाग निघालो.
थोडे अंतर कापून गेल्यावर कुत्रा एका घराजवळ थांबला, त्याने घराची बेल
वाजवली. एका माणसाने दार उघडले, त्याच्या हातात काठी होती. आधी त्या
माणसाने सामान घेतले नंतर मात्र त्या कुत्रायला त्याने काठीने चांगलेच बदडून
काढले. मी पुढे गेलो, माझी ओळख त्या माणसाला सांगितली आणि कुत्र्याला
मारण्याचे कारण विचारले. त्यावर तो माणूस म्हणाला,
साल्याने माझी झोपमोड केली. चावी घेऊन गेला असता
तर माझी झोपमोड झाली नसती…..!!
येथे कथा संपलेली आहे.
मित्रांनो, ही कथा म्हणजे जीवनाची खरी सच्चाई आहे. लोकांच्या अपेक्षांना
कधीच अंत नसतो. त्यांच्यासाठी, नातेवाईकांसाठी कितीही करा,
घरासाठी वाट्टेल तेवढ्या खस्ता खा, मुले मोठी झाली कि म्हाताऱ्या
आईबापांना मारायला धावतात. त्यांचे हाल कुत्र्यासारखे करून ठेवतात.
लोकांच्या, पोटच्या मुलांच्या, नातेवाईकांच्या अपेक्षा कधीच पूर्ण होत
नाहीत. अपेक्षांना अंत नाहीत. जेथे तुम्ही थोडे चुकलात किंवा मदत
करण्याचे थांबवले कि मागे केलेली मदत माणसे विसरतात. आणि तेच
तुमची निंदा करतात, पोटची मुले तर तुमचे जीवन जगणे मुश्किल करून
सोडतात, बहुतेक माणसे उपकाराची फेड अपकाराने करतात…
हि लघुकथा त्या वीज आणि उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री आणि
नागपूरचे पालक मंत्री श्रीमान चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी. तोंडाला
फेस येईपर्यंत म्हणजे जीव मेटाकुटीला येईपर्यंत हे महाशय नागपुरात
असोत कि मुंबईत किंवा अन्यत्र कुठेही, सतत लोकांच्या घोळक्यात
कार्यव्यस्त असतात, येईल किंवा भेटेल त्याला मदत करतात, त्याचे काम
तेथल्या तेथे करून देतात. आंघोळीसारखे काही क्षण बावनकुळे एकटे
असतात, इतरवेळी म्हणजे त्यांच्या घरातही माणसे ठाण मांडून बसलेली
असतात. आराम हा शब्द बावनकुळे आधी आमदार आणि नंतर नामदार
झाल्यानंतर विसरले आहेत. खोटे वाटत असेल तर अजिबात ओळखी
नसतांनाही किंवा तुम्ही त्यांच्या राजकीय विचारांचे नसतांनाही त्यांच्याकडे
काम घेऊन जा, खालची मान वर न करता जर त्यांनी तुम्हाला तेथल्या तेथे
सहकार्य केले नाही तर मला हेमंत जोशी म्हणू नका, वाट्टेल ते म्हणा, सतीश
चतुर्वेदी म्हणा, प्राण म्हणा, अमरीश पुरी म्हणा, सुनील तटकरे म्हणा, वाट्टेल
ते म्हणा. म्हणून बावनकुळे यांच्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, मालक
आणि कुत्रा या कथेतल्या मालकासारखे कधीही वागू नका, एखादी अपेक्षा
चुकून माकून पूर्ण झाली नाही तर बावनकुळे यांच्यावर रोष राग न ठेवता,
त्यांना तुमच्या नाराजीचे नेमके कारण सांगा आणि सतत त्यांच्या पाठीशी
उभे राहून तुमच्या मतदार संघाचा आणि नागपूर शहराचा विकास त्यांच्याकडून
करवून घ्या. माणूस मेहनती आहे, हुशार आहे, कष्टाळू आहे, मदत करणारा
आहे, हरहुन्नरी आहे, उत्साही आहे, प्रगती साधणारा आहे, मंत्री म्हणून तो
खात्यावर वचक् ठेवणारा आणि हुकमत गाजवणारा आहे, असे मंत्री आपल्या
राज्याची गरज आहे, बेंबीच्या देठापासून म्हणा, बावनकुळे आज बढो, हम
तुम्हारे साथ है…..

LikeShow more reactions

CommentShare

22प्रविण देशपांडे, Raju Hindustani and 20 others

2 shares

1 Comment

Comments

Raju Hindustani

Raju Hindustani Ms che bhavi obc cm.

Like · Reply · 20 hrs

Vikrant Joshi

Write a comment…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *