राज आणि उद्धव त्यांची युती व नाती, हा प्रकार भानामती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघातले नाते त्या सरगम सिनेमातल्या ऋषी कपूर आणि जया प्रदा या नायक नायिकेसारखे आहे म्हणजे त्या सिनेमात नायक त्या नायिकेला प्रेमात पाडतो बाहुपाशात घेतो तिच्याशी लग्न करतो तरी तिला शेवटपर्यंत मालकीन म्हणतो कारण जयाप्रदा त्याच्या मालकाची पोरगी असते, येथेही नेमके तेच म्हणजे आज शिंदे या राज्याचे राजे, प्रमुख, मुख्यमंत्री तरीही त्या दोघांची अलीकडे जेव्हा केव्हा गाठभेट होते, एकनाथ यांच्या चेहर्यावर किंवा त्यांच्या बोलण्यातून तो मालकीन फील कायम जाणवतो. आता याच राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याचे त्यांच्या युतीचे स्वागत दादरमध्ये शिवसेना भवन आणि राज ठाकरे यांच्या निवासस्थानादरम्यान काही अति उत्साही स्वप्नाळू मनसैनिकांनी झळकावल्याचे समजले. मनसैनिकांची मनसेतल्या अनेक नेत्यांची अवस्था ऐन मधुचंद्र ज्या रात्री साजरा करायचा असतो त्याच दुपारी नववधूची मासिक पाळी आल्यानंतर त्यातला नववर याच्या हाती जसे दात ओठ खाण्यापलीकडे काही उरलेले नसते हुबेहूब ती अवस्था या अशा उतावीळ झालेल्या बहुसंख्य मनसे सैनिकांची आणि त्यांच्या नेत्यांची देखील यासाठी झाली आहे कि केवळ राज यांच्या स्वभावाचा नेतृत्वाचा वागण्या बोलण्याचा तो करिष्मा, म्हणून ते सारे आजही जरी मनसेला घट्ट बिलगून पकडून असले तरी केव्हा एकदा आपण सत्तेत जाऊन बसतो असे त्यातल्या अनेकांचे होते मग त्यांच्या जेव्हा केव्हा अशा सत्तेच्या आशा पल्लवित होतात, असा तद्दन चुकीचा आनंद व्यक्त करून ते मोकळे होतात, मासिक पाळी खूप दिवस लांबावी आणि इकडे नवर्याच्या हाती चरफडण्यापलीकडे हाती काही न उरावे तसे अनेक असंख्य मनसे सैनिक आणि नेत्यांच्या मनाचे अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे…
www.vikrantjoshi.com
लागलेला जो डाग अजित पवारांनी जसा लगेच काही वर्षात धुवून पुसून स्वच्छ केला ते तसे वागणे निर्णय घेणे उद्धव ठाकरे यांना न जमल्याने ते आपला करिष्मा हळहळू घालवून बसत चालले आहेत. त्या शपथविधी नंतर लगेचच काही तासात हेच अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला पाठ दाखवून काकांकडे जसे निघून गेले त्यानंतर त्यांना लगेच सत्ता मिळाली खरी पण अजितदादा देखील काका शरद पवार यांच्याच सारखे पाठीत खंजीर खुपसणारे अशी त्यांचीही प्रतिमा साफ डागाळली आणि इकडे त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र झालेल्या या दगा प्रकरणाने त्यांचे राजकीय विरोधक देखील पूर्वीपेक्षा अधिक प्रेम करू लागले जे अजित पवारांच्या लक्षात आल्याने त्यांनी पुन्हा एकदा काकाला सोडले आणि अगदी जाहीर आपला हात आपल्या या मित्राच्या हातात दिला आणि दगाबाज धोकेबाज अशी डागाळलेली प्रतिमा दादांनी धुवून काढली. नेमके तसे करणे निर्णय घेणे उद्धव यांना जमले नाही आणि येथेच ते राज्यातल्या समस्त विविध विचारांच्या नेत्यांचा विश्वास गमावून बसले. प्रत्येक वेळी राज उद्धव युतीची एकत्र येण्याची हूल स्वतःच उद्धव उठवून देतात नंतर पुन्हा अलगद कसे बाजूला होतात हे मी स्वतः अगदी जवळून 2014 आणि 2019 मध्ये बघितले आहे किंबहुना आपल्या काही निवडक मुलाखतींमधून राज ठाकरे यांनी सारे पुरावे उघड केले आहेत. आता तुम्हाला अतिशय अतिशय महत्वाचे सांगतो कि अलीकडे यावेळी त्या दोघांच्या एकत्र येण्याची हूल पुन्हा उद्धव यांनीच उठवलेली आहे त्यांच्या गटातून गोटातून तसे मुद्दाम यासाठी पसरविल्या गेले आहे यासाठी कि यादिवसात गेल्या काही वर्षात राज आणि अनेक मनसे नेत्यांचे विशेषतः फडणवीस शिंदे आणि सत्तेच्या जवळ येणे हे उद्धव पेक्षा शरद पवार यांना अधिक अस्वस्थ करते आहे त्यातून राज आणि मनसे यांचे महत्व कमी करण्यासाठी शरद पवार यांनी हि अशी हूल उठविण्यास सांगितल्याची माझी पक्की माहिती आहे…
माझी दिवंगत आई मला सर्वश्रेष्ठ, तिची शपथ घेऊन सांगतो कि पवार आणि उद्धव यांच्या विषयी असलेल्या कोणत्याही रागातून तिरस्कारातून द्वेषातून मी हे माझ्या मनातले येथे तुम्हाला सांगितलेले नाही पण नेमके जे घडले घडवून आणण्यात आले तेच येथे सांगितले. वाचकांनो, राज आणि उद्धव आणि यांचे राजकीय पक्ष यांची नजीकच्या काळात कोणतीही भेट ठरलेली नाही त्यांचे नक्की नक्की एकत्र येणे नाही त्यांचे तसे बोलणेही अजिबात झालेले नाही याउलट हा लेख लिहीत असतांना देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी राज ठाकरे यांचे खास नितीन सरदेसाई आणि फडणवीस या दोघात दीर्घवेळ भेट झाली चर्चा झाली अत्यंत महत्वाचे बोलणे झाले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या मनातले मी याठिकाणी मनसे नेत्यांना सांगतो कि एखाद्या सार्वजनिक कामात तुम्हाला मनापासून सहकार्य हवे असल्यास तुम्ही त्यांची दारे उघडून केव्हाही जा ते तुमच्यासाठी राज यांच्या प्रेमाखातर शंभर टक्के धावून येतील. काका शरद पवार यांच्या हुबेहूब पावलावर पाऊल त्यांच्या आघाडीतल्या नेत्याने म्हणजे उद्धव यांनी ठेवलेले आहे आता हि अशी दगाबाजी करणे त्यांच्याही अंगवळणी पडलेले आहे. उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर सुरुवातिला पडले नसते तर आज हे असे काही घडले नसते पण सर्वकाही केवळ आपल्या साठी आणि आपल्या कुटुंबासाठी या भावनेतून या स्वार्थापोटी ते बाहेर पडले आणि सत्तेत जाऊन बसले खरे पण पुन्हा त्याच मातोश्रीवर जाऊन गाडा हाकू लागले आणि तेथेच ते अडचणीत आले उघडे पडले बदनाम झाले, असे त्यांनी वागायला नको होते, इतरांसाठी सर्वोच्च नेत्याने जगायचे असते हे ते विसरले आणि लयाला गेले, वाईट वाटते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी