ब्राम्हण वाद कि ब्राम्हण द्वेष :पत्रकार हेमंत जोशी
ना चुकले शरद पवारांचे ना चुकले नरेंद्र मोदी यांचेही मात्र त्यातून मोठे नुकसान नरेंद्र मोदींच्या भाजपचे या राज्यात झालेले आहे हि वस्तुस्थिती आहे. विधान सभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात सरकार बनविण्याच्या दृष्टीने जेव्हा शरद पवार नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी मोदी यांना एवढेच सांगितले कि मी आणि तुम्ही मिळून नक्कीच महाराष्ट्रात आपली सत्ता आणायची आहे मात्र मला देवेंद्र फडणवीस व्यतिरिक्त इतर कोणतेही मुख्यमंत्री पदासाठी नाव सुचवा, फक्त माझी एवढीच अट आहे. त्यावर नरेंद्र मोदी म्हणाले कि आमचे तर ठरलेले आहे आम्हाला पुन्हा फडणवीसांनाच मुख्यमंत्री करायचे आहे. येथेच सारे बिनसले, पुढला इतिहास ताजा आहे जो जसाच्या तसा तुम्हाला आम्हाला तोंडपाठ आहे. शरद पवार यांच्या मनात फडणवीसांविषयी एकप्रकारे निर्माण झालेली नफरत त्यात मोठी चूक आपल्या राज्यातल्या समस्त ब्राम्हणांची आहे, ब्राम्हणांनी यावेळी भाजपाचे, फडणवीसांचे आणि राज्याचे कसे मोठे नुकसान केले त्यावर मला नेमके सांगायचे आहे. आणि ब्राम्हणांचे हे असेच वागणे सुरु राहिले तर सध्या ब्राम्हण विरुद्ध मराठा वाद एवढ्यावरच थांबणार नाही तर इतरांच्याही मनातून ब्राम्हण उतरतील, पुन्हा मागल्यासारखे स्वतःचे मोठे नुकसान करवून घेतील…
माझे अतिशय आवडते नेते देवेंद्र फडणवीस यांना मी आत बाहेर नेमके ते कसे जेवढे ओळखतो तेवढे त्यांना मला नाही वाटत फार कोणी ओळखणारे असतील अनेकांना त्यांचे अनेक गुण किंवा काही दोष तेवढे माहित असतील पण देवेंद्र नेमके समजावून घेणे कठीण असे काम आहे आणि ते काम मला नक्की जमलेले आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मनात त्यांच्या जातीविषयी शंभर टक्के आदर होता प्रेम होते पण त्यांना आपल्या जातीचे राजकारणात म्हणजे सत्तेत आलो आहोत म्हणून कधीही अवडंबर अजिबात माजवायचे नव्हते, ते वातावरण काही मूठभर ब्राम्हणांनी निर्माण केले. संघातले काही ब्राम्हण आणि राज्यातल्या बहुतेक साऱ्या विविध ब्राम्हण संघटनांनी त्यावर अतिरेक केला, ज्यामुळे खुद्द फडणवीस आणि त्यांच्यांभाजपाचे मोठे नुकसान झाले आहे. कधी मोर्चे काढायचे विशेषत: सोशल मीडियाने मोठा घात केला, फडणवीस फक्त कसे ग्रेट आणि इतर कसे नालायक पद्धतीने जे काय सोशल मीडियावरून समस्त ब्राम्हणांनी गोंधळ घातला त्यांनी पुन्हा स्वतःचे तर मोठे नुकसान करवून घेतले आहेच पण एका सर्वगुणसंप्पन्न नेत्याला विनाकारण अडगळीत जावे लागलेले आहे. ब्राम्हणांना, केवळ संघाला स्पेशल ट्रीटमेंट असे फडणवीसांच्या मुख्यमंत्री म्हणून कधीही संकुचित पद्धतीने मनात नव्हते, कायम ते खालची मान वर न करता म्हणजे पुढ्यात कोण कोणत्या पक्षाचा किंवा कुठल्या जातीचा न बघता ज्याला त्याला मदत आणि मनापासून सहकार्य करायचे….
राज्यातल्या ब्राम्हणांनी चांगले काम करायचे असेल तर त्यांनी पाच टक्क्यावरून दहा टक्क्यांकडे कसे जाता येईल म्हणजे आपली संख्या आपला जन्मदर कसा वाढविता आधी ते बघावे, तेथे मात्र आम्ही सर्वात मागे, बहुतेक जोडप्यांना एकच मूल, तेथे आधी लक्ष घाला अन्यथा बहुतेक ब्राम्हण परदेशात निघून गेले आहेत आणि उरले सुरले जर एकच मूल हवे पद्धतीने वागले तर तो दिवस फार दूर नाही जेव्हा आमची देखील तुलना पारशी समाजाशी केली जाईल. फडणवीसांच्या ना कधी मनात होते ना कधी मनात असेल कि ते केवळ ब्राम्हणांचे नेते आहेत किंवा संघातल्या मूठभर ब्राम्हणांचे ते नेते आहेत. चूक फडणवीसांची नाही, सोशल मीडियावर त्या पाच वर्षात दर दिवशी घाण करणाऱ्या त्या समस्त ब्राम्हणांची आहे ज्यातून शरद पवारांना किंवा काही मराठ्यांना आज उघड आपल्याला विरोध करावा लागतो आहे. मुख्य प्रवाहात स्वतःला झोकून देणे हेच आज योग्य ठरणारे आहे, आम्ही कसे वेगळे यापद्धतीने जर पुन्हा ब्राम्हणांनी आपले वर्तन सुरु ठेवले तर आपल्याविषयी द्वेष नफरत राग नक्की वाढत जाईल. तावून सुलाखून कसे तरी आपण समस्त ब्राम्हण विशेषतः गांधी वधानंतर त्यातून बाहेर पडलो होतो, इतरांच्या मनातला राग काढून आपण त्यांच्यातलेच एक म्हणून वावरायला लागलो होतो. मध्येच हे असे फडणवीसांच्या काळात माज आल्यासारखी काही मूठभर मंडळींनी विनाकारण चूक केली ज्यातून पुन्हा पूर्वीचे दिवस आपल्यावर कोसळलेले आहेत, असे वागू नये. आम्ही फक्त वेगळे कसे असे आगाऊ प्रदर्शन करू नये…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.