वीज खाते बदनाम करते नामुष्की ओढवते
तरीही त्यांचे आवडते :
फार पूर्वी मी जळगावला ज्या बळीराम पेठ परिसरात राहून विद्यादानाचे खूपच मोठ्या प्रमाणावर काम करीत असे त्याच बळीराम पेठेत माझ्या अगदी शेजारी, मोहोल्ल्यात, सभोवताली सतत वेश्याव्यवसाय गुंडगिरी नाचगाणी तमाशाचा फड याचा एवढा राबता होता कि मनात अनामिक भीती असायची, लोकांना मी देखील यातल्या एखाद्या गलिच्छ क्षेत्रात अडकलेला कि काय, अशी शंका येऊ शकते पण तसे अजिबात घडले नाही याउलट अगदी उच्चभ्रूंपासून तर सुशिक्षित घरातले जवळपास एक हजार विदयार्थी विद्यार्थिनी सकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत माझ्याकडे टायपिंग विशेषतः शॉर्टहँड शिकायला यायचे, आम्हा दोघांचीही त्यात मास्टरी होती, माझा हा इतिहास मला आज अचानक त्या देवेंद्र फडणविसांवरून आठवला म्हणजे ऊर्जा उर्फ वीज खाते हा प्रत्येकाचा सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय, शेतकऱ्यांचा आणि कारखानदारांचा व्यवसायिकांचा तर जीवनमरणाचा विषय, या खात्यात चांगले काम केले तर सत्तेतल्या पक्षाचे, मंत्रिमंडळाचे ऊर्जा मंत्र्यांचे मनापासून कौतुक होते आणि चुकलात तर दुपटीने बदनामी होते, पैसे खातात म्हणून दुर्लक्ष करतात जनतेला सतत त्रास देतात हे आरोप अगदी उघड किंबहुना आंदोलन करून रस्त्यावर उतरून, सभागृहात, विरोधकांच्या भाषणातून, मीडियाला हाताशी धरून केले जातात, कदाचित ऊर्जा खात्याचा मंत्री या नात्याने वीज महामंडळातल्या अंदाधुंदीत एखाद्याचा सहभाग संबंध जरी नसला तरी दारूच्या गुत्त्यावर मॅनेजर म्हणजे नक्कीच बेवडा असेल पद्धतीची बदनामी केल्या जाते पण जेथे आव्हान किंवा जेथे सर्वसामान्य जनतेच्या जीवनमरणाचा प्रश्न ते काम स्वीकारायचे हा त्या देवेंद्र फडणवीसांचा कायमस्वरूपी स्वभाव, जेथे बदनामीचा फास अगदी सहज गळ्यासभोवताली शंभर टक्के अडकणार आहे हे पक्के माहित असूनही विषारी नागाच्या बिळात आपणहून हात घालणारे एकमेव फडणवीस…
www.vikrantjoshi.com
महापालिका ते मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता आणि खडतर कार्यकाळातील भाजपा नेता, फडणवीसांची अशी दीर्घ अनुभवी वाटचाल, अगदी सुरुवातीपासून विश्वासू अभ्यासू मेहनती आणि मिशन समजून जबाबदारी उचलण्याची आवड असणारे सवंगडी किंवा शासकीय स्टाफ नेमका निवडण्यात फडणवीसांची मास्टरी विशेष म्हणजे अमुक एखाद्या कामाची जबादारी तमुकवर टाका असा सल्ला देणारे त्यांना रुचत नाहीत, नकळत ते योग्य,राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत कष्टाळू लॉयल राहणारी माणसे शोधत असतात त्यांना ती सापडतातही. त्यातून महत्वाच्या पदांवर अशांची निवड करतात, विशेष म्हणजे काम करणाऱ्यांच्या पाठीशी ते ठामपणे उभेही असतात. आधी ऊर्जा खाते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असताना आणि आज स्वतःकडे असतांना, म्हणजे ज्या ऊर्जा खात्याने बावनकुळेंना फार मोठे केले त्यापाठी, ज्याचे मी येथे कौतुक केले तर त्याला स्वतःला ते रुचणारे नाही नसेल पण उल्लेख आवश्यक त्या विश्वास पाठक यांनी ऊर्जा खात्याला दिलेले योगदान केलेले करीत असलेले काम केवळ त्यातून अत्यंत कटकटीचे पण तेवढेच मोलाचे ऊर्जा खाते आणि ऊर्जा खात्यातील प्रत्येक महामंडळ फडणवीसांना विनाबदनामी सांभाळता तर आलेच पण राज्यातले प्रत्येक कुटुंब विशेषतः बावनकुळे ऊर्जा खात्याचे मंत्री होईपर्यंत त्यानंतर आज स्वतः देवेंद्र फडणवीस, मित्रांनो, जनता भर उन्हाळयात किंवा इतरवेळी देखील विजेअभावी आंदोलन करण्या रस्त्यावर उतरली, हि जी दृश्ये शोधूनही सापडत नाहीत त्यात फडणवीसांची ‘ विश्वास पाठक ‘ हि अचूक योग्य निवड आणि स्वतःचा ऊर्जा खात्यावर असलेला सखोल अभ्यास तंतोतंत माहिती आणि खात्यातील अनेकांशी सततचा संपर्क, फडणवीसांचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतात…
बघा किती हा अप्रतिम योगायोग कि आजमितीला जशी अगदी बारीकसारीक माहिती त्या बावनकुळे आणि फडणवीसांना आहे सत्य असे कि जसे अर्थ खात्यावर सुरेश प्रभू यांच्या नावाला देशमान्यता आहे तेच ऊर्जा विषयी विश्वास पाठक आघाडीवर आहेत विशेष म्हणजे तिघेही ऊर्जा एक्स्पर्ट भाजपाचे कट्टर आहेत आणि ऊर्जेची झळ जनतेला न बसू देण्याची मोठी जबाबदारी यशस्वी कामगिरी याच तिघांनी आळीपाळीने पार पाडली आहे, फडणवीस व पाठक तर आजही ऊर्जा खात्याचे यशस्वी व जबाबदार मसीहा म्हणून राज्यात ओळखल्या जाताहेत किंबहुना त्यांची हि मोठी ओळख आहे. वाचकहो, प्रस्तावनाच जर संपता संपत नाही तर ऊर्जा खात्यातली फडणवीसांनी पेललेली जबाबदारी आणि नेमकी कामगिरी त्यावर कदाचित मी कादंबरी किंवा एखादा ग्रंथ लिहिण्याचा काढण्याचा सिरीयस विचार करतोय, दीडशे किलो वजनाचा माझ्या ओळखीचा एक मधुचंद्राला गेला आणि परतल्यानंतर त्याच्या नाजूक पत्नीचा जसा उसाचा चिपाड झाला होता तेच नेमके आता याठिकाणी माझे झाले आहे म्हणजे ऊर्जा खात्यातली फडणवीसांनी घेतलेले निर्णय आणि पार पाडलेली कामगिरी त्यावर याच खात्यातल्या शाळकरी विद्यार्थ्यांसारख्या दिसणाऱ्या हर्षल भास्करे नावाच्या अधिकाऱ्याने जी माहिती मला उपलब्ध करून दिली ती वाचता वाचता माझी दमछाक झाली मला धाप लागली. एवढेच सांगतो कि आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा जीवनमरणाचा विषय एकमेव ऊर्जा खाते, ते मंत्री या नात्याने फडणवीसांकडे किंवा पाठक पद्धतीच्या कर्तबगार मंडळींकडे नक्की सेफ आहे, विजेचा लपंडाव हा शब्द विसरून जा…
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी