पवारांचा पचका : पत्रकार हेमंत जोशी


पवारांचा पचका : पत्रकार हेमंत जोशी 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्यातील लोकसभेचे अचूक अंदाज वर्तविणार्याला बक्षीस म्हणून तंगडी रक्कम जाहीर केली आहे, अचूक भविष्याचे प्रथम बक्षीस अर्थात मलाच मिळेल हे मी येथे जाहीर करू इच्छितो. हा भविष्य कथन करणारा अंक तुम्ही जपून ठेवा आणि अचूक निकाल आलेत कि तेवढी बक्षिसाची रोख रक्कम आमच्याकडे पोहोचती करा. मागे फार पूर्वी एकदा मी पत्रकार उदय तानपाठक यांना सांगितले होते उद्या तुझ्याकडे संध्याकाळपर्यंत कार असेल त्यावेळी त्याने मला मुर्खात काढले नंतर जेव्हा भल्या पहाटे शुभम मित्रांसंगे जत्रेला जाऊन कार घेऊन आला, तेव्हा भविष्य कथन करण्यात मी कसा तद्न्य, त्याची खात्री झाली. असेच एकदा एका मित्राला मी म्हणालो, आज निळ्या रंगाची घातलेली दिसते. तो हो म्हणाला, त्याला माझे कौतुक वाटले. तो घरी गेल्यानंतर त्याच्या लक्षात आले कि चेन उघडी होती, तो भाग वेगळा…

पुण्यात गिरीश बापट यांच्या विरोधात काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर केली नि लगेच बापटांच्या प्रचार तोफा थंडावल्या निदान थोडीफार तरी मते विरोधकाला पडायला हवीत हा त्यामागे बापटांचा निर्मळ हेतू असल्याचे कळले. नितीन गडकरींच्या विरोधात नाना पटोले यांना उमेदवारी जाहीर झाली आणि पिंजरा मध्ये दिसला ग बाई दिसला गाण्यावर अप्रतिम नृत्य करणारी अभिनेत्री संध्या आणि तिच्यामागे असलेल्या सहनर्तिका आठवल्या, सहनर्तिका कोणत्या एकही आठवत नाही लक्षात राहते ती फक्त संध्या. नितीन गडकरी आणि नाना पटोले म्हणजे मुख्य नर्तिका आणि सहनर्तिकेसारखे हे नाते, बरे झाले नाना उभे राहिले गडकरींना उन्हातान्हाचा आराम मिळाला, नातवंडातही ते रमतील, संध्याकाळचे त्यांना बागेत नेऊन फिरवून आणतील…


www.vikrantjoshi.com


गेली चार दशके मी लोकसभा निवडणुका अगदी जवळून बघत आलोय, यावेळी पहिल्यांदा असे झाले कि राष्ट्रवादी आणि काँग्रेस कडे योग्य उमेदवार लोकसभा लढवायला न मिळाल्याने या दोन्ही पक्षाची अवस्था माझ्या मावशीसारखी झाली, एकदा तिला खोकला झाल्यानंतर ओव्याची बिडी करून ओढायची होती पण काही केल्या तिला ओवा न मिळाल्याने तिने माझया मावस भावाच्या पॅण्टमधली ५५५ हि सिगारेट काढून पटापट झुरके मारले, राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने या राज्यात विविध मतदारसंघात योग्य उमेदवार न मिळाल्याने तुरुंगात गेलेल्या गुलाबराव देवकर किंवा राजकारणातल्या अनिल धवन म्हणजे पार्थ पवार यांच्यासारख्या नवख्यांना देखील उमेदवारी देऊन स्वतःचे हसे करून घेतले. नशीब, सुनील तटकरे रायगड मधून लोकसभा लढविण्यास तयार झाले अन्यथा त्याजागी अलोक नाथ यांना उमेदवारी देण्याचे म्हणे पवारांच्या मनात होते…


श्री श्री शरद पवार अमुक एखाद्या निवडणुकी निमित्ते अस्वस्थ आहेत हादरले आहेत घाबरले आहेत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येरझारा घालताहेत, चिडचिड वाढली आहे, वारंवार ब्लडप्रेशर तपासताहेत त्यांच्या मनाचा गोंधळ उडाला आहे ते आदळआपट करताहेत मी किंवा अन्य कोणीही कधीही बघितले नाही नव्हते किंवा ते जेव्हा ऐन निवडणुकीच्या काळात जीवघेण्या रोगावर म्हणजे साक्षात मृत्यू समोर उभा असतांना देखील कधी घाबरलेले बघितले नव्हते, याउलट इतर सारे अस्वस्थ होते, शरद पवार मात्र शांत होते संयमाने तब्बेत हाताळत होते. यावेळेचे शरद पवार नेमके वेगळे आहेत, गोंधळले आहेत, नाईलाजाने का होईना ज्या समीर भुजबळ यांना राज्याने भ्रष्ट म्हणून तोंडात शेण कोंबले, शरद पवारांना,इतर कोणीही सापडले नाही म्हणून थेट समीर भुजबळ यांना उमेदवारी जाहीर करावी लागणे म्हणजे झाशीच्या राणीच्या वंशजांनी पोटापाण्यासाठी मध्य प्रदेशात रस्त्यावर बसून भाजीपाला विकला, त्याप्रसंगाची आठवण झाली. अरेरे, यावेळी पवारांनी फार उघड उघड नको तेवढे वाईट काम केले, बदनाम मंडळींना पक्षातून काढून टाकण्याऐवजी उलट त्यांना डोक्यावर बसवून घेतले…


समजा अमुक एखाद्या मतदारसंघात योग्य उमेदवार मिळत नाही म्हणून राष्ट्रवादीने तो मतदारसंघ काँग्रेस साठी सोडावा तर तेथेही तीच बोंब म्हणजे नवऱ्यापासून मूल होत नाही म्हणून एखादीने लग्नाआधीच्या प्रियकराला गाठावे तर तोही गावाबाहेर जुनी मोटारगाडी घेऊन लैंगिक समस्यांवर औषधोपचार करणाऱ्या बैदूकडे गेलेला, राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांचीही राजकीय अवस्था समसमान. सतत केवळ पैसे मिळविणे हेच प्रमुख लक्ष्य समोर ठेवले कि हे असे होते. असा एकही जिल्हा किंवा मतदार संघ नाही नव्हता जेथे पवारानी गावाने ओवाळून टाकलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात संधी दिलेली नाही. काँग्रेस ची अवस्था मात्र ऐन तारुण्यात विधवा झालेल्या उफाड्या तरुणीसारखी झालेली आहे म्हणजे चांगल्या लीडरशिपच्या नावाने त्यांना थेट दिल्लीतच वैधव्य आल्याने वाट्टेल ते बरळून गोंधळ निर्माण करणारे पत्रकार आणि खासदार कुमार केतकर देखील काँग्रेसला साक्षात देवासारखे वाटू लागलेले आहेत, मसीहा वाटू लागले आहेत…

तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *