अळवणी विकासकामांची उजळणी : पत्रकार हेमंत जोशी
वेगवेगळ्या वयात वेगवेगळी स्वप्ने पडतात किंवा महत्वाकांक्षा असतात जसे बालवयात डॉक्टर किंवा ड्रायव्हर व्हावेसे वाटते, तरुणपणी सिनेमात काम करावेसे वाटते, महाविद्यालयात प्रेमवीर असावे सततवाटत राहते आणि नोकरीला लागलो कि केव्हा एकदाचे लग्न होते सतत वाटत राहते पण विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि आमदार पराग अळवणी यांना मात्र वयाच्या १८ व्या वर्षीत्यानंतर ते विधानसभेला निवडून येईपर्यंत आपल्याला लोकमान्य लोकप्रिय आमदार व्हायचे आहे हे असेच त्यांना सतत वाटायचे. त्यांनी एक दिवस आमदार व्हायचे ठरविले होते. केवळ वाटून उपयोगी नसते, मला देखील वाटायचे रणधीर कपूर यांचे जावई व्हावे म्हणजे करीनाशी जुळून यावे पण वाटून काही घडत नसते त्यासाठी सतत प्रयत्न सुरु ठेवावे लागतात. पराग अळवणी यांनीं १९८५ दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात पाऊल टाकले नि स्टेप बाय स्टेप त्यांनी शिखर गाठले, ते आमदार झाले. जेव्हा मुंबईत या पक्षाचे जेमतेम स्थान होते तरीही अळवणी यांनी भाजपा मध्येच काम करायचे, ठरविलेले होते …
भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजीपाला नव्हे कि कोणीही जावे आणि तेथे आमदार व्हावे. असे असते तर काहीही न करता फडणवीस देखील तेथे मुख्यमंत्री झाले असते किंवा परागजी आमदार झाले असते पण शिस्त हेच ध्येय मानणार्या या पार्टीत वयाच्या केवळ १८ व्या वर्षी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून अळवणी यांनी कार्य सुरु केले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्यानंतर भाजप युवा मोर्चा ते आजची आमदारकी सारे काही त्यांनी परिश्रमातून मिळविले, एकाचवेळी भाजपमध्ये नि विविध स्तर असलेल्या विलेपार्ले विधानसभा मतदार संघात त्यांनी हृदयस्थान मिळविले, विविध कार्यातूनन आपली वेगळी अशी छाप पाडली त्याचे मधुर फळ त्यांना पुढे मिळाले ते याआधीही आमदार झाले आणि यावेळी ज्या आत्मविश्वासाने ते निवडणूक लढवताहेत मला वाटते विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू आणि भगिनींनी त्यांना विक्रमी मतांनी निवडून नेण्याचे ठरविले आहे. सोपस्कार तेवढे शिल्लक आहेत, पराग अळवणी विधानसभेवर निवडून जाणे फक्त औपचारिकता बाकी आहे….
www.vikrantjoshi.com
पराग अळवणी यांना त्यांचा अख्खा विधानसभा मतदारसंघ यासाठी पाठ आहे कि त्यांनी स्वतः मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून सध्या त्यांच्या पत्नी ज्योती या देखील नगरसेवक म्हणून काम केल्याने त्या दोघांनाही अख्खा मतदारसंघ तोंडपाठ आहे. आळवणी सर्वांना नावानिशी ओळखतात आणि मतदार मग ते कोणत्याही स्तरावर काम करणारे असतील तेही आपल्या या आमदाराला जणू कुटुंब सदस्य मानीत आवाज देतात, पराग तर त्यांना कायम सहकार्य करण्यासाठी तत्पर असतात. नगरसेवक म्हणून काम केले असल्याने आळवणी यांना मतदारसंघात भेडसावणाऱ्या समस्या लगेच कळतात त्या अडचणी समस्या सोडवून आमदार मोकळे होतात. उगाच वेळकाढू त्यांचे धोरण नाही तसे वागणे देखील नाही…
क्रमश: हेमंत जोशी