वीट आणला विष प्रयोगी विटकरी : भाग 2

वीट आणला विष प्रयोगी विटकरी : भाग 2
-हेमंत जोशी

आमदार अमोल विटकरी यांनी इस्लामपूरच्या भाषणात ब्राम्हणांवर अत्यंत गलिच्छ हलकट घाणेरड्या वाईट हीन दर्जाहीन नीच विष प्रयोगी भाषेतून टीका केली, मी त्यावर सणसणीत उत्तर देणारा पहिला लेख सोशल मीडियावर टाकला आणि पुढल्या काही मिनिटात अनेक मित्रांकडून वाचकांकडून कौतुकाचे अभिनंदनाचे फोन आले पण त्यात अकोल्यातले भाजपा नेते प्रतुल हातवळणे आणि तडफदार रोखठोक पत्रकार मित्रवर्य पुरुषोत्तम पाटील यांचे फोन डोळ्यात अंजन घालणारे ठरले कारण या दोघांनीच मला सांगितले कि तोंडफळ मिटकरी हे स्वतः मराठा नाहीत ते लिंगायत समाजाचे आहेत, नंतर अकोट या विटकरी यांच्या गावामधून त्याच्या मित्रांचे जे फोन मला आले ते तर अधिक शॉकिंग होते, त्यांच्या माहितीनुसार संधी साधून अमोल यांना परस्पर ब्राम्हण व मराठ्यांमध्ये आग लावून मोकळे व्हायचे होते आणि ती नीच संधी त्यांनी इस्लामपूरच्या मराठा पट्ट्यात बहुसंख्य मराठ्यांसमोर मुद्दाम साधली आणि ब्राम्हणांवर अप्रिय टीका करीत स्वतः नामानिराळे राहून परस्पर ब्राम्हण व मराठ्यांमध्ये आग ओतून वरून तेल टाकून मिटकरी मोकळे झाले. नेमके मला नेमके तेच सांगायचे आहे कि मराठयंमधले काही विघ्नसंतोषी चार दोन टाळकी सोडली तर बहुसंख्य मराठ्यांना ब्राम्हणांवर टीका करायची नसते याउलट अशा पद्धतीने जर त्यांच्या नेत्यांनी मुद्दाम टीका केली तर ते अजिबात सिरियसली घेत नाहीत वरून अशावेळी त्यांचे ब्राम्हणांविषयी असलेले प्रेम अधिक घट्ट होते आणि जे नेते असले गैरप्रकार करून मोकळे होतात ते ब्राम्हणांपेक्षा समस्त मराठ्यांच्या मनातून अधिक कायम उतरतात…

वाईट याचे वाटते कि नीच विटकरी यांनी जगतातल्या मराठी मंडळींसमोर स्वतः मराठा नसल्याने एकाचवेळी ब्राम्हण आणि मराठ्यांची मोठ्या खुबीने बदनामी केली, विशेष म्हणजे समस्त मराठी व हिंदूंचे दैवत शिवाजी महाराज जिजाबाई आणि कणखर गुरु दादोजी कोंडदेव यांना अजिबात गरज नसतांना नसलेल्या वाईट संबंधांवर त्यांनी या तिघांची या भाषणातून अतिशय खालच्या भाषेतून बदनामी केली तसेही हा विषय केव्हाच संपलेला आहे, शिवाजी महाराज हे फक्त आणि फक्त मर्द मराठ्याचीच अवलाद होते असे असतांना दांभिक अमोल मिटकरी यांनी नको तो वाद विनाकारण उकरून काढला आणि एकाचवेळी ब्राम्हण आणि मराठ्यांना बदनाम केले. तसेही अजित पवार यांचे हे हलकट फाईंड दस्तुरखुद्द शरद पवार यांना किंवा संपूर्ण अकोला जिल्ह्यातील गुलाबराव गावंडे, कोरपे, धोत्रे अशा बहुसंख्य आणि राष्ट्रवादीच्या मराठा नेत्यांना मनापासून आवडत नव्हते,अजित पवार यांनी विटकरी यास विधान परिषद सदस्य करून शरद पवार आणि अकोला जिल्ह्यातल्या कट्टर राष्ट्रवादी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील डिवचले काहीसे अपमानित केले होते, विटकरी यांच्या वादग्रस्त वैफल्यग्रस्त भाषणानंतर शरद पवार यांनी अजितदादा जयंत पाटील आणि धनंजय मुंडे या तिघांकडे स्पष्ट शब्दात आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आणि या तिघांनी त्यानंतर लगेच समस्त ब्राम्हण वर्गाची माफी मागितली. आता याठिकाणी एक महत्वाचे सांगतो, नालायक विटकरी यांनी जे काय घाण काम केले विनाकारण ब्राम्हणांना बदनाम केले ते शेवटचे, तसेही वेळोवेळी या नीच अमोल विटकरी यास मि त्याची जागा दाखवून देईलच पण जसे पाक विचारांच्या काही मुसलमानांनी हिंदूंना डिवचू नये तसे इतर कोणीही यापुढे ब्राम्हणांना असे सतत विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा मला अशा मंडळींना रस्त्यावर आणायला वेळ लागणार नाही…

क्रमश: : हेमंत जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top