ईश्य ! मधुचंद्र लादला सुधीरभाऊ रुसला तरी हसला :
फार पूर्वी आम्ही तारुण्यात पदार्पण केले तेव्हा ‘ ब्रम्हचर्य हेच जीवन ‘ या पुस्तकाच्या आत आकर्षणापोटी अनेकदा चावट पुस्तके वाचून काढत असू, त्यातल्याच एका अश्लील कथेत मधुचंद्राची रात्र आटोपल्या उरकल्यानंतरच्या सकाळी नवरा नववधूला विचारतो, मला तू आधीच सांगितले कि तुझे गावातल्या पम्यावर प्रेम होते कितीतरी वेळ तुमचा उसाच्या फडात वेळ जायचा मग काल रात्री तुझी अवस्था कशी होती, त्यावर नववधू म्हणते हे खरे आहे कि रात्र तुझ्यासंगे घालवली पण नजरेसमोर सतत पम्या होता तरीही फारसे दुःख झाले नाही कारण एखाद्याने तोंडात जबरदस्तीने साखर कोंबली म्हणून का ती कडू लागते? या वाक्यातली नववधू आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार या दोघात प्रत्येक बाबतीत कमालीचे साम्य कसे आहे हेच येथे तुम्हाला नेमके सांगायचे आहे. जो तो सांगत सुटलाय कि सुधीर मुनगंटीवार यांचा स्वतः देवेंद्र फडणवीसांनी गेम केलाय, त्यांना महाराष्ट्रात तगडा प्रतिस्पर्धी नको होता म्हणून त्यांनी सुधीरभाऊंचा अचूक गेम केला, या अफवेला अजिबात अर्थ नाही किंबहुना फडणवीस अमुक एखाद्या तगड्या नेत्याला दिल्लीत पाठविण्याची कधीही चूक करणार नाहीत आपल्याच पायावर विनाकारण धोंडा मारून घेणार नाहीत. अगदीच ऑफ द रेकॉर्ड येथे सांगायचे झाल्यास विनोद तावडे दिल्लीत गेले तेव्हा वाटले कि तावडे येथे राज्यात संपले पण तसे अजिबात घडले नाही किंबहुना यादिवसात विरोधी पक्षातल्या नेत्यांपेक्षा फडणवीसांना तावडेंच्या दग्याफटक्याची अधिक विशेष काळजी घ्यावी लागते याउलट येथे राज्यात असलाच एखादा अंतर्गत नेता त्रास देणारा डोकेदुखी निर्माण करणारा पंगे घरणारा तर त्याचा काटा काढणे किंवा त्याला वठणीवर आणणे किंवा त्याचा खडसे करणे अधिक सोपे असते त्यामुळे मुनगंटीवार किंवा आशिष शेलार इत्यादी चार दोन नेत्यांना दिल्लीत पाठवून त्यांच्यापासून होणारी कळत नकळत डोकेदुखी घालवावी असा कधीही कुठलाही पोरकट विचार करणारे फडणवीस अजिबात असे एवढे हलकट नाहीत किंबहुना शेलार यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार देताच फडणवीस किंवा दिल्लीतले भाजपा नेते लगेच दुसरीकडे वळले, दुसरा तुल्यबळ उमेदवार शोधाया लागले…
www.vikrantjoshi.com
सुधीर मुनगंटीवार उत्तम वक्ते आहेत उत्साही महत्वाकांक्षी नेते आहेत विशेषतः चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, प्रेयसीच्या नवऱ्याचा मृत्यू व्हावा आणि ती पुन्हा आपल्या आयुष्यात यावी यापद्धतीच्या स्वप्नात रंगणारे सुधीरभाऊ म्हणजे रस्त्यातील तगडा प्रतिस्पर्धी कुठल्याशा निमित्ताने काट्यासारखा दूर फेकल्या जाऊन आपल्या गळ्यात एकदिवस नक्की मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल असे काहीसे रोमांचित करणारे स्वप्न बघणारे सुधीरभाऊ अर्थात त्यात वावगे असे काहीही नाही पण दिल्लीत गेल्याने बघितलेले स्वप्न अधुरे राहिले राहील असे त्यांना वारंवार वाटणे स्वाभाविक होते पण स्वतः शाह आणि मोदी यांना चंद्रपूरातून उत्तम प्रतिनिधी पुढे गडकरींऐवजी खास विदर्भासाठी तयार करायचा होता त्यातून थेट सुरुवातीला नकार देणाऱ्या नाराज असणसर्या सुधीरभाऊंना मोदी शाह यांनी जातीने उमेदवारी स्वीकारण्याचे आदेश दिले पण त्यात फडणवीसांना उगाचच गोवल्या गेले बदनाम केले. सुधीरभाऊ त्या नववधूसारखी हि नक्कीच जबरदस्तीने तुमच्या तोंडात कोंबलेली साखर आहे पण ती खात्रीने कडू लागणार नाही. आता तुमचा नवा प्रियकर दिल्ली, मुंबई नावाच्या प्रियकराला विसरून जा. दिल्लीला करकचून मिठीत घ्या, दिल्ली एन्जॉय करा आणि गडकरी बनून किमान विदर्भाचा विकास करा…
उद्याचा निकाल आजच सांगतो, सुधीर मुनगंटीवार मोठे मताधिक्य घेऊन निवडून येतील, अर्थात माझ्या एकेकाळच्या जवळच्या मित्राची म्हणजे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी महाआघाडीच्या काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांचा नक्की पराभव होईल. वास्तविक जातीच्या समीकरणाचा विचार केल्यास धानोरकर त्यात तुल्यबळ ठरतात पण जेथे सुधीरभाऊ तेथे विशेषतः अख्य्या चंद्रपूर जिल्ह्यात कुठलाही मतदार जात किंवा पक्ष न बघता हमखास सुधीरभाऊंच्या पाठीशी उभा असतो त्यात यादिवसात चंद्रपूर लोकसभा मतदार यासाठी अस्वस्थ आहेत कि बाळू यांना त्यांनी निवडून आणले होते पण धानोरकर सत्तेविरोधातले खासदार असल्याने सतत पाच वर्षे विकासाचा मार्ग खुंटला ज्याचा फायदा इतरांना झाला आणि मतदार संघ कोरडाच राहिला, नेमकी हीच चूक त्यांना यावेळी करायची नाही, काहीही झाले तरी विकास कामात खोडा आणायचा नसल्याने मुनगंटीवार हेच पुढले खासदार आहेत. दुर्दैव असे कि नाही म्हणायला एकाच घरातून पती खासदार आणि प्रतिभाताई आमदार झाल्या पण त्यादेखील काँग्रेसच्या त्यामुळे एका स्त्रीला तेही सत्तेच्या विरोधात असल्याने फार मोठया मर्यादा आड आल्या त्यामुळे प्रतिभा धानोरकरांचे विधानसभा मतदार संघातले गावकरी देखील यादिवसात विकास खुंटल्याने अस्वस्थ आहेत त्यातून यावेळी प्रतिभा यांना आधी खासदारकीच्या पराभवाला सामोरे जावे लागेल त्यानंतर त्याच पद्धतीने त्यांना थेट विधान सभेत देखील नामुष्की सहन करावी लागेल. अत्यंत महत्वाचे म्हणजे आजतागायत स्वतः धानोरकर कुटुंबाला त्यांच्या त्या त्या वेळेच्या पदांचा आमदारकी खासदसरकीचा केवळ व्यक्तिगत अतिश्रीमंत होण्यातच मोठा फायदा झाला असे जाणकार मतदारांचे मत म्हणजे धानोरकर दाम्पत्याने त्यांच्या त्या त्या वेळेच्या विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघात विकासाच्या बाबतीत काहीही केलेले नाही हा बहुसंख्य मतदारांचा अगदी उघड आक्षेप, सुधीरभाऊ तुम्हाला राजकारणात आणखी यापुढे फार मोठे होण्याची मोठी संधी आहे, घालवू नका…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी