फसविणाऱ्या गंडविणाऱ्या मुसलमानांचे लाड का ?
एकदा यमदेवाने चित्रगुप्तला खोटी बोलणारी माणसे हुडकून काढण्याची मशीन तयार करायला सांगितले, चित्रगुप्ताने असे मशीन तयार केले कि माणूस खोटे बोलला की लगेच घंटा वाजायची. एकदा तानाजी सावंत कृष्णा जाधवला म्हणाले, मी कधीही भ्रष्टाचार करीत नाही तिकडे लगेच घंटा वाजली, एकदा अजित पवार गजानन पाटलांना म्हणाले मी अजिबात कंजूष नाही तिकडे लगेच घंटा वाजली, एकदा अबू आझमी त्या उद्धव ठाकरेंना म्हणाले कि माझे हिंदूंवर प्रचंड प्रेम आहे तिकडे न थांबता तासभर घंटा वाजत होती…
मला आठवते कृपाशंकर सिंग राज्याचे गृहराज्य मंत्री असतांना त्यांच्या बाळबोध वळणाच्या पत्नी मालतीदेवी सिंग यांनी कृपाशंकर सिंग यांच्या मध्यस्थीने शासकीय यंत्रणेचा उत्तम वापर करून आपल्या या राज्यात ज्या मद्य विक्री करणाऱ्या दुकाने तसेच रेस्टोरंटसची नावे हिंदू देवदेवतांच्या नावे होती त्या साऱ्यांना ती नावे बदलण्यास भाग पाडले होते, त्यावेळी त्यांची हि चळवळ बऱ्यापैकी यशस्वी ठरली होती, पुढे त्या चळवळीचे नेमके काय झाले, माहित नाही मात्र जागरूक नागरिक या नात्याने जेव्हा केव्हा हिंदूंना आपल्या या राज्यात मद्य विक्री करणाऱ्या दुकाने किंवा हॉटेल्सची नावे हिंदू देवदेवतांशी संबंधित असतील, स्थानिक हिंदुत्ववादी मर्द मंडळींनी सरकार दरबारी तक्रार करून किंवा स्थानिक आंदोलने छेडून ती बदलवून घ्यायलाच हवीत, अर्थात हा विषय मला योगी सरकारच्या उत्तर प्रदेश वरून यासाठी आठवला आहे कि उत्तर प्रदेश मध्ये जेवढे खानपान देणारे हॉटेल्स उपहारगृहे रेस्टॉरंट्स इत्यादी कुठल्याही स्वरूपात असतील, त्यातील प्रत्येकाने त्यांच्या पाट्यांवर जे मालक आहेत त्यांची नावे लिहिणे सक्तीचे केले आहे, कौतुकास्पद म्हणजे जेव्हा समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनीच हा कायदा केला होता, आता योगी यांच्या उत्तर प्रदेश सरकारने कायदयाने पुन्हा सक्तीचे केले आहे कि अमुक एखाद्या खानपान सेवा देणाऱ्या उपहारगृहाचा मालक नेमका कोण पाट्यांवर लिहिणे सक्तीचे केले आहे त्यामुळे ग्राहकांना सहज समजणे शक्य झाले आहे कि नेमके मालक कोण आहेत जे अतिशय कौतुकास्पद असे पाऊल योगी सरकारने उचलले आहे, विशेष म्हणजे उत्तर प्रदेश पाठोपाठ आता मध्य प्रदेश सरकारने देखील तातडीने हेच पाऊल उचलले आहे. भारत माता कि जय न म्हणणाऱ्या मुसलमानांच्या कोणत्याही व्यवसायाला केवळ निलाजरे हिंदूच सहकार्य करून मोकळे होतील, स्वाभिमानी देशभक्त कट्टर हिंदूंनी मात्र बहिष्कार टाकणे केव्हाही योग्य…
www.vikrantjoshi.com
नेमके हेच आता संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या या राज्यात अगदी तातडीने घडणे आवश्यक आहे, गरजेचे आहे आणि महायुतीचे सरकार जर हा बदल हा नियम करणार नसेल तर त्या विरुद्ध राज्यातल्या सनातन धर्म बजरंग दल विश्व हिंदू परिषद इत्यादी जहाल हिंदुत्ववादी संघटनांनी गरज भासल्यास तीव्र आंदोलन छेडण्याची नितांत आवश्यकता आहे, मला मुंबई पुणे ठाणे नागपूर संभाजी नगर किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या हॉटेल्सचे नेमके मालक कोण फारसे ठाऊक नाही किंबहुना अनेक हॉटेल्सचे मालक चक्क शासकीय अधिकारी देखील आहेत ज्यांनी आपला काळा पैसा या उद्योगात ओतलेला आहे किंवा मुंबईत बनाना लीफ, योको सिझलर्स, कोबे सिझलर्स, एल्को मार्केट फास्ट फूड, बार्बेक्यू नेशन, सरदार पाव भाजी, दिल्ली दरबार, घोड बंदर रोड वरील फाउंटन हॉटेल या पद्धतीचे कितीतरी रेस्टोरंटस थेट मुसलमानांच्या मालकीचे आहेत, बार्बेक्यू नेशन पद्धतीच्या रेस्टॉरंट्सचे किचन्स जर आतून तुम्ही बघितले तर तुम्हाला नक्कीच लगेचच ओकारी येईल, एवढे ते गलिच्छ आहे पण आपले अन्न व औषधी प्रशासन खाते त्याकडे का दुर्लक्ष करते, नेमके कळत नाही. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात जेथे जेथे महामार्ग आहेत तेथे असलेले बहुसंख्य आकर्षक हॉटेल्स फक्त आणि फक्त मुसलमानांच्या मालकीचे आहेत, शेकडा 80 टक्के हॉटेल्सची मालकी मुसलमानांची आहे विशेष म्हणजे या पद्धतीच्या रेस्टॉरंट्स हॉटेल्सनी उपहारगृहांनी जाणूनबुजून हिंदूंना फसविण्या त्यातल्या एकही रेस्टोरंटस किंवा हॉटेल्सला मुस्लिम जाती धर्म नावे किंवा आडनावांशी संबंधित कुठेही नाव दिलेले नसल्याने हि बहुसंख्य रेस्टॉरंट्स हॉटेल्स मुसलमानांची आहेत हे हिंदू ग्राहकांना कळत नसल्याने त्यांच्या कार्स हमखास या हॉटेल्स बाहेर गर्दी करतांना तुम्हाला जागोजाग दिसतात, आम्ही हिंदू इतके मूर्ख आहोत कि ज्या मुसलमानांना हे राष्ट्र कधीही आपले वाटत नाही हमखास सारेच हिंदू समस्त मुसलमानांच्या दुकानातून किंवा रस्त्यावर कपडे कटलरी इत्यादी अगदी गर्दी करून खरेदी करतांना दिसतात. जोपर्यंत या देशातल्या ज्या मुसलमानांना हे राष्ट्र आपले आहे, पाकिस्थान आपले राष्ट्र नाही असे वाटत नाही, तोपर्यंत पाकधार्जिण्या मुसलमानांना निदान सहकार्य करण्याची भूमिका हिंदूंची अजिबात असता कामा नये असे मला वाटते. मात्र संभाजी नगरचा तारा पानवाला पद्धतीचे राष्ट्रवादी मुसलमानांना आपण डोक्यावर घेणे कधीच चुकीचे ठरणार नाही….
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी