बदमाश तरुणींचे वास्तव : पत्रकार हेमंत जोशी

बदमाश तरुणींचे वास्तव : पत्रकार हेमंत जोशी 

मराठी पुरुषही बाईलवेडा असतो स्त्रीलंपट असतो पटापट प्रेयसी बदलणारा असतो घरचीला ठेंगा आणि बाहेरचीला बिलगणारा असतो, लफडे करणाऱ्या मराठी पुरुषांची मोठी संख्या आहे येथपर्यंत सारे ठीक आहे पण विशेषतः शहरातल्या आणि महानगरातल्या तेही मराठी तरुण मुली, स्त्रिया देखील अलीकडे फसविण्याचा व्यसनांच्या लबाडीच्या पुरुष बदलण्याच्या बाबतीत मराठी पुरुषांच्या तोडीस तोड आहेत हे दरदिवशी कानावर पडणाऱ्या बातम्यांवरून माझ्या ते लक्षात आले आहे, तुम्हाला देखील ते लक्षात आलेलेच असेल. मराठी तरुण मुली आणि स्त्रिया म्हणजे उत्तम संस्कार असे म्हणणे आता आपल्याच मराठी तरुण स्त्रियांनी खोटे ठरविलेले असल्याने प्रपोज मॅरेज करणाऱ्या चांगल्या मुलींनी जशी पुरुष निवडतांना योग्य काळजी घ्यायला हवी दुर्दैवाने आता तीच वेळ मराठी तरुणांवर नक्की येऊन ठेपलेली आहे. माझ्या ओळखीचा एक यशस्वी मराठी विवाहित उद्योजक एअरहोस्टेस असलेल्या एका तरुणीच्या एवढ्या प्रेमात पडला कि तिच्याशीच लग्न करण्यासाठी त्याने पत्नीला घटस्फोट दिला, लाडक्या मुलाचा पत्नीकडे ताबा दिला…

पुढे मी त्याच्याशी यासाठी बोलणे सोडले कि मला माहित होते ती २२-२३ वर्षांची देखणी उफाडी एअरहोस्टेस या चाळिशीला पोहोचलेल्या मित्राशी कधीही लग्न करणार नाही. झाले काय एक दिवस त्याने तिला उत्तमोत्तम उंची महागडे ड्रेस यासाठी घेऊन दिले कि त्यांना पुढे २-३ दिवस गोव्यात जाऊन धमाल करायची होती. ज्या मॉल मधून याने तिच्यासाठी कपडे घेतले तेथे तो दुसरे दिवशी स्वतःच्या खरेदीसाठी जेव्हा गेला तेव्हा अचानक त्याला हीच एअरहोस्टेस बॉयफ्रेंडच्या हातात हात घेऊन बिलगून फिरतांना पाठमोरी दिसली विशेष म्हणजे मित्राने तिला आदल्या दिवशी घेऊन दिलेला सर्वात महाग ड्रेस तिने घातलेला होता, दृश्य बघून याला भोवळ आली, पुढे पश्चाताप झाला पण तोवर वेळ निघून गेलेली होती आधीच्या बायकोने देखील लग्न उरकून घेतलेले होते. मराठी कुटुंबात काळ हा असा झपाट्याने बदललेला आहे. कपडे बदलावे तसे आजकाल मराठी स्त्रियांचे देखील वागणे असते ज्यांच्याकडे उगाचच सावित्रीबाई जिजाऊ म्हणून बघितल्या जाते.  जसे सरसकट पुरुष बदमाष नसतात तसे मला एकजात साऱ्याच तरुणींना दोष द्यायचा नाही पण खूप वाढलेले प्रमाण मराठी कुटुंब पद्धतीला नक्की घातक आहे…

विवाहित मराठी स्त्रिया असोत वा पुरुष दोघांनीही एक्सट्रा अफेअर्स करतांना ज्याच्या प्रेमात आपण पडतो आहे तो किंवा ती नेमके कसे आहेत हे जाणून घ्यायला हवे. दोघांनाही प्रियकर प्रेयसी सतत बदलण्याची सवय असेल तर मग फारसे काही दोघांच्याही बाबतीत बिघडत नाही, एकमेकांपासून दूर होतांना त्यांना क्षणभर देखील विरह सहन करण्याची गरज पडत नाही. माझ्या एका विवाहित सरकारी अधिकाऱ्याची प्रेयसी आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत त्याच्याकडून लाखभर रुपयांचे शॉपिंग करून घेते दुसरे दिवशी याने तिला जेव्हा फोन केला, आठवडाभर फोन नॉट रिचेबल होता, नंतर तिनेच त्याला फोन करून सांगितले कि ती नोकरीसाठी परदेशात निघून गेलेली आहे. हा तिला भेटायला तेथेही जायला तयार होता पण तिने नंतर त्याला अजिबात रीस्पॉन्ड केले नाही याला शेवटी मानसोपचार तज्ज्ञाकडे मला घेऊन जावे लागले. ती याला त्याच्या बायकोशी संबंध ठेवायला काय साधे बोलायला देखील मनाई करीत असे आणि तिने परदेशात गेल्यानंतर पहिल्या आठवड्यात एका मुस्लिम तरुणाला जाळ्यात ओढले आणि हवी तेवढी शारीरिक भूक भागवून घेतली, नंतर ती पुन्हा मुंबईत परतली मित्राला पुन्हा भेटली हे महाशय पुन्हा तिच्यात गुरफटले मी डोक्यावर हात मारून घेतला. खालची मान वर न करता आधीच्या काळात वावरणारी मराठी तरुणी आजकाल याच्या मिठीतुन त्याच्या मिठीत जेव्हा अलगद जणू काही घडलेच नाही भावनेने विसावते तेव्हा आपल्यापेक्षा पाश्चिमात्य बरे म्हणण्याची वेळ येते. विशेष म्हणजे कोकशास्त्राने देखील मान खाली घालावी एवढा मोठा लैंगिक विकृतीचा आनंद घेणारा अनुभव त्यांच्याकडे असतो…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *