रावते यांना जमते : पत्रकार हेमंत जोशी
जेथे कमी तेथे आम्ही, शिवसेनेत हि म्हण परिवहन खात्याचे मंत्री दिवाकर रावते यांना तंतोतंत लागू पडते. अमुक एखाद्या भागात छडी हाती घेऊन काम करायची शिवसेनापक्षप्रमुखांना आवश्यकता गरज भासली पडली कि पक्षात नजरेसमोर हमखास नाव झळकते ते दिवाकर रावते यांचे. व्यसनांपासून कोसो दूर त्यामुळे सत्तरीच्या उंबरठ्यावर देखील ते विदर्भातल्या काटक शेतकऱ्यासारखे आजही राज्यात कोठेही पायपीट करून सेनेत नवचैतन्य आणून मोकळे होतात. असा काटक धाडसी मेहनती नेता क्वचित आढळतो. हाती काही लागो अथवा न लागो, श्वासाच्या अखेरपर्यंत लॉयल्टी केवळ मातोश्रीवर आणि हो, पत्नी असो वा पोटची दोन्ही मुले किंवा अन्य नातलग, कुटुंबसदस्य. माझी गादी यापुढे हा सांभाळेल हे असे त्यांच्या रक्तात नाही. अनेकदा तसे त्यांना सुचविल्या किंवा सांगितल्या गेले पण रावतेंनी कुटुंबसदस्यांना कायम राजकारणापासून दूर ठेवणे पसंत केले…
विदर्भ आणि मराठवाड्यात रणरणत्या उन्हात शेतांच्या बांध्यावर आरोळी ठोकून किंवा गावकऱ्यांना खेड्यापाड्यात जाऊन शिवसेना तुमच्या हिताची कशी हे समजावून सांगून आकर्षित करणारे दिवाकर रावते हे मला वाटते शिवसेनेतले पहिले आणि शेवटचेही ठरावेत कारण यापुढे सेनेला कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार आणि प्रसार करण्याची गरज उरलेली नाही दिवंगत बाळासाहेबांच्या भाषणांनी विचारांनी राज्यातले कानाकोपऱ्यातले केव्हाच भारावून शिवसैनिक होऊन मोकळे झालेले आहेत. बाळासाहेबांचे बोलणे भाषणे वागणे सारेकाही ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या पलीकडे, पुढे होते. ज्याच्या कानावर बाळासाहेब पडले तो सेनेकडे आकर्षित झाला, बाळासाहेबमय हाच इतिहास आहे. रावतेंच्या बाबतीत मला कायम खटकले ते त्यांचे वेळोवेळी काढून घेतलेले अधिकार. म्हणजे आधी त्यांनी विदर्भ बांधला मग तो त्यांच्या हातून काढून घेतला नंतर त्यांनी मराठवाड्यात सर्वत्र शिवसेना नेली, हेमंत पाटलांसारखे कितीतरी नेते आणि पट्टीचे शिवसैनिक तयार केले तेथेही तेच, रावतेंनी तदनंतर मुंबईत बोलावून घेतल्या गेले, याला कदाचित रावते यांचे शब्द आणि कडक हेडमास्तर सारखे वागणे, काहींना झोंबत असावे. दिवाकर रावते यांनी कधीही नाराजी व्यक्त केली नाही कोणताही वाईट विचार त्यांच्या मनात न आल्याने शिवसेना हेच आयुष्य त्यांचे हे कायम सांगणे खरे ठरले आहे…
www.vikrantjoshi.com
विदर्भ आणि मराठवाड्यात रावतेंनी शिवसेनेत जान आणली, ताकद वाढवली. आता त्यांना पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आलेली दिसते. जे तिकडे घडले तेच रावते इकडेही करून मोकळे होतील. पश्चिम महाराष्ट्र देखील ते भगवामय करून मोकळे होतील. बालपणी गरीब घरातला माझा एक मित्र सुट्टीत त्याच्या मामाकडे गेला कि गुटगुटीत होऊन यायचा. रावते म्हणजे शिवसेनेत त्या मित्राच्या मामासारखे. अमुक एखादा भाग त्यांच्याकडे सोपविला कि तेथे सेना स्ट्रॉंग, गुटगुटीत झाली नाही असे कधीही घडले नाही. अगदी अलीकडे कोल्हापुरात लोकसभानिवडणुकीनिमित्ते उद्धवजींना जाहीर सभा घ्यायची होती. निवडणुकांचे दिवस, अफाट मैदानावर सभा घेऊ नये असे चंद्रकांत पाटलांपासून तर सुभाष देसाई पर्यंत सर्वाना वाटत होते. पण बाळासाहेब असोत कि उद्धव ठाकरे सभांच्या गर्दीचे विक्रम राज्यातल्या कानाकोपऱ्यात मुंबईसह मोडल्या गेलेत ते रावते यांच्याच नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली. रावते म्हणालेत कोल्हापुरात थेट जेल समोर असलेल्या अतिप्रचंड मैदानावर उद्धवजींची प्रचार सभा घेऊ या, त्यांच्या या म्हणण्याला सारे हसले आणि उद्धवजी देखील चिंतेत पडले पण ऐकतील ते रावते कसले. त्यांनी तेथेच सभा घेतली आणि हि सभा गर्दीचे अनेक विक्रम मोडून मोकळी झाली. रावते कसे त्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे दाखवून दिले…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी