कॉफी लव्हर्स : पत्रकार हेमंत जोशी
अलीकडे सोशल मीडियावर फेस बुकवर मी माझ्या कॉफीचा फोटो टाकल्यानंतर अनेकांनी सूचना केल्या कि मी कॉफीविषयी लिहावे, वास्तविक मागे केव्हातरी एकदा माझे कॉफीवर विस्तृत लिखाण झाले आहे त्यामुळे वेगळेकिंवा नवीन असे त्यात काय लिहावे नेमके सुचत नाही. तुम्हाला कदाचित हे माहित नसेल कि आजतागायत मला चहा कसा लागतो चहाची चव कशी असते हे माहित नाही किंबहुना समोरचा चहा घेत असेल तर तो दर्प देखील मला सहन होत नाही म्हणजे उद्या एखाद्या सुंदरीने कडक चहा प्यायल्यानंतर लगेचच ओठांचा चंबू करून मला दीर्घ चुंबनाची ऑफर केली तरी मी दोन पावले क्षणार्धात मागे येईल, विशेष म्हणजे सुरुवातीला काही वर्षे मी कॉफी देखील घेत नसे पण एक दिवस ओबेरॉय या पंचतारांकित हॉटेलातल्या व्हीआयपी क्लबमध्ये एमइपी किंवा आयआरबी या जगप्रसिद्ध कंपन्यांचे मालक दिवंगत दत्तात्रय म्हैसकर आणि मी केवळ गप्पा मारण्यासाठी अधून मधून भेटत असू म्हणून भेटलो आणि काय घ्यावे म्हणून आम्ही दोघांनीही त्यादिवशी पहिल्यांदा कॅपेचिनो घेतली, आम्हाला ती एवढी आवडली कि त्यानंतर आम्ही दोघेही कॉफी लव्हर झालो, आम्ही भेटलो कि मुद्दाम कापचिनो मागवत असू आणि पुढे मला दिवसातून एकदा हि कॉफी घेण्याची सवय जडली ती कायमची. दारू पिणार्यांना आपण दारुड्या म्हणतो चहाचे व्यसन असणाऱ्यांना चहाड्या म्हणायला हरकत नाही कारण चहा घेता घेता जमलेले भारतीय एकमेकांच्या तसेही चहाड्या करण्यात म्हणाल तर विकृत म्हणाल तर अधिक आनंद मानत असतात आणि अधिक कॉफी पिणार्यांना यापुढे तुम्ही कॉफीडया म्हणायलाही हरकत नाही. पुढे माझा धाकटा मुलगा विनीत जेमतेम १९ वर्षांचा झाला न झाला त्याला मी मुद्दाम कॉफी शॉप व्यवसायात उतरण्याचा सल्ला दिला आणि यातच आम्ही बऱ्यापैकी रमलो. कॉफी शॉप मधली बदमाशी किंवा या व्यवसायातली फसवेगिरी बाजूला ठेवून पुढे जा, मी त्याला सांगितले त्याने मी सांगितलेले कायम ध्यानात ठेवले…
केवळ कॉफी नेमकी कुठे अति उत्कृष्ट मिळते त्यासाठी मी जगभरातल्या कोणत्याही देशात जातो तेथे पायपीट करतो, दर दोन तीन महिन्यांनी अशी पायपीट मुद्दाम करतो अपवाद अलीकडली कोरोना महामारी. आणि जे मला त्या त्या देशांमधून कॉफी बाबत आढळते ते मुद्दाम मुलाला सांगून एखादे कॉफी ठिकाण भावल्यास त्याला पण तेथे मुद्दाम जायला सांगतो. काही पाश्चिमात्य देशातल्या कॉफीज मला अनुभवायच्या असल्या तरी दुबई आणि न्यूयॉर्क मधले कॉफी शॉप अति अति उत्कृष्ट असलेत तरी कॉफी पिणार्यांना ती पिण्याचा मनमुराद आनंद लुटायचा असेल तर त्या प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी आफ्रिकेतल्या इथोपिया या देशात जाऊन केवळ कॉफी पिण्यासाठी राहावे. येथे या देशात एवढी गरिबी आहे कि चावट पुरुषांना जे हवे असते ते या देशात अगदी सहज मिळते म्हणजे माझ्या संगतीने एक मित्र होता त्याला आमच्या पंचतारांकित हॉटेलातल्या दोन्ही रिसेप्शनिस्ट आवडल्यानंतर तो आळीपाळीने एक एक दिवस त्यांना घेऊन त्याच्या खोलीतून सकाळी बाहेर पडतांना मी बघितला. अर्थात असे कितीतरी देश आहेत, जाऊ द्या, ज्या लक्ष्मीचे आपण पूजन करतो ती लक्ष्मी केवळ विकृतीपोटी या कामांवर उधळू नका घरी सुस्वरूप पत्नी असतांना. जशी आपल्याकडे प्रत्येक नाक्यावर चहाची दुकाने किंवा टपर्या आहेत तसे इथोपिया या देशात कॉफी बाबत असते, एक तर या देशातले बीन्स उत्कृष्ट त्यात तुम्हाला स्थानिक कारगीर उत्तमोत्तम गरमागरम कॉफीज पाजून मोकळे होतात आणि हो जगातल्या सर्वोत्कृष्ट कॉफी बीन्स याने कॉफी पिण्याचा मनापासून आनंद लुटायचा असेल तर दुबई आणि न्यूयॉर्क मध्ये पायपीट करा, असे नेमके शॉप्स शोधून काढा आणि मनसोक्त मनमुराद मनापासून कॉफी पिण्याचा आनंद लुटा, खिशाकडे न बघता कारण असे द बेस्ट कॉफी शॉप्स जरासे महाग असतात पण कॉफी पेय प्रेमींना ती एक पर्वणी असते. आपल्या या राज्यात केवळ मुंबईत चार दोन बरे ब्रँड आहेत पण तेथे वेगळे असे काही नाही, आम्ही त्याच व्यवसायात असल्याने मुंबईतल्या कॉफी शॉपवर अधिक भाष्य करता येणार नाही…