इकडल्या तिकडल्या गप्पा मारूया : पत्रकार हेमंत जोशी
मागेही एकदा तुम्हाला मी सांगितलेच आहे कि कोरोना महामारीने खऱ्या अर्थाने कंबरडे मोडले आहे ते सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचे, थोडीफार आणि शक्य आहे तेवढी जनसेवा म्हणून एका फेसबुक ग्रुपवर मी या महामारीत अडचणीत आलेल्यांना सहकार्य करण्याचे लेखी वचन दिले आणि लगेचच पुढल्या दोन दिवसात ठिकठिकाणहून अडचणीत असलेल्यांनी मला फोन केले आणि यादिवसात आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना सारखी सध्या परिस्थिती व मनस्थिती असलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या सत्य कहाण्या ऐकून ऐकून मी मनातून अतिशय अस्वस्थ झालो. जेवढी शक्य आहे श्रीमंत मित्रांना हाताशी धरून आणि स्वतःच्या खिशातून सहकार्य करण्याचा मनापासून प्रयत्न करतोय. बदलापूर अंबरनाथ भागातले एक वयस्क गृहस्थ म्हणाले मी नागपूरला असतो पण इकडे मुलाकडे आलो आणि अडकलो. मला सकाळीच चहा नाश्टा लागतो पण काही मागितले कि सून आणि मुलगाही अंगावर धावून येतात, मायबहीण काढून मोकळे होतात खिशात पैसे नाहीत मला सकाळचा चहा नाश्टा किमान महिनाभर तेवढा मिळू शकेल का, मी लगेच त्यांच्या घराजवळ असलेल्या हॉटेल मालकाकडे तीन हजार रुपये मित्रामार्फत जमा केले आणि त्या गृहस्थाला दररोज शंभर रुपयांचा ब्रेकफास्ट करता येईल अशी व्यवस्था केली अर्थात काहींवर बेतलेले प्रसंग तर आणखी हृदयद्रावक आहेत पण त्यावर लिखाण करणेही नको. तुम्हाला कळकळीची विनंती करतो कि या दिवसात नजर आणि नियत साफ ठेवून अशा संकटात अडचणीत सापडलेल्यांना अगदी हुडकून हुडकून शोधा व सहकार्य करा. मला त्या गृहस्थाच्या बोलण्यातून असे लक्षात आले कि जे अनेक घरा घरातून घडते तेच त्यांच्या घरी घडते आहे म्हणजे त्या घरातली प्रमुख स्त्री त्यांची सून हे असे मुद्दाम घडवून आणते आहे…
ज्या घरातल्या प्रमुख स्त्री मध्ये आळस ऐय्याशी उद्धट स्वभाव संशयी वृत्ती विशेषतः नवऱ्याला घालून पाडून बोलणे किंवा सतत डॉमिनेट करणे स्वतः आराम करून विशेषतः बाहेरून थकून भागून आलेल्या नवऱ्याला कामाला जुंपणे अशी वृत्री भिनलेली असते असे घर संपायला बिघडायला फारसा वेळ लागत नाही आणि आजकाल हे प्रमाण वाढते आहे घराघरातून एखाद्या रोगासारखे पसरते आहे, एकदा का घरातल्या स्त्रियांनी सात्विकता सोज्वळ स्वभाव शांत वृत्ती सोडली कि अशा घरातले इतर कुटुंब सदस्य बिघडायला वेळ लागत नाही विशेषतः अशा बायकांचे नवरे व्यसनाधीन झाल्याचे बघायला मिळते. काही स्त्रिया तेवढ्या वाईट आणि आम्ही पुरुष तेवढे चांगले असा माझा अजिबात दावा नाही पण कोपणार्या अस्वस्थ वृत्तीच्या स्त्रिया त्यांचे घर शंभर टक्के उध्वस्त करून मोकळ्या होतात हेही तेवढेच खरे आहे त्यात त्यांची चंचल वृत्ती असेल तर पोटच्या मुलांना बिघडायला आयति संधी चालून येते. राग न येणे हे ज्या घरातल्या प्रमुख स्त्रीमध्ये लक्षण आहे ते घर शून्यातून आपोआप विश्व निर्माण करते. अति राग, सतत आदळआपट कायम चिडचिड कर्कश आवाज दुरुत्तरे करण्याची किंवा तोंडोतोंडी येण्याचा क्रूर स्वभाव त्यातून घरातले यश आणि शांती बघता बघता निघून जाते आणि अशा घरातली माणसे रसातळाला जातात. मुलांना नवऱ्याला ते कुठे चुकले तर घरातल्या स्त्रीने तेवढ्यापुरते रागवायला हवेच पण सतत डोक्यात राग आणि हातात लाटणे धरून वावरणाऱ्या स्त्रिया चांगल्या कुटुंबाचे वाटोळे करूनच मोकळ्या होतात. गम्मत जम्मत म्हणून एखाद्यावेळी ठीक आहे पण उठसुठ व्यसने करणाऱ्या अलीकडे ज्या तरुण स्त्रियांनी अनेक विविध कुटुंबातून जो उच्छाद मांडला आहे त्यातून सनातनी उत्तम हिंदू संस्कार बाजूला पडून पाश्चिमात्य विचारांची हिंदू संस्कृती धोक्यात आलेली आहे हे नक्की आहे. एकदा पुण्यातली माझी एक मैत्रीण नवरा तिच्या व्यसनी वागण्याला केव्हाच सोडून गेलेला, मला फोनवरून सांगत होती कि तिच्या १३-१४ वर्षे वय असलेल्या एकुलत्या एक मुलाला बीअरची चव कशी मनापासून आवडली त्यावर मी तिला प्रचंड झापले तिने तेव्हापासून माझ्याशी संबंध कमी केले आता तिचा मुलगा केवळ १९ वर्षांचा आहे आणि झिंगून घरी येतो किंवा कधी बारवाले त्याला घरी आणून सोडतात. समस्त स्त्रिया व पुरुषांनो, घरातले पावित्र्य राखणे सर्वस्वी आपल्याच हातात असते आणि ते राखायलाच हवे अन्यथा पुढल्या पिढीचे बरबाद होणे अटळ असते…