समृद्ध समृद्धी १ : पत्रकार हेमंत जोशी

समृद्ध समृद्धी १ : पत्रकार हेमंत जोशी 

महाराष्ट्राच्या लौकिकतेत भर पाडणारा, मुख्यमंत्र्यांचा महत्वाकांक्षी फडणवीस यांचे स्वप्न मराठी जनतेसाठी स्वप्नवत पश्चिम महाराष्ट्रातील असंख्य नेत्यांच्या मस्तकात गेलेला अर्ध्या महाराष्ट्राला समृद्ध करणारा न भूतो न भविष्यती असा हा मागासलेल्या भागात विकासाला शंभर टक्के चालना देणारा आजपर्यंत दुर्लक्षित झालेल्या भागाचे जीवनमान बदलविणारा विदर्भ विकास विरोधी असलेल्या प्रत्येकाच्या थोबाडात मारणारा अभूतपूर्व अद्वितीय अजस्त्र अवाढव्य अफलातून अफाट अत्यंत विलोभनीय असामान्य वेळ वाचविणारा दळणवळण वाढविणारा व्यापाराला मोठी चालना देणारा शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जीवनमान नक्की उंचावणारा विविध प्रांतात मराठी माणसाला वृद्धिंन्गत प्रगत करणारा प्रजेला संप्पन्न करणारा आणि ज्या राजाच्या डोक्यातली हि कल्पना त्या आजच्या राज्याच्या राजाला म्हणजे महाराज देवेंद्र यांना कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यास भाग पाडणारा महामार्ग म्हणजे मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग, देवेंद्र यांना मुख्यमंत्री होताच पडलेले आणि त्यांनी पुढे लगेचच प्रत्यक्षात उतरविलेले अप्रतिम प्रतिष्ठित दिमाखदार स्वप्न…


फसवणुकीपासून सावधान : 

समृद्धी महामार्गावर मालिका लेखमालिका लिहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला येथे याठिकाणी काही महत्वाचे सांगायचे आहे आणि सांगितलेले तुम्ही वाचल्यानंतर अजिबात न विसरता सर्वांना नक्की सांगत सुटायचे आहे. महत्वाचे असे कि आपल्या या राज्यात युती सरकार पार पडणाऱ्या पंचवार्षिक योजनेत सत्तेत आल्यानंतर फडणवीसांच्या नेमक्या आणि सततच्या मार्गदर्शनाखाली किंवा फारतर असे म्हणता येईल कि फडणवीसांच्या नेतृत्वाखाली युतीने आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः काही महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले होते त्यातले दोन महत्वपूर्ण महाराष्ट्राची शान जगात उंचावणारे प्रकल्प होते पहिला ऑफ कोर्स, मुंबई ते थेट नागपूर समृद्धी महामार्ग आणि दुसरा प्रकल्प आहे राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी नागपूरकरच असलेल्या आणि ज्यांना सुरुवातीला अनेकांनी अंडर एस्टीमेट केले होते, चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहोरात्र सतत मेहनत घेऊन उभा केलेला ‘ सौर ऊर्जा प्रकल्प ‘ ज्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे जगातले आयुष्यमान जेमतेम काही वर्षांचे असतांना तो सौर ऊर्जा महाप्रकल्प या राज्यात तातडीने उभा करण्याचे चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नागपूरकरांना पडलेले आणि त्यांनी तातडीने लगेचच प्रत्यक्षात उतरविले स्वप्न साऱ्यांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडात दाद द्यावी असे कौतुकास्पद मोठे काम त्यांची अतिशय अप्रतिम कामगिरी…


मात्र आज हे दोन्ही प्रकल्प सनदशीर मार्गांनी या राज्यात उभे केले जात असतांना फसवणुकीचे अनंत प्रकार विविध दलालांकडून नेत्यांकडून घडल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे. आम्ही तुम्हाला सौर ऊर्जा प्रकल्पात आणि समृद्धी महामार्गात काम मिळवून देतो यासाठी आम्हाला एवढे पैसे द्या, सांगून अनेकांना, कित्येक कंपन्यांना, विविध कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणावर फसविले जात असल्याची माहिती आणि पुरावे माझ्याकडे आलेले आहेत. असे अजिबात घडणे शक्य नाही कि अमुक एखाद्या नेत्याने किंवा दलालाने किंवा राजकारणाशी संबंधित तत्सम व्यक्तींनी सांगितले कि अमुक माणसाला तमुक काम द्या कि लगेच त्यांना ते काम किंवा कंत्राट दिले जाते असे अजिबात घडत नाही, नसते. या दोन्ही प्रकल्पाशी संबंधित असलेले देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, राधेश्याम मोपलवार, विश्वास पाठक, अनिल गायकवाड, एकनाथ शिंदे किंवा तत्सम मंडळी कोणताही मागला पुढला विचार न करता एखाद्याच्या सांगण्यावरून काम देतील असे घडणे अजिबात शक्य नाही तेथे रीतसर मार्गानेच काम कंत्राट मिळवावे लागते. त्यामुळे आम्ही अमुक एका संबंधित व्यक्तीला पैसे दिले आहेत आणि आम्हाला नक्की

कंत्राट काम मिळणार आहे, असे तुम्ही संबंधितांनी सांगणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात फिरण्यासारखे आहे…


म्हणून अतिशय सावध संबंधितांनी असावे, आपली फसवणूक लुबाडणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. जर अमुक एखाद्याची या पद्धतीने फसवणूक झालेली असेल तर ती लगेच दोन्हीही प्रकल्पांच्या जबाबदार मंडळींच्या कानावर घालावी. दोन्ही ठिकाणी कामाचा दर्जा तपासून सारे पुढे जात असल्याने येथे कंत्राट मिळविणे म्हणजे मनोरा आमदार निवासाच्या बोगस देखभालीचे कंत्राट मिळविण्यासारखे नाही हे ज्याने त्याने ध्यानात ठेवणे अत्यावश्यक 

आवश्यक आहे…

क्रमश:

 पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *