अक्राळविक्राळ पवार : पत्रकार हेमंत जोशी
कुत्र्याच्या डोळ्यात आणि जखम असली तरी गाढवाच्या ढुंगणावर कधीही फुंकर मारू नये, कुत्रा चावायला धावतो, गाढव लाथा झाडते. सिंहाच्या आयाळीला मोह झाला तरी कुरवाळू नये आणि वाघाचे ओठ थंडीने फुटले तरी बाम लावायला जाऊ नये, कोणत्याही न्हाव्याने अस्वलाचे केस कापायचे कंत्राट घेऊ नये आणि उधळलेल्या सांडाला पाठीवर प्रेमाने थोपटण्याचा प्रयत्न करू नये. संशयी पत्नीसमोर तरुण मोलकरणीची तारीफ करू नये आणि तापट स्वभावाच्या मेव्हणीला कधीही चॉकलेट ऑफर करू नये. गौरी गणपती शिवाय पत्रकार अभय देशपांडेंकडून चहाच्या साध्या कपाची अपेक्षा ठेऊ नये आणि उदय तानपाठक याच्याशी कधीही देखण्या मैत्रिणीची ओळख करून देऊ नये. करण जोहरला कोक शास्त्राचे पुस्तक भेट म्हणून देऊ नये, वाचल्यानंतर तो तुमच्याकडेच पाठ करून उभा राहील आणि शरद पवारांना कोणीही राजकारणाचे धडे शिकवू नयेत, पुढे तुमचीच पळती भुई थोडी होईल…
एकदाचे पैसे वाटप व्हावे त्यापद्धतीने खाते वाटप झाले आहे, अपेक्षा करूया मंत्री मुख्यमंत्री कामाला लागतील. पहिल्यांदा हातून घडते ती चूक पण दुसऱ्यांदा तीच चूक हातून घडत असेल तर ती घोडचूक, जी यावेळी पुन्हा भाजपाने केली आणि आता हात चोळत बसले आहेत. इ.स. २००० च्या विधानसभा निवडणुकींनंतर बाळासाहेब ठाकरे एवढेच म्हणाले कि नारायण राणे यांना मुख्यमंत्री करावे, महत्वाची खाती तुमच्याकडे ठेवावीत पण दिवंगत गोपीनाथ मुंडे हट्टाला पेटले होते, त्यांनाच मुख्यमंत्री पदी विराजमान व्हायचे होते आणि तेथेच माशी शिंकली. त्यावेळीही शरद पवार यांनीच सेना आणि भाजपा वादाचा व हट्टाचा नेमका फायदा घेतला आणि पुढे तब्बल १५ वर्षे सतत सत्तेत फक्त आणि फक्त शरद पवार यांचाच वरचश्मा होता, शिवसेना व भाजपा युती सत्तेसाठी विव्हळत तळमळत झगडत होती. चला त्यावेळी भाजपा नेते चुकले आपण म्हणूया पण यावेळीही पुन्हा तीच चूक हे तर असे झाले कि एखाद्याला माहित असतांना तिला एड्स आहे तरीही तिच्याचसंगे पलंगावर पहुडण्यासारखे…
www.vikrantjoshi.com
यावेळीही नेमके तेच दृश्य व तेच वातावरण म्हणजे उद्धव यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, भाजपावाले पुन्हा हट्टाला पेटून म्हणाले, मुख्यमंत्री होईल तर आमचाच, पुन्हा तेच शरद पवार यांनी नेमक्या त्याच युतीच्या ताणाताणीचा नेमका राजकीय फायदा घेतला आणि अजिबात तसे वातावरण नसतांना पुन्हा एकवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारड्यात सत्तेचे माप टाकले, यावेळेही तेच भाजपावाले हात चोळत बसले. आणि हो, मागचीच पुनरावृत्ती चुकून झाली तर म्हणजे महाआघाडीने पुढे पंधरा वर्षे सत्ता आपल्या कडे अबाधित ठेवली तर, मोठी कसरत करून भाजपा नेत्यांना पुन्हा एकवार येथे या राज्यात सत्तेकडे झुकायचे आहे कारण समोर शरद पवार नावाचा सत्तेतला राजकारणातला अक्राळविक्राळ महापुरुष उभा आहे, जो राजकारणातून निवृत्त होण्याची अद्याप दूरदूरपर्यंत चिन्हे दिसत नाहीत. पवारांच्या विरोधातले त्यांच्या पाठी हे कायम म्हणतात कि म्हातारा थकतही नाही आणि निवृत्तही होत नाही, त्यांच्या या पवार यांच्याविषयी वाईट चिंतण्यावर मात्र मला वाईट वाटते आणि रागही येतो म्हणजे हे तर असे झाले कि भावाचे निधन व्हावे आणि इस्टेट मला एकट्याला मिळावी…
शरद पवार यांचे वाईट चिंतून काहीही उपयोगाचे नाही याउलट त्यांच्यापेक्षा मला कसे पुढे जात येईल याचा विचार त्यांच्याशी स्पर्धा करणाऱ्यांनी करावा. साधे गणित आहे जो पवारांना पराभूत करण्याची ताकद आपल्याकडे ठेवेल त्याला पवारांनंतर कोणीही पराभूत करूच शकणार नाही. जसा पवारांनी सेना भाजपा युतीच्या अस्वस्थतेचा नेमका फायदा घेऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले त्यापद्धतीचे वातावरण महाआघाडीमध्ये देखील आहे फक्त भाजपामध्ये देखील एक शरद पवार हवा, न घाबरता न गोंधळता लढण्याची तयारी ठेवणारा….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी