परिच्छेद १ : पत्रकार हेमंत जोशी

परिच्छेद १ : पत्रकार हेमंत जोशी 

आपण सारे पुणेकरांना नेहमी सतत मला वाटते उगाचच नावे ठेवत असतो. वास्तविक पुण्यातले प्रत्येक कुटुंब अफलातून असते, प्रत्येक पुणेकर काहीतरी वेगळे करण्यात गुंतलेला असतो, काहीतरी वेगळे करणाऱ्या माणसांना नावे ठेवण्यात आम्ही भारतीय खूप आघाडीवर आहोत त्यांना चमत्कारिक पण म्हणतो, अगदी सतत विचित्र नजरेने बघतो. आजतागायत जेवढे चुटके, जोक्स जन्माला आले त्यातले बहुतेक एकतर पुणेकरांवर असतात किंवा होते किंवा सरदारजींवर तरी होते ज्या सरदार मंडळींनी अख्ख्या जगात स्वतःचे असे आगळे स्थान निर्माण केलेले आहे. गम्मत म्हणजे जे अनिल थत्ते ठाण्यात राहून देखील पुणेकरांसारखे वेगळेच काहीतरी सतत करीत आले ते अनिल थत्ते अलीकडे त्यांचे ठाण्यातले प्रशस्त घर विकून पुण्यात राहायला गेल्यापासून बघा कसे पुन्हा एकदा त्यांच्या धमाल पुणेकर स्टाईलने प्रकाशझोतात आलेले आहेत. येथे तुम्हाला मुद्दाम सांगतो, एका पुणेकराविषयी वाचूनच मी माझ्या आयुष्यात एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. जेव्हा माझ्या वाचनात आले होते कि एका पुणेकर लेफ्टनंटने जखमी अवस्थेत युद्धात अपंगत्व आलेल्या अवस्थेतही जेव्हा त्याच्या एकुलत्या एक मुलाने विचारले कि बाबा मी पण मिलिटरीत जाऊ का, तेव्हा त्या पुणेकराने क्षणाचाही विलंब न लावता मुलास परवानगी दिली होती.८-१० वर्षांपूर्वी नेमका हाच प्रसंग माझ्यावर आला होता. माझी पत्रकारितेची कारकीर्द सतत जोखमीची दगदगीची, आयुष्यात केव्हा कोणते संकट समोर आ वासून उभे राहील सांगता आलेले नाही. ज्यांच्याविरोधात लिहितो ते सारे पैशांनी ताकदवान आणि सत्ता त्यांच्या हाती, माझे कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकते, कोणतेही खोटेनाटे आरोप लावून मला उध्वस्त केल्या जाऊ शकते, तरीही जेव्हा चिरंजीव विक्रांत उच्च शिक्षण संपवून मला विचारायला आले कि मी पण पत्रकारितेत येऊ का, मी क्षणार्धात ‘ हो ‘ म्हटले कारण त्या पुणेकर लेफ्टनंटचे उदाहरण माझ्या लक्षात होते. पंगा घेणारी पत्रकारिता करतांना स्वतःच्या आयुष्यातले कोणतेही गुण दुर्गुण लपविणे योग्य नसते म्हणजे मी महिन्यातून एखाद्यावेळी एखादा स्कॉचचा पेग मारतो हे अख्य्या जगाला मी सांगितलेले आहे किंवा आमचे इतरही गुण दुर्गुण लपवून ठेवलेले नाहीत आणि पंगा घेणारी पत्रकारिता जेव्हा तुम्ही करता तेव्हा काहीही लपवून ठेवायचे नसते,आचार्य अत्रे यांच्यासारखे गुण दोषांसहित समाजाला सामोरे जायचे असते. जे मी केले ते तुम्ही देखील करावे असे मला वाटते म्हणजे एखादा माणूस प्रगाढ पंडित असतो पण व्याकरण खाऊन तो जगू शकत नाही किंवा एखाद्या तहानलेल्या कवीची काव्यरस पिऊन तहान भागात नाही, पुस्तकातच अशी वाक्ये बरी वाटतात. केवळ वेद विद्या शिकून आजच्या जगात घरच्या शिकवण्यांवर घर चालत नाही,कुळाचा उद्धार करू शकत नाही जर उत्तम जगायचे असेल कोणतेही शिखर गाठायचे असेल तर आपल्याकडे धन असणे अत्यावश्यक असते, ज्ञानी पण निर्धन असणाऱ्या माणसाची किंमत शून्य आहे, कोणी ढुंकून देखील अशांकडे बघत नाही म्हणून 

मुलांना तेच सांगितले आणि मलाही तेच वाटले कि जे जे आपल्याकडे उत्तम आहे ते लोकांना द्यावे, पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांना वाटावे त्यासाठी अत्यावश्यक तेवढे धन कमविणे आवश्यक आहे म्हणून केवळ नोकरीच्या भरवशावर न राहता पत्रकारितेबरीबर काही व्यवसाय यशस्वी केले त्यामुळे जगणे निदान आजपर्यंत तरी सुसह्य झाले. संकटे तर कितीतरी, करण्यात आलेले आरोप तर केवढेतरी पण न डगमगता पुढे पुढे सरकतो आहे, बघूया पुढे काय घडते ते. या समाजाचे तुम्हीही काहीतरी नक्की देणे लागता पण आधी आपले घर चांगले उभे करा मग नक्की आपल्या एखाद्या अफलातून कामगिरीने लोकांचे भले करा…

क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *