काँग्रेसचा फुटला फुगा नवा प्रदेशाध्यक्ष हवा :
एका गौप्य्स्फोटाने लिखाणाची सुरुवात करतो. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या घवघवीत अपयशानंतर आपला राजीनामा केव्हाच त्यांच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केला असल्याने, त्यांना राजीनामा देण्याबाबत खुद्द राहुल गांधी यांनीच तसे तोंडी आदेश काढल्याने अलिकडल्या काही दिवसात प्रदेश प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत राज्यातल्या काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी 2014 नंतर अनेकदा पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे दोघानां अनेकदा विनंती करूनही त्यांना साधी भेट देण्याचे टाळले आहे एकप्रकारे त्यांना सतत यासाठी राहुल गांधींनी अपमानित करण्याचे मुख्य कारण असे कि 2014 च्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकामध्ये मुख्यत्वे ज्या नेत्यांमुळे राज्यात काँग्रेस पराभूत झाली त्याला कारणीभूत या दोघांची जशी निष्क्रियता कारणीभूत होती नेमके ते तसेच यावेळी थेट मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघणार्या नाना पटोले यांच्याचमुळे विशेषतः त्यांच्या अहंकारी वृत्रीतून आणिअतिआत्मविश्वासातून राज्यातली काँग्रेस रसातळाला गेली आहे त्यामुळे यानंतर पटोले यांचा देखील राहुल गांधी यांनी आता माणिकराव व पृथ्वीराजबाबा करून ठेवलेला आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विधानसभेला मी त्या प्रफुल्ल पटेल यांच्या मस्तीला धूळ चाखेल अशा वलगना करणाऱ्या पटोले यांना या दोन्ही जिल्ह्यातून सहापैकी एकही आमदार निवडून आणणे शक्य झाले नाही आणि ते स्वतः देखील केवळ 208 मतांनी कसेबसे निवडून आले वरून राज्यातल्या काँग्रेसची दयनीय अवस्था करून ठेवली त्यामुळे राहुल गांधी यादिवसात मनापासून पटोलेंवर खूपच चिडले आहेत. जरी तुमचा विधानसभेला पराभव झालेला असला तरी तातडीने आपण प्रदेशाध्यक्षपद स्वीकारावे असा आग्रह विशेषतः स्वतः राहुल गांधी यांनी बाळासाहेब थोरातांकडे धरला होता पण आलेल्या नैराश्येतून लगेच मोठी जबाबदारी स्वीकारण्यात थोरात यांना काडीचाही रस नसल्याने त्यांनी हे पद नम्रपणे नाकारले आहे. नाना पटोले यांचा काँग्रेस प्रवेश झाल्यानंतर राज्यातल्या ज्या मान्यवर प्रभावी काँग्रेस नेत्यांनी पटोलेंना विरोधीपक्ष नेता किंवा प्रदेशाध्यक्ष करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती मात्र नाना यांनी अध्यक्ष झाल्यानंतर त्याच पाठीराख्या ताकदवान नेत्यांना कात्रजचा घाट दाखवत तद्दन फाल्तुक मंडळींना जवळ बाळगले आणि काँग्रेसचे वाटोळे करून ठेवले त्यामुळे यापुढे नानाच्या पाठीशी त्यांच्या पक्षातले देखील फारसे कोणी शिल्लक उरलेले नाही, जे आहेत ते फारच मामुली व राजकीयदृष्ट्या अशक्त असे नेते आहेत. नानांनी स्वतःचे व पक्षाचे बारा वाजवून ठेवले आहेत…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी