सुशांत सिंग राजपूत : पत्रकार हेमंत जोशी
देशात सर्वाधिक अमली पदार्थांचे सेवन करणारे म्हणे पंजाब मध्ये सर्वाधिक आहेत आणि ज्या पंचकुला या चंदिगढ जवळील शहरात हे प्रमाण फार मोठे आहे त्याच पंचकुला मध्ये सुशांत सिंग राजपूत आपल्या सख्ख्या मोठ्या बहिणीकडे शिकायला होता, अतिशय बुद्धिमान पण नको त्या वाईट सवयी त्याला लहान वयात लागल्या आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, उडता पंजाब हा सिनेमा अमली पदार्थांचे सेवन त्यावर कथानक आधारलेले होते आणि चंदिगढ पंचकुला हे तर अमली पदार्थांच्या अमलाखाली गेलेल्या लोकांचे बदनाम असे परिसर ठरले आहेत. मुंबई आणि पुणे हे जवळपास चंदिगढ सारखीच व्यसनी मुला मुलींची शहरे आहेत त्यामुळे आपल्या मुलांना मुलींना पुण्यात शिकायला ठेवतांना शंभर वेळा विचार करावा. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या किंवा पब संस्कृतीच्या आहारी गेलेल्या जाणाऱ्या पिढीचा मृत्यू असाच कायम विदारक असतो. अलीकडे एक नेता कोरोना मधून केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचला कारण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते कि या नेत्याला वाचविणे तसे मुश्किल आहे कारण हे महाशय ड्रॅगच्या अमलाखाली असणारे पेशंट आहेत आणि हे तर मला माहित असतेच कि कोण अधिकारी कोण मंत्री किंवा कोणते आमदार खासदार मंत्री व्हायग्रा घेतात किंवा अमली पदार्थांचे सतत सेवन करतात. नेत्यांचे मोठ्यांचे अधिकाऱ्यांचे मुले व मुली अमली पदार्थांच्या अमलाखाली जाणे हे तर अलिकडल्या काळात अतिशय कॉमन असा प्रकार आहे….
सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या करण्याने आपण सारे हळहळलो, झाले ते अतिशय वाईट घडले, पण अमली पदार्थांच्या आहारी गेल्यानेच हे घडले आहे किंबहुना अलीकडे अमुक एखाद्या पार्टीमध्ये जाऊन आधी अति मद्यपान किंवा ड्रग्स घेऊन गोंधळ घालणे नंतर सुशांतला त्या पार्टीतून बाहेर काढणे हा आमच्या फिल्मी परिसरातला नित्याचाच प्रकार झाला होता आणि एकदा का व्यसनी लोकांना इतर चांगली माणसे टाळायला लागलीत कि त्याचे नैराश्य वाढत जाते आणि परिणाम मृत्यू आत्महत्या वेड लागणे अशा प्रकारात परिवर्तित होतो. जेव्हा केव्हा मी या अशा वातावरणाविषयी घरी विषय काढतो तेव्हा दोन्हीही मुलांना नेमके हेच सांगतो कि आपण तोतरे बोललो कि जशी लहान मुले तोतरे बोलतात तसे व्यसनांचे असते. आपल्याला उगाचच वाटते कि मुले लहान आहेत त्यांना काय समजते पण एक लक्षात ठेवा मूल एकदा पाच वर्षांचे झाले कि त्याला सारे समजायला लागते त्यामुळे रात्री पार्ट्या करून झिंगत येणारे मायबाप अप्रत्यक्ष आपल्या पुढल्या पिढीला हमखास बिघडवत असतात. सुशांत सिंग राजपूत तर व्यसनांच्या आणि त्यातून आलेल्या नैराश्येच्या एवढ्या गर्तेत सापडला होता कि तो रात्री किंवा दिवसा केव्हातरी केवळ दोन तास झोपत असे. थोडक्यात इतरांना दोष देण्यात अर्थ नसतो, अमली पदार्थांसारखी व्यसनेच तरुण पिढीला संपवत असतात म्हणून तरुण होणाऱ्या पिढीसमोर मायबापांनी अतिशय संयम पाळणे गरजेचे असते…
www.vikrantjoshi.com
सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली कि तो एक खून आहे हे सिद्ध होण्याआधीच मीडियाने विशेषतः बातम्या देणाऱ्या साऱ्याच वाहिन्यांनी जो काय अभूतपूर्व गोंधळ घालून टिआरपी वाढविण्या आटापिटा केला ते बघून ऐकून किळस आली ओकारी आली. वास्तविक असे प्रकार लोकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्या द्यावयाची शिक्षणाची जणू संधी आहे त्यापद्धतीने वृत्तांकन वाहिन्यांनी करायला हवे ते करायचे सोडून सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू अधिक सनसनाटी कसा करून दाखवता येईल त्याकडेच सार्या वाहिन्यांनी मुद्दाम जाणूनबुजून लक्ष दिले. आत्महत्या हेच समस्येचे उत्तर या पद्धतीने या वाहिन्यांनी बातम्यांचा अक्षरश: उच्छाद मांडला गोंधळ घातला. सुशांत सिंग राजपूत घरात मृतावस्थेत आढळला असे जर वाहिन्यांनी सांगितले असते तर अधिक बरे झाले असते पण ते सोडून काही सिद्ध व्हायच्या आधीच वाहिन्यांनी पोलिसांच्या भूमिकेत शिरून सुशांत सिंग राजपूत ने आत्महत्या केल्याचे सांगितले, पोलिसांनी अशा किंवा या वाहिन्यांना धारेवर धरले तर बरे होईल, जरा तरी वचक बसेल…
जेव्हा विशेषतः या मुंबई शहरात तुम्ही प्रस्थापितांच्या स्थानाला धक्का देता तेव्हा येथले प्रस्थापित तुम्हला येथून हुसकावण्याचा संपविण्याचा घाबरवण्याचा बदनाम करण्याचा हाकलून देण्याचा तुमचे स्थान हिरावून घेण्याचा तुमचे चित्त विचलित करण्याचा थोडक्यात तुम्हाला संपविण्याचा आटोकाट सतत कायम अविरत मुद्दाम जाणून बुजून प्रयत्न करतात ज्याचा अनुभव मी घेतला आहे किंवा माझा पत्रकार असलेला चिरंजीव पण घेतो आहे. प्रसंगी अगदी पत्रकार असलेल्या कुटुंबातल्या सदस्यांनी देखील आम्हाला संपविण्याचा आधी विडा उचलला नंतर आम्हाला बदनाम करण्याचे आटोकाट प्रयत्न झाले पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो ठाम असतो त्यामुळे समोर साक्षात मृत्यू जरी उभा राहिला तरी एकही क्षण विचलित न होता आम्ही आमचे काम सुरु ठेवतो पत्रकारितेचा वसा जपतो सुरु ठेवतो. हत्ती चले बाजार तो कुत्ते भुके हजार हि म्हण लक्षात घेऊन पुढे पुढे जायचे सरकायचे असते यशाने माजून न जाता आणि अपयशाने अजिबात खचून न जाता आणि नेमके हेच कंगना राणावत असेल किंवा सुशांत सिंग राजपूत यांनी ते ध्यानात घेतले नाही कधी ते अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेत तर कधी ते येथल्या प्रस्थापितांना कंटाळले. वास्तविक समोर वाघ आला तरी अजिबात अजिबात घाबरायचे नसते विचलित व्हायचे नसते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी