नवा प्रदेशाध्यक्ष हवा, वाजले कि तीन तेरा !!
पोरगी जेव्हा तारुण्याने मुसमुसलेली होती नुकतीच वयात आली होती तेव्हा तिला प्रचंड मागणी होती एकसे एक स्थळे तिच्याशी लग्नासाठी उत्सुक होती पण मुलीच्या आई वडिलांचा अतिआत्मविश्वास नडला प्रत्येकाला नकार दिला वेळ निघून गेली आता जुळत नाही जुळेल असेही वाटत नाही वय निघून गेले आहे मासिक पाळी देखील येणे बंद झाले आहे असे राज्यातल्या कानाकोपऱ्यात काँग्रेसचे यादिवसात झाले आहे, चारही बाजूंनी काँग्रेसला निराशेने ग्रासले आहे अपयशाने वेढले आहे, जो तो काँग्रेसपासून दूर पळतो आहे यशाचे अनेक धनी असतात अपयशाला कोणीही वाली नसतो राज्यातल्या काँग्रेसची अवस्था आज दुरदैवाने मंदिराबाहेर फेकून गेलेल्या अनौरस बाळासारखी झालेली आहे आणि या अवस्थेला स्वतः काँग्रेसच जबाबदार आहे. ज्याला त्याला विचारले जाते आहे प्रदेशाध्यक्षपद घ्या पण ज्याला विचारले जाते तो क्षणार्धात त्या पदापासून धूम ठोकतो आणि एखादा आडोसा शोधून त्यामागे लपतो. भाजपाशी पंगा घेतला तर काय कोणती किंमत मोजावी लागते हे विश्व्जीत कदम यांनी स्वतःच्या घरातून हे चटके सहन केले आहेत म्हणजे केवळ भाजपाशी पंगा घेत तिकडे मुस्लिमधार्जिण्या आणि रोहिंग्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या ममता बॅनर्जी यांना विश्व्जीत यांचे सासरे प्रसिद्ध कंत्राटदार आणि उद्योगपती अविनाश भोसले हे त्या बाईला चुकून सहकार्य करते झाले आणि क्षुल्लक कारणावरून ऐन उमेदीच्या ताकदवान भोसले त्यांच्या सुवर्ण काळात तुरुंगात खितपत पडले, त्यामुळे विश्व्जीत कदम यांनी स्पष्ट शब्दात नकार कळविला आहे, जशी भाजपाशी पंगा घेण्याची दंगा करण्याची ताकद असूनही कदम यांची ती मानसिकता नाही तेच नेमके कोल्हापूरच्या सतेज पाटीलांबाबत घडले आहे, आपणही अनेक संस्थांचे संस्थानिक आहोत, प्रचंड काळ्या पांढर्या पैशांचे तेही कंजूष मालक आहोत त्यामुळे जर सतेज तुम्ही काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्विकारले तर आम्ही सख्खे आणि सावत्र बहीणभावंडे तसेच पुण्यातले शिक्षण सम्राट जावई पी डी पाटलांसहित सारेच्या सारे तुमचाही अजितदादा करून सोडू, तुमच्याशी आज असलेले घट्ट नाते आणि संबंध तोडून टाकू अशी स्पष्ट धमकी सतेज पाटलांना त्यांच्या घरातूनच मिळाली असल्याने त्यांनी देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास त्यांच्या श्रेष्ठींना सांगून टाकले आहे…
www.vikrantjoshi.com
माझा अनिल नावाचा मित्र लग्नाचे वय टळल्यानंतर जी रस्त्याने दिसेल तिच्याकडे बघून हसायचा डोळे मिचकवायचा खाणाखुणा करायचा तरीही पुढे तो खूप वर्षे अविवाहित राहिला सुदैवाने याला जशी बायको मिळत नव्हती तशी एका शूर्पणखेला नवरा मिळत नव्हता कोणीतरी त्यांची गाठभेट घडवून आणली आणि त्यांच्या अंगावर एकदाच्या अक्षता पडल्या त्याचपद्धतीने काँग्रेसला आता एखाद्याला जबरदस्तीने रामराम करावा लागणार आहे. काही नावे पुढे आली आहेत त्यातले एक नाव पृथ्वीराज चव्हाण पण बाबांना या वयात 80 पूर्ण होत असतांना अध्यक्ष करणे म्हणजे नसबंदी केलेल्या पुरुषाकडून बाळाची अपेक्षा करण्यासारखे किंवा भाकड गाईला वासरू दे वासरू दे असे तिच्या कानात ओरडून सांगण्या सारखे म्हणून पृथ्वीराज यांचे नाव मागे पडले आहे तेच नेमके सुशीलकुमार शिंदे यांच्याही बाबतीत म्हणजे एखाद्या तरुणीकडे वृद्धाने आशाळभूत नजरेने फक्त बघणे ते वय शिंदे यांचे, वास्तविक नाना पटोले तसा दबंग प्रदेशाध्यक्ष पण नियोजन शून्य नेता स्वतः एक उत्तम रत्न पण रत्नपारखी नाही त्यामुळे ताकदवान नेते आणि कार्यकर्त्यांची फळी उभारण्यात नाना फारच कमी पडले वास्तविक सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा तसा हा अघळपघळ पक्का वर्हाडी माणूस, भाजपाच्या लाटेतही त्यांच्या नेत्यांना थेट अंगावर घेणारा एकालाही न घाबरणारा पण संघटना बांधणीत आणि पक्षातल्या नेत्यांवर दरारा निर्माण करण्यात नाना कमी पडले, तुम्ही तुमच्या परिसरात फिरा आमच्या परिसरात फिरकायचे देखील नाही, त्यामुळे मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम है हे ऐकणार्या नानांना विदर्भाव्यतिरिक्त काँग्रेसच्या इतर नेत्यांनी जवळपास वासलात टाकले, आघाडीतल्या राष्ट्रवादी
आणि उद्धवसेनेने देखील त्यांना दरदिवशी फाट्यावर मारले थोडक्यात दबंग दादा नाना पटोले यांना महाआघाडीच्याच नेत्यांनी आव्हान देत दाबून ठेवल्याने नाना यांची उचलबांगडी करण्याशिवाय त्यांच्या श्रेष्ठींकडे पर्याय शिल्लक नाही….
ज्यांच्याकडे अपेक्षेने बघावे ते पद घ्यायला तयार नाहीत आणि ज्यांना पद हवे आहे ते त्या लायकीचे अजिबात नाहीत या विचित्र अवस्थेत राज्यातली काँग्रेस सापडलेली आहे वरून सतत सारे विदर्भालाच का असा जरी इतरांचा सवाल त्यांच्या श्रेष्ठींना असला तरी विजय वडेट्टीवार नावाचा दुसरा एक दबंग नेता आणि यशोमती ठाकूर नावाची बाईमाणूस या दोघांपैकी कोणत्याही एका नावावर किंवा लातूरच्या अमित देशमुख यांच्या नावावर पुढल्या काहीच दिवसात शिक्कामोर्तब होईल असे दिसते विशेष म्हणजे हे तिघेही प्रदेशाध्यक्ष पदावर काम करण्यास उत्सुक आहेत हेही नसे थोडके. तरीही काँग्रेसचा भरवसा द्यायचा नसतो त्या गांधी कुटुंबियांच्या मनात जर आले तर उद्या ते बाबासाहेब भोसले पद्धतीने थेट डॉ गजानन देसाई किंवा संजय राऊत यांना पक्षप्रवेश देऊन त्यातल्या एखाद्याला निवडून मोकळे होतील. विशेष म्हणजे काँग्रेसचा आता शोले मधला म्हातारा गब्बरसिंग झालेला आहे त्यातला सांभा देखील जसा गब्बरसिंगच्या ढुंगणाला चिमटा काढू शकतो तेच सर्वसामान्य नेत्यांचे म्हणजे विश्व्जीत कदम थेट राहुल गांधींना तोंडावर सांगून मोकळे होतील कि मला कोणत्याही क्षणी भाजपामध्ये जायचे आहे, तुम्ही दुसऱ्याचे नाव पक्के करावे, भाजपाने पाच वर्षानंतर स्वतःची काँग्रेस करून घेऊ नये, जमिनीवर असावे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी