Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

फीर एक बार शरद पवार : पत्रकार हेमंत जोशी

tdadmin by tdadmin
January 31, 2021
in Uncategorized
0
फीर एक बार शरद पवार : पत्रकार हेमंत जोशी


Felt like sharing a very important information:


There has been demolition going on the 6th floor of Mantralaya right next to CM’s cabin. No, not to accommodate Aaditya! It is made to make a huge cabin for a soon to be appointed PA. ‘PA’ can be Principal Advisor or a Private Assistant!! But we all know who the Private Assistant of CM Uddhav Thackeray is….Now, no price for guessing who will be taking this post with Cabinet status very soon…


Vikrant Joshi.


फीर एक बार शरद पवार : पत्रकार हेमंत जोशी 

 जे करतो तेच सांगतो, या दिवसात मी जे करतो आहे ते तुम्हीही करा.वाचकहो, दररोज काही ओळखीच्यांना मित्रमैत्रिणींना फोन करून फोन वरून खुशाली विचारत चला, या दिवसात ज्याला त्याला प्रत्येकाला कदाचित आर्थिक नसेल पण मानसिक आधार देण्याची नितांत गरज आहे, फोन करणे जमत नसेल साधा मेसेज करा पण ओळखीच्यांना त्याची खुशाली विचारा, त्यातून कोणीतरी आपल्या पाठीशी आहे अशी भावना निर्माण होते आणि आलेले येणारे नैराश्य दूर पळून जाण्यास त्यातून आपली इतरांना मदत होते. अगदी अलीकडे काँग्रेसच्या डॉ. गजानन देसाई यांचा फोन आला होता तेव्हा मला कळले कि आमच्याच ग्रुप मधले एक मित्र जितेंद्र गोस्वामी एक दीड महिन्यापूर्वीच गेले, तसे ते अपघातानंतर वर्षे दीड वर्षे विकलांग अवस्थेत अंथरुणावरच पडून होते आता गेले. मित्र वर्तुळातील एक जातो आणि आपल्या कळत नाही हे असे सध्या खूप होते आहे अलीकडे पितृतुल्य वसंतराव कुलकर्णी गेले त्यांच्या अंत्यदर्शनाला ना मला जाता आले ना त्यांच्या पोटच्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला आपल्या अत्यंत लाडक्या बापाच्या अखेरच्या दर्शनासाठी, सारेच कठीण होऊन बसले आहे, दुष्ट चिन्यांनी शेवटी डाव साधलाच पण आपण भारतीय अजूनही निर्लज्ज आहोत चिनी उत्पादने सोडायला तयार नाही, प्रत्येकाने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालावा… 

कोण होते जितेंद्र गोस्वामी आणि कोण आहेत डॉ. गजानन देसाई. सुरुवात शरद पवारांपासूनच करूया म्हणजे या दोघांविषयी सांगणे सोपे जाईल. शरद पवार यांचे वागणे किंवा जवळच्यांना खुश करणे तिरुपतीच्या न्हाव्यांसारखे आहे, तिरुपतीचे न्हावी अनेक ग्राहकांना एकाच रांगेत आधी बसवतात मग प्रत्येक ग्राहकाची अर्धी अर्धी भादरवुन ठेवतात त्यातून ग्राहकाला आनंद होतो कि मेरा नंबर आ गया पण त्याला तेथून धड उठताही येत नाही कारण अर्धीच भादरवुन ठेवलेली असते.म्हणजे ग्राहक कंटाळून उठून बाहेर समजा पडले तर हास्यास्पद तेच ठरते कापणारा नाही त्यामुळे वाट पाहत बसण्यापलीकडे त्या ग्राहकाच्या काहीही हाती उरलेले नसते. अमुक एखादा जेव्हा राज्याच्या राजकारणात झिरो असतो पण पुढे जाण्यासाठी जेव्हा धडपडत असतो एकदा का तो पवारांच्या नजरेत पडला कि झाला त्याचा तिरुपतीचा केस कापून घेणारा ग्राहक. म्हणजे शरण आलेल्याला त्यांच्या राजकीय कळपात सामील झालेल्याला पवार नक्की आर्थिक सामाजिक व राजकीय दृष्ट्या मोठे करतात पण त्या नेत्याला कार्यकर्त्याला त्याच्या जे मनात असते ते मिळवून देतांना त्याची अवस्था तिरुपतीच्या केस कापून घेणाऱ्या ग्राहकांसारखी करून ठेवतात जे नेमके डॉ. गजानन देसाई किंवा दिवंगत जितेंद्र गोस्वामी किंवा बाप्पा सावंत दिनकर तावडे दिवंगत गोविंदराव आदिक इत्यादी बहुतेक साऱ्यांचे झाले. असाच एक अस्वस्थ पवारप्रेमी जितेंद्र गोस्वामी म्हणाल तर आर्थिक सुबत्ता पण म्हणाल तर भंगलेली राजकीय अँबिशन येथेच सोडून गेला, आमच्या या मित्राला श्रद्धांजली वाहतो व पुढल्या लिखाणाला लागतो….

www.vikrantjoshi.com

सांगलीचे  जयंत पाटील आज देखील गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना कानात जाऊन सांगा वाट पहा म्हणून. यात नेमकी चूक कोणाची तर पवारांची नक्की नाही. घाई त्या त्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नडते. जे चतुर असतात ते शांत राहतात आणि आपला जितेंद्र आव्हाड करून घेतात मोठा राजकीय आर्थिक सामाजिक साराच मोठा फायदा करून घेतात, घाई करणाऱ्यांचा अजितदादा होतो कारण मी तर तुम्हाला आधीच सांगितले आहे कि पवारांच्या पुढून कधीही जायचे नसते त्यांना राजकारणात कधीही ओव्हर टेक अजिबात करायचे नसते, आहे तेथेच थांबायचे असते अन्यथा पवार अशावेळी जाम चिडतात त्यांचा सिनेमातला संतापलेला चिडलेला रागावलेला धर्मेंद्र होतो आणि ते ज्याच्यावर चिडले त्याचा भास्कर जाधव बबनराव पाचपुते करून मोकळे होतात. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात स्वतःला चोवीस तास झोकून दिले तरच तुम्हाला त्या त्या क्षेत्रातले राजा होता येते पवार यांचे असेच सतत या वयातही झोकून देणे आहे त्यांच्यानंतर हे असे एवढे झोकून देणे मी देवेंद्र फडणवीसांचे बघितले आहे त्यामुळे आजही राज्यातल्या सर्वाधिक बातम्या आणि चर्चा फडणविसांच्याच असतात. शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीस असे फार कमी राजकारणातले सत्तेत, नसले तरी सुपर स्टार ठरलेले आहेत. दिवंगत जितेंद्र गोस्वामी असतील, नागपूरचे गिरीश गांधी किंवा त्यांच्यातलेच अनेक डॉ. देसाई यांच्यासारखे ज्यांना पवारांनी मोठी ताकद सर्वार्थाने दिली पण त्यांचा तिरुपतीचा केस कापून घेणारा ग्राहक करून ठेवला त्यातले मग काही शरद पवार यांच्यावर चिडले आणि त्यांच्यातून बाहेर पडले पण पुढे त्यातले कोणीही मोठे झाले नाही त्यापेक्षा ते जेथे होते तेथेच त्यांनी पवारांना घट्ट बिलगून मस्त चिपकून राहायला हवे होते फायदा कदाचित झाला नसता म्हणजे स्वप्नपूर्ती कदाचित झालीही नसती पण राजकीय आर्थिक नुकसान मात्र टळले असते…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Previous Post

बायकांनो बिघडू नका : पत्रकार हेमंत जोशी

Next Post

Jaane Bhi Do Mehta ji….

tdadmin

tdadmin

Next Post
Jaane Bhi Do Mehta ji….

Jaane Bhi Do Mehta ji....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.