झिरो से हिरो : पत्रकार हेमंत जोशी
झिरो से हिरो होणारे म्हणजे शून्यातून विश्व् निर्माण करणारे मला अतिशय मनापासून भावतात माझ्या ते आकर्षणाचे विषय ठरतात असतात. पण मराठी माणसाची मोठे होण्याची कल्पना बहुतेकवेळा इतरांना फसवून लुबाडून श्रीमंत होण्याची असते त्यांना फार कमी वेळा ऑनमेरिट श्रीमंत व्हावे, वाटते बहुतेकांचा कल भ्रष्टाचाराचा अवलंब करून श्रीमंत होण्याकडे असतो त्यामुळे सुहास अवचट सारखे मराठी व्यावसायिक जेव्हा स्पर्धेत टिकून ऑनमेरिट मोठे होतात श्रीमंत होतात यशस्वी होतात, अशा मराठी लोकांचे मनापासून कौतुक करावेसे वाटते. एखाद्या यशस्वी माणसाचे तोंडभरून कौतुक करावे तसेही आपल्या रक्तात नाही उलट अमुक एखाद्याचे वाटोळे होणे बघण्यात बहुतेक मराठींना मनातून आवडते बघायला आवडते. कधी गेलात का सुहास आणि दीपा अवचट या उत्साही बोलक्या कष्टाळू जोडप्याच्या माहीम मधल्या गोवा पोर्तुगीज हॉटेल मध्ये, नसेल गेलात तर अवश्य जा आणि विचारा त्या दोघांपैकी कोणी आहे का तेथे, असतील तर पटकन येतील तुमच्याकडे छान गप्पा देखील मारतील जर तुम्हाला ते आवडणारे असेल, अतिशय मोठ्या मनाचे हे जोडपे, छान वाटते जेव्हा मराठी माणसाला त्याच्या व्यवसायात उत्तम यश मिळते…
जे मराठी नसलेलले या मुंबईत या राज्यात विविध व्यवसायात करून दाखवतात ते तसे करून तुम्ही देखील यश मिळवू शकता म्हणजे मी मुंबईत ज्या खार सांताक्रूझ पश्चिम परिसरात राहतो तेथे फेमस राम श्याम भेळवाला आहे, तो जोशी आहे पण राजस्थानी आहे. दररोज दुपारी चार ते रात्री दहा वेळेत भेळ आणि अन्य प्रकार हातगाडीवर विकतो. ते दोघे भाऊ आहेत पण त्यांचा हा व्यवसाय मुंबईत गेल्यातीन पिढ्यांपासून आहे, रस्त्यावर उभे राहून व्यवसाय करणाऱ्या अमराठी लोकांची त्या बिनभांडवली धंद्यावरची मिळकत आणि श्रीमंती बघून मराठी माणसाला नक्की आपली स्वतःची लाज वाटेल. जोशी बंधू गोरेगावला स्वतःच्या मालकीच्या प्रशस्त बंगल्यात राहतात आणि या मुंबईत त्यांच्या अशा कितीतरी मालमत्ता आहेत शिवाय घरातले काही सदस्य चक्क अमेरिकेत आहेत कारण श्रीमंत मुंबईकर त्यांचे दररोजचे ग्राहक आहेत अशा श्रीमंत व्यापाऱ्यांच्या डोक्याचा या बंधूंनी ज्या खुबीने वापर करून ते श्रीमंत झाले, ऐकून बघून मराठींना हे मुंबईत सहज शक्य असतांना ते मागे का त्यावर राग येतो, वाईट देखील वाटते. पश्चिम पार्ल्यात मारुती पावभाजीवाला आहे त्याचे दररोजचे रस्त्यावर केवळ पावभाजी विकून होणारे उत्पन्न असे वाटते सारे सोडावे आणि पाव भाजी विकावी…
विलास जोशी नावाचे मुंबईत एक नामांकित वकील आहेत, सुशांत त्यांचा मुलगा माझा मित्र आहे तो हॉटेल व्यवसायात आहे आणि प्रचंड यशस्वी आहे. नाशिक आणि सुरत महामार्गावर असलेले दत्त स्कॅक्स त्याच्या मालकीचे आहे याशिवाय काही विमानतळांवर त्याची दुकाने आहेत, सुशांत मेहनती आहे आणि दत्त मधल्या प्रत्येक मराठी पदार्थांची चव मला वाटते केव्हाच अगदी सातासमुद्रापलीकडे देखील पोहोचलेली आहे. स्पर्धेची मराठी माणसाने कधीही काळजी चिंता पर्वा करायची नसते. जरजे विकतो त्याचा दर्जा कायम आणि उच्च राखला तर ग्राहक तुमच्याकडे चालून येते. जेव्हा मी २१-२२ वर्षांचा होती तेव्हा जळगावला माझे थेट दररोज रस्त्यावर उभे राहून धंदा घेणाऱ्या वेश्यांच्या शेजारी शॉर्टहँड आणि टायपिंग क्लासेस होते, एक हजार विद्यार्थी त्यावेळी माझ्याकडे सकाळी पाच ते रात्री अकरा पर्यंत शिकायला यायचे. पुढे संगणक युग आल्याने मला पत्रकारितेत पूर्ण वेळ तेही मुंबईत येऊन उतरावे लागले अन्यथा मी त्यात सुखी होतो. आजही गेल्या चाळीस वर्षांपासून तेच, केवळ आठ पानांचे तेही पाक्षिक काढतो पण त्या पाक्षिकाची इतर कोणत्याही मोठ्या खपाच्या दैनिकापेक्षा अधिक चर्चा असते कारण सत्य तेवढे लोकांसमोर निर्भीडपणे मी व माझा मुलगा मांडतो, राज्यातले सारे मोठे आम्हाला व्यक्तिगत डोक्यावर घेऊन नाचतात. समाधान मिळते. माधव टेलर्स हे माझ्या विदर्भातले पण मुंबईत बसून त्यांचे अख्य्या भारतात नाव आहे आजही ते गेल्या चार दशकांपासून हिंदुस्थानातले प्रथम क्रमांकाचे नामवंत टेलर्स आहेत विशेष म्हणजे त्यांची दोन्ही मुले याच व्यवसायात सवाई आहेत. माधव मराठी आहेत ब्राम्हण आहेत. जेथे इच्छा असेल तेथे मार्ग असतो, मला तुमच्यातही उद्याचे उत्तम सर्वोत्तम व्यवसायिक बघायचे आहेत…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी