मुंबईचा कलंकित नागपूरच्या निष्कलंकीतला कलंक म्हणाला

मुंबईचा कलंकित नागपूरच्या निष्कलंकीतला कलंक म्हणाला

तो मुस्लिम असेल बौद्ध असेल मराठा असेल ख्रिश्चन असेल माळी असेल तेली असेल मारवाडी गुजराथी असेल थोडक्यात काय 10 जुलै रोजी विदर्भातल्या प्रत्येक जातीचा विविध विचारांचा कोणत्याही कुठल्याही धर्माचा घराघरातला प्रत्येक व्यक्ती ज्याला समजते सामाजिक जाण आहे अशी प्रत्येक व्यक्ती मनापासून मनातून खूप खूप खूपच दुखावली कारण मुंबईच्या एका आत बाहेर कलंकित असलेल्या नेत्याने त्यांच्या एका लाडक्या हृदयस्थ निष्कलंकीत नेत्याला चक्क कलंकित म्हणून ठरवून ते मोकळे झाली आणि विदर्भातले माझ्या कुटुंबासहित सारेच थेट उद्धव ठाकरे यांच्यावर चिडले रागावले संतापले विशेष म्हणजे उद्धव आम्हा सर्वांच्या मनातून थेट देवेंद्र यांना त्यांनी कलंकित ठरविल्याने साफ उतरले कारण देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दोघांबाबत इतरांचे वैचारिक व राजकीय मतभेद असू शकतात तरीही हे दोघे विदर्भातल्या प्रत्येक कुटुंबाच्या गळ्यातले ताईत आहेत जी लोकमान्यता लोकप्रियता यापूर्वी फार पूर्वी कांही काळ जांबुवंतराव धोटे यांनी मिळविली होती, धोटे आलेत म्हणजे त्यांचे विरोधक देखील प्रसंगी नारा द्यायचे, वारे शेर आया है शेर !! मला वेड्या उद्धव ठाकरे यांचा राग आला नाही मी अजिबात चिडलो नाही तर मला उद्धव यांची मनापासून किंव आली. आमच्या गावात एक वेडा होता त्याच्या सभोवताली गर्दी असली जमली कि तो खुश व्हायचा मग त्याच्या वेड्या चाळ्यांमुळे आम्हा गावकऱ्यांचे छान मनोरंजन देखील व्हायचे पण एकदा का गर्दी पांगली कि हा ठार वेडा ज्याचे नाव भिका मालक होते तो दगड मारायला शिव्या द्यायला स्वतःचे कपडे फाडायला सुरुवात करायचा, आता तुम्हीच सांगा त्या ठार वेड्या भिका मालक यात आणि उद्धव ठाकरे या दोघात तुम्हाला कुठेही तसूभर तरी फरक जाणवतो का ? तुम्हाला देखील या दोघात म्हणजे भिका मालक आणि यादिवसातले उद्धव ठाकरे यात कमालीचे साम्य जाणवत असेल म्हणून मला एकटा पडलेल्या एकाकी पडलेल्या कायम एकांतात आयुष्य घालवीत पैसे मोजत बसणसर्या उद्धव ठाकरे यांचा अजिबात राग आला नाही, किंवआली दया वाटली माझ्या तोंडून आपोआप अरेरे असे उद्गार बाहेर पडले आणि बुडत्याचा पाय खोलात या म्हणीची प्रचिती आली आठवण झाली. सतत चोवीस तास ज्या नेत्याच्या एका कप्प्यात कायम केवळ विदर्भ विकासाचा विचार घोळत नव्हे अक्षरश: घोंघावत असतो त्याला तुम्ही मिस्टर उद्धव कलंकित ठरविणे म्हणजे खरकटे ढुंगण तेही भर चौकात उभे राहून तुम्ही लोकांना दाखविण्यासारखे, हे गलिच्छ स्टेटमेंट नेमके त्याचेच द्योतक ठरले असे म्हणता येईल. वास्तविक वास्तवात नितीन गडकरी यांना प्रेमाचा सन्मानाचा आदराचा आस्थेचा आठवणींचा झरा म्हणजे मातोश्री कुटुंब पण ते तुमच्या या गचाळ वाक्याने व्यथित झाले आणि त्यांनी देखील तुमच्या तोंडात शेण घातले. गडकरी यांनी तुमच्या तोंडात जाहीर शेण घातले इतर समस्त साऱ्याच विदर्भवासीयांनी घरातून तेच काम केले एवढाच काय तो फरक कारण देवेंद्र फडणवीसांना नागपूरचा कलंक म्हणणे म्हणजे एखाद्या मूर्ख नालायकाने दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाबाबत शंका व्यक्त करण्यासारखे. जेव्हा आपण एखाद्याकडे बोट करतो ना उद्धवजी तेव्हा उरलेली तीन बोटे स्वतःकडे असतात आणि नेमके कलंकित कोण म्हणजे नागपूरचे देवेंद्र कि घराबाहेर क्वचित पडणारे कावेबाज धोकेबाज उद्धव ठाकरे याचे नेमके उत्तर शोधा तुम्हाला क्षणार्धात नेमके उत्तर मिळेल. बापाने मोठ्या दिमाखात आणि धोका पत्करून जी शिवसेना उभी केली, जवळपास अख्खी शिवसेना तुम्ही तुमच्या कमाईतून वागण्या बोलण्यातून धुळीस मिळविली आणि अशा या बाप कमाईला धुळीस मिळविणाऱ्याला वास्तवात कलंकित ठरवायचे असते, तुम्ही नेमके उलट केले. याउलट तुम्ही अगदी जाहीर कबूल करायचे होते कि नेमका मी स्वतः कलंकित आहे आहे मी बापाचे मोठे पुण्य पापांमध्ये परवर्तीत केले…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top