Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

कोण जिंकले कोण कोण संपले : पत्रकार हेमंत जोशी

tdadmin by tdadmin
January 31, 2021
in Uncategorized
1
कोण जिंकले कोण कोण संपले : पत्रकार हेमंत जोशी


कोण जिंकले कोण कोण संपले : पत्रकार हेमंत जोशी 
शिवसेना व भाजपाने आपणहून ठरविलेच असेल कि राज्यातले स्वतःचे राजकीय अस्तित्व खालसा करायचे तर शरद पवार यांनी चालून आलेली सुवर्ण संधी का म्हणून गमवावी ? एखाद्या कामातुर कामांध पुरुषाला शेजारणीने अचानक मागून येऊन घट्ट मिठी मारावी अशावेळी त्या कामांधने तिला मिठीत पकडलेल्या बाईला  ताई म्हणून वाकून नमस्कार का करावा, तसे शरद पवार यांचे, ज्यांना सत्तेचे आकर्षण आहे त्या पवारांना सेना भाजपाने आपणहून संधी उपलब्ध करून द्यावी आणि पवारांनी आयत्या चालून आलेल्या संधीकडे पाठ फिरवावी असे नक्की घडणारे नाही घडणारही नाही. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणूकीत एक अमरीश पटेल आणि एक काँग्रेसचा उमेदवार सोडले तर इतर सारे पवारांचेच निवडून आले आहेत कारण अमरावती मधनं निवडून आलेले गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या घरातले त्यांचे जवळचे नातेवाईक किरण सरनाईक हेही अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी तोही पवारांचा गेम होतो, नेम अचूक लागला, गाफील श्रीकांत देशपांडे थोड्या मतांनी पराभूत झाले, सतत आजारी असणे किंवा पुणे मुंबईत अधिक  राहणे रमणे त्यांना चांगलेच महागात पडले वरून त्यांचे ब्राम्हण असणे त्यामुळे त्यांच्याच महाआघाडीच्या ब्राम्हणेतर नेत्यांनी त्यांना अजिबात सहकार्य न करणे त्यांना महागात पडले, पैठणी व पैसे वाटप शिवाय हळुवार मतदार संघ बांधणाऱ्या किरण सरनाईक यांना त्यामुळे यश मिळविणे खूप सोपे गेले, भाजपाला संपवितांना पवारांनी शिवसेनेचा देखील अलगद काटा काढला… 

माझे असे कितीतरी मित्र आहेत जे अगदी तोंड फाटेपर्यंत पत्नीची तरफ करतात, ती समोर असतांना थेट प्रभू रामचंद्रांच्या भूमिकेत शिरतात आणि बायकोचे किंवा इतरांचे लक्ष नसतांना इतरही मैत्रिणींना घट्ट पकडून ठेवतात, डॉक्टर डॉक्टर खेळ खेळून मोकळे होतात, एकाचवेळी बायकोला मुठीत आणि बायकांना मिठीत घेऊन मोकळे होतात. अमरावती शिक्षक मतदार संघात श्रीकांत देशपांडे या शिवसेनेच्या उमेदवाराचे बाबतीत नेमके हे असेच इतर त्यांच्या नेत्यांचे चालू पुरुषासारखे घडले, देशपांडे हे शिवसेनेचे म्हणजे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार त्यामुळे वरकरणी महाआघाडीचे जे नेते मंत्री आमदार इत्यादी देशपांडे यांना आज बढो म्हणत होते आतून मात्र विरोधकांना विशेषतः किरण सरनाईक यांना डोळा मारून मोकळे झाले होते. महत्वाचे म्हणजे जे श्रीकांत देशपांडे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सांगितले होते कि मला अपक्ष म्हणून हि निवडणूक लढवू द्या मला केवळ पाठिंबा द्या मी नक्की निवडून येतो त्यांचे हे सांगणे उद्धव ठाकरे किंवा इतर शिवसेना नेत्यांनी फारसे मनावर घेतले नाही वरून विदर्भात अलीकडे ब्राम्हणांविषयी निर्माण झालेला प्रखर विरोध, देशपांडे पराभूत झाले थेट घरी गेले. तेच नेमके नागपुरात देखील घडले, एक देवेंद्र फडणवीस यांचा मनापासून पाठिंबा आणि प्रचार सोडल्यास संदीप जोशी यांची यावेळी एकही जमेची बाजू नव्हती आणि अभिजित वंजारी तुलनेत साऱ्या बाबतीत उजवे ठरत गेले, भाजपाने तेही नागपुरात पराभूत होणे म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या मुलीने मुसलमानाच्या घरात गेल्यासारखे तेथे घडले, भाजपाने मोठे नाक कापून घेतले गरज नसतांना… 

नागपुरातील भाजपाचे लोकमान्य लोकप्रय आमदार अनिल सोले हेच यावेळी उमेदवार म्हणून रिपीट झाले असते तर नक्की वेगळे चित्र बघायला मिळाले असते पण दूरदर्शी चतुर समजणाऱ्या भाजपा नेत्यांनी मोठी चूक केली सोले हे नितीन गडकरी गटाचे म्हणून त्यांना उमेदवारी नाकारली, गडकरी यांना सतत डावलणे यात गडकरी यांच्या चुका अधिक आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. सोले कि जोशी, वर्षभर नेमके नागपूर भाजपा मध्ये हेच सुरु होते आणि सोले यांना  उमेदवारी कि जोशी यांना आणि त्यांच्या या गोंधळात इकडे  तेली समाजाचे अभिजित वंजारी तेली माळी कुणबी या भाजपावर नाराज गटाला सोबतीने घेऊन पद्धतशीर मतदारसंघ बांधत होते वास्तविक महापौर असणाऱ्या संदीप जोशी यांनी निदान यावेळी तरी घाईने निवडणूक लढवायला नको होती किंवा सोले व जोशी या दोन्ही ब्राम्हणांना डावलून अगदी सहज निवडणूक जिंकून येण्याची शक्यता असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांचे जर उमेदवारी देऊन भाजपाने पुनर्वसन केले असते तर जंग जंग पछाडून देखील अभिजित वंजारी यांना हि निवडणूक जिंकणे कठीण होऊन बसले असते. मोदी गट आणि गडकरी गट त्यातून विदर्भात विशेषतः नागपुरात किंवा थेट राज्यातही भाजपा स्वतःचे मोठे नुकसान करवून घेते आहे. याच अनुषंगाने भाजपा अंतर्गत गटातून दोन अत्यंत महत्वाच्या बातम्या कानावर आलेल्या आहेत. चंद्रकांत पाटलांचे अलीकडे शरद पवार यांच्याशी जुळलेले सूर आणि नितीन गडकरी यांना लवकरच होऊ घातलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारा दरम्यान डच्चू मिळण्याची दाट शक्यता या त्या दोन बातम्या पैकी गडकरी यांनी म्हणे भाजपा अध्यक्षांना सांगितले आहे कि डच्चू देण्याऐवजी मला आधी  कल्पना द्या मीच तब्बेतीचे कारण पुढे करून राजीनामा देईल. जे या राज्यात पवारांना शिवसेना व भाजपा मध्ये घडवून आणायचे होते त्यात ते यशस्वी ठरले ते कसे त्यावर नक्की मी लवकरच पुरावे मांडून मोकळा होणार आहे….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Previous Post

विविध वाहिन्या त्यांच्या कहाण्या २ : पत्रकार हेमंत जोशी

Next Post

काही बकवास वृत्तपत्रे व वाहिन्या त्यांच्या कहाण्या : भाग ३ : पत्रकार हेमंत जोशी

tdadmin

tdadmin

Next Post

काही बकवास वृत्तपत्रे व वाहिन्या त्यांच्या कहाण्या : भाग ३ : पत्रकार हेमंत जोशी

Comments 1

  1. Avatar Satish says:
    3 months ago

    फडणवीस व चंद्रकांत पाटील जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे प्रमुख नेते आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात भाजपची घसरण थांबणार नाही. फेब्रुवारी २०२२ मधील सर्व १० महापालिका निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव होणार आहे. यापुढील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रथम क्रमांकावर तर ५० कमी जागा जिंकून भाजप चौथ्या क्रमांकावर असेल. महाराष्ट्रात भाजप वाचविण्यासाठी भाजपने तातडीने नेतृत्वबदल केला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रात भाजप संपेल.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • पूजा चव्हाण आत्महत्या : संजय राठोड उत्तरे द्या

    पूजा चव्हाण आत्महत्या : संजय राठोड उत्तरे द्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Nana Patole & traffic police!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हि विकेट हवी : पत्रकार हेमंत जोशी 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खून कि आत्महत्या : मंत्रीजी नेमके उत्तर द्या : भाग १: पत्रकार हेमंत जोशी 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूजा अरुण, पूजा लहू कि पूजा संजय !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.