विनाशकारी विस्तार : पत्रकार हेमंत जोशी


विनाशकारी विस्तार : पत्रकार हेमंत जोशी 

मागे एकदा मी लिहिले होते कि फडणवीस युद्धात जिंकले पण तहात हरले आणि उद्धव ठाकरे अनेकदा युद्धात हरतात पण तहात जिंकतात पण यावेळी विपरीत घडले आहे नेमके उलटे झाले आहे, उद्धवजी यावेळी मात्र म्हणजे एकूण मंत्रिमंडळ विस्तारात हरले आहेत तहात हरले आहेत आणि शरद पवार जिंकले आहेत, हरलेले पवार जिंकले आहेत. पराभूत होऊनही पवार मजेत राहणार आहेत जर हे मंत्रिमंडळ पुढे  पाच वर्षे टिकले तर. आणि हीच ती वेळ हीच ती संधी भाजपाला, भाजपा नेत्यांना विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना कि त्यांनी खदखदणाऱ्या अस्वस्थ राजकीय परिस्थितीचा नेमका फायदा उचलावा पुन्हा पूर्वीचे दिवस आणण्यासाठी जोमाने व जोरात प्रयत्न करावेत, फडणवीसांनी उद्धवजींकडे जे बोलणी करायला चार दोन टाळकी पाठविल्या जातात त्यांच्या ढुंगणावर जोरात लाथ मारून आपल्यापासून अशांना सर्वप्रथम दूर करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा त्यांना काही नालायक फंटारांचा  मोठा त्रास होऊ शकतो. आपण नेमके कुठे कमी पडलो किंवा कुठे कुठे चुकलो त्यावर जर आत्मचिंतन फडणवीसांनी केले असेल तर पूर्वीचे पवारांच्या नाकात देखील दम आणणारे फडणवीस पुन्हा एकवार बघायला मिळणे फारसे कठीण नाही…

कारण शरद पवारांना जे आता वाटायला लागले आहे कि त्यांनी मोठी बाजी जिंकली आहे ते तसे नसून पवारांनी भलेही मंत्रालय ताब्यात घेतले असले तरी मतदारांची मने जिंकण्यात ते अयशस्वी ठरले आहेत, साऱ्यांचे चेहरे आजही सुतक असल्यासारखे, घरचे महत्वाचे कोणीतरी गेल्यासारखे आहेत ना जनतेला उद्धव यांचे हे असे वागणे निर्णय घेणे आवडले आहे ना त्यांना ठाकरेंचे सत्तेत येणे आवडलेले आहे. यात चूक दोघांची आहे ज्यामुळे नको ते घडले आहे, म्हणजे चुक जशी उद्धवजींच्या हातून घडलेली आहे चूक फडणवीस यांच्या हातूनही घडलेली आहे ज्याचे फळ फडणवीसांना मिळाले आहे. आज फडणवीस जरी काहीसे बॅकफूट वर आले असले तरी साऱ्यांचे चेहरे सुतकी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे आजतागायत देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा अत्यंत लाडका मुख्यमंत्री ना कधी झाला आहे ना कधी नजीकच्या काळात त्यांच्या शिवाय कोणी होईल, अजिबात आजतरी वाटत नाही. फक्त आणि फक्त फडणवीस व उद्धवजी यांनीच एकत्र येऊन राज्य करणे जनतेला भावणारे आहे आणि जनतेच्या आनंदासाठी मिस्टर फडणवीस आणि मिस्टर ठाकरे तुम्ही दोघांनी पुन्हा एकवार एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे…

अरे बाबा अमितजी, आमच्या मनात असे काही नाही कि नरेंद्र यांच्यानंतर तेथे देवेंद्र यांनी येणे, नरेंद्र यांच्यानंतर ती खुर्ची तुम्हालाच लखलाभ ठरो. अचानक यश मिळत गेले त्यातून कुठे देवेंद्र चुकले असतील पण त्याची एवढी मोठी सजा त्यांना आणि महाराष्ट्रातील जनतेला अमितजी आपण देऊ नये, सेना भाजपा युती पुन्हा सत्तेत येण्यासाठी आपण आखाड्यात उतरावे आणि आम्हाला लागलेले सुतक दूर करावे. एकवार काँग्रेसचा पाठिंबा सेनाभाजपाला मिळणे जनतेला आवडणारे ठरू शकते पण इतक्यात पवार आणि त्यांचे बदनाम आजी माजी मंत्री सत्तेत असणे बसणे, मतदारांना, मराठींना अजिबात पचनी पडणारे नाही. तेच चेहरे तीच लुटपाट जर आम्हाला बघणे नशिबात असेल तर आमच्याएवढे दुर्दैवी जगात दुसरे कोणीही नसेल.अत्यंत महत्वाचे म्हणजे फडणवीसांनी देखील पुन्हा एकवार युती होणार असेल तर मित्र उद्धव यांची इच्छा पूर्ण करावी आणि तिकडे दिल्लीत देखील सांगून मोकळे व्हावे कि मला राज्याबाहेर राजकारणात रस नाही. काहीवेळा दोन पावले मागे येणे आणि संधी मिळाल्यानंतर पुन्हा गरुड झेप घेणे हि पवार नीती फडणवीसांनी आत्मसात करणे हि त्यावर योग्य वेळ आहे, त्यांनी आपले झालेले व होणारे मोठे राजकीय नुकसान टाळावे…

क्रमश: हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *