खळबळजनक : भाकीत खरे ठरणारे, द्विपक्षीय राजकारणाकडे :
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे नेते आहेत ते पक्षाचे बोलघेवडे प्रवक्ते नाहीत त्यांच्या बोलण्यातून मुलाखतींमधून, उचलली जीभ लावली टाळूला, असे आजतागायत कधीही घडतांना कोणीही बघितलेले नाही, पृथ्वीराज एवढे स्पष्टवक्ते आहेत कि ते जसे मुख्यमंत्री असतांना थेट राष्ट्रवादीवर बोलण्यातून आणि कृतीतून तुटून पडायचे त्यांचे हे असे हुबेहूब वागणे बोलणे जसे विरोधकांना अस्वस्थ करते प्रसंगी हेच पृथ्वीराज आपल्या पक्षातल्या बेशस्तीची तेवढीच कठोरतेने दाखल घेतात आणि काँग्रेस मधल्या नेत्यांवर देखील प्रसंगी तुटून पडतात, अशोक चव्हाण यांच्याऐवजी मला खर्या अर्थाने शंकरराव चव्हाण यांच्या वागण्या बोलण्याची हुबेहूब नक्कल करणारे पृथ्वीराज वाटले, नेमकी हीच वस्तुस्थिती आहे. पृथ्वीराज यांनी 9 जुलै 2023 च्या लोकसत्ता दैनिकाला जी मुलाखत दिली होती, त्यातली त्यांची वाक्ये खरी ठरणार आहेत एवढी ती माहितीपूर्ण आणि दूरगामी दूरदर्शी ठरणारी आहेत. पृथ्वीराज म्हणाले होते, ” अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यातील सारीच राजकीय समीकरणे बदलली आहेत असे असताना, अजित पवार हे मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता आता कमी झाली असल्याने भाजप शिंदे यांच्या ऐवजी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देऊ शकतो. वर्षभराच्या अंतरात शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या बंडामुळे राज्याचे राजकीय चित्र बदलू लागले आहे. राज्यात यापुढील काळात काँग्रेस आणि भाजपा दोन पक्षांनाच थारा मिळेल ” त्या मुलाखतीतील केवळ या एका परिच्छेदातुन पृथ्वीराज चव्हाण जे काय त्यावेळी बोलून गेले आहेत त्यांच्या या एकंदर मुलाखतीवर, भाष्यावर बोलण्यावर मी त्यांच्यावर फिदा झालो आहे, लव्ह यु बाबा…
www.vikrantjoshi.com
केवळ वरील काही वाक्यातून राज्याच्या राजकारणाचे संदर्भ कसे बदलणार आहेत अभ्यासातून निरीक्षणातून त्यांनी हे सांगून टाकले आहे. यापुढे काँग्रेस आणि भाजपा हे दोनच महत्वाचे पक्ष म्हणजे मोठ्या खुबीने राष्ट्रवादी आणि शिवसेना संपलेली आहे संपवून टाकण्यात आली आहे, नेमकी वस्तुस्थिती त्यांनी मुलाखतीमधून विशद केली आहे. यापुढे काँग्रेस आणि भाजपा वगळता राष्ट्रवादी शिवसेना किंवा इतर पक्ष केवळ औषधापुरते किंवा तोंडी लावण्यापुरते हे नेमके स्टेटमेंट त्यांनी जे केले आहे ते नक्कीच खरे ठरताना निदान माझ्यातरी ते लक्षात आलेले आहे. त्यांचे खरे कौतुक वाटले ते त्यांनी जे भाकीत विशेषतः अजित पवार आणि एकनाथ शिंदे विषयी केले आहे, वास्तविक शिंदे हे माझे आवडते लाडके मुख्यमंत्री पण शिंदे यांना पृथ्वीराज यांनी दिलेला बदलाचा इशारा, त्यात या दिवसात माझ्या माहितीतून मोठे तथ्य आहे आणि हि परिसस्थिती शिंदेंवर त्यांच्या जवळच्या जमा केलेल्या आणि जमा झालेल्या मंडळींमुळे तसेच वादग्रस्त भ्रष्ट बहुतांश नालायक मंत्र्यांमुळे ओढवली आहे किंवा ओढवणार आहे ज्यावर मी कायम अगदी सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांना सावध करीत आलेलो आहे ज्याचा मोठा राग श्रीकांत एकनाथ शिंदे यांना आलेला असल्याची माझी पक्की माहिती आहे, मला श्रीकान्त यांनी ओळखले नाही, मला ज्याचे फार वाईट वाटले. वास्तविक पृथ्वीराज चव्हाण यांचा नावडता माणूस नेता म्हणजे अजित पवार पण स्पष्टवक्त्या आणि प्रामाणिक पृथ्वीराज चव्हाण यांनी मुलाखतीमधून अजित पवार कसे पुढले मुख्यमंत्री हेही सांगून टाकले आहे. अर्थात माझी चॉईस देवेंद्र फडणवीस असल्याने अजित पवारांना संधी, हे वाक्य मनाला चाटून गेले….
क्रमश: हेमंत जोशी