इकडले तिकडले : पत्रकार हेमंत जोशी
उद्धव ठाकरे परदेशातून परतल्यानंतर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती पुन्हा व्हावी म्हणून त्यांची भेट राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार घेणार होते तसे जवळपास ठरलेलंही होते पण हि भेट झाली नाही, नजीकच्या काळात लवकर होईल असे चिन्ह दिसत नाही पण भेट होईल, थोडा वेळ लागेल किंवा सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे एकमेकांना भेटले आणि एकत्र निवडणूक लढविण्याचे ठरले, असे देखील लगेच होणार नाही कारण हि भेट म्हणजे हिंदी सिनेमा नाही त्यात कसे एका क्षणी नट नटी मधुचंद्र साजरा करतांना दाखवितात आणि पुढल्याच क्षणी नटीला नववा महिना लागल्याचे दाखवितात, असे युतीच्या बाबतीत नक्की घडणार नाही, आज तरी युती होईल असे वाटत नाही किंवा युती होईलही पण सेनानेते खूप आढेवेढे घेतील नंतरच मधुचंद्राला ते दोघे एकत्र जातील एकत्र साजरा करतील म्हणजे सेना आणि भाजपा एकत्र पुन्हा येतील निवडणुकाही एकत्र लढवतील, हातात हात घेतील पण हे नक्की यावेळी पटकन किंवा एका झटक्यात घडले असे अजिबात होणार नाही, कारणे नेमकी किती आणि कोणती हे त्या उद्धव ठाकरे यांनाच ठाऊक पण ते केंद्रातल्या म्हणजे राज्यातल्या नव्हे भाजपा नेतृत्वाला काहीसे खूपसे उबगले आहेत त्यांचा केंद्रातल्या नेत्यांवर विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर राग आहे, त्यांना देवेंद्र फडणवीसांबद्दल राग नाही उलट आदर आहे आणि मुख्यमंत्री देखील उद्धव यांच्याशी चांगले संबंध जपून आहेत हे तुम्हा सर्वांनाही चांगले ठाऊक आहे. बघूया मुनगंटीवार यांच्या प्रेमाने डोळा मारण्याला उद्धव केव्हा कसा आणि किती झटपट रिस्पॉन्स देतात ते….
जेव्हा मुख्यमंत्र्यांनी राधेश्याम मोपलवार या धाडसी प्रशासकीय अधिकाऱ्यावर समृद्धी महामार्ग हे महास्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी टाकली तेव्हा अनेकांनी त्यांच्या नावाने कडाकडा बोटे मोडली किंवा नाके मुरडली पण मला त्यांच्या या निर्णयाचे कौतुक वाटले होते कारण मोपलवार जेव्हापासून सरकारी नोकरीत आले तेव्हापासून तर आजतागायत मी त्यांना बऱ्यापैकी जवळून बघत आलेलो आहे म्हणून जो निर्णय फडणवीसांनी घेतला आहे घेतला होता म्हणजे आधी समृद्धी महामार्गाची जबाबदारी त्यांनी मोपालवारांनवर टाकली तदनंतर मोपालवारांना त्यांनी निवृत्तीनंतर देखील वर्षभरासाठी जे एक्सटेंशन दिले ते त्यांचे दूरदर्शी डिसिजन होते त्यात फारसे वावगे वागण्यासारखे काहीही नव्हते कारण समृद्धी महामार्गाचे काम सुरु करणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हते तेथे एकाचवेळी डोके आणि ताकद लावू शकतो अशा धाडसी आणि बुद्धिमान प्रशासकीय अधिकाऱ्याची नितांत गरज होती आणि ते काम मुख्यमंत्र्यांनी परफेक्ट केले असे आमचे मत आहे विशेषतः जे मोपालवारांना अगदी जवळून बघतात ते नक्की माझ्याशी सहमत होतील, काही माणसे त्यांच्या दोषांसहित स्वीकारायची असतात कारण ते धाडसी असतात, दस्तुरखुद्द नितीन गडकरी यांचे दोष दाखवा असे जर कोणी मला सांगितले तर त्यावर नक्की अख्खे पुस्तक लिहिणे अगदी सहज शक्य आहे पण गडकरी हे देखील कमालीचे धाडसी म्हणून त्यांनी आपले आणि बांधकाम विभागाचे नाव देशात गाजवून सोडले किंवा त्यांचे एकमेव असे खाते होते त्याच खात्याचे काम या पंचवार्षिक योजनेत दिसले गडकरींचा पियुष गोयल झाला नाही म्हणजे फक्त गोयल यांच्याप्रमाणे गडकरी यांच्या केवळ कुटुंबाचे उत्पन्न या पंचवार्षिक योजनेत कित्येक पटीने वाढले असे झाले नाही थोडक्यात नितीन गडकरी यांचा पियुष गोयल किंवा प्रफुल्ल पटेल झाला नाही, त्यांनी चांगले कामही करून दाखविले, कामे सुरु आहेत….
मराठी बिग बॉस सुरु करण्यापूर्वी एका पत्रकालाही त्यात सामावून घेण्याचे जेव्हा ठरले तेव्हा तीन पत्रकारांच्या नावाची चर्चा तेथे आघाडीवर होती त्यातले एक निखिल वागळे हेही होते, तीसरे नाव मी येथे सांगत नाही पण अगदी शेवटी वागळे कि थत्ते या चर्चेत थत्ते अधिक उजवे ठरले आणि ते मराठी बिग बॉस मध्ये आले. आता नेमके हे बघायचे आहे कि थत्ते तेथे किती आणि कसे टिकतात विशेषतः थत्ते त्यातल्या इतरांना वेडे करून सोडतात कि तेथे जमलेले थत्ते यांना वेडे करून सोडतात, हे बघण्यात मजा येणार आहे, काहीही असो थत्ते अनेक वर्षानंतर प्रकाशझोतात आलेले आहेत कारण अलिकडल्या काही वर्षात जसे आसूड ओढणारे रस्त्याने दिसणारे कायम स्वतःचा आसूड स्वतःवरच मारून घेतात तसे अनिल थत्ते स्वतःच स्वतःची वेगळ्या पद्धतीने जाहिरात करून घ्यायचे ज्याची त्यांना वास्तवात अजिबात गरज नव्हती, थत्ते यांनी आपली लेखणी बंद पाडली नसती तर ते आज या राज्यातले लिखाणातल्या पत्रकारितेत प्रथम क्रमांक पटकावून मोकळे झाले असते जे मी नेहमीच लिहीत आलेलो आहे पण त्यांनी मूळ मुद्य्यांकडे दुर्लक्ष केले त्याची करणे त्यांना स्वतःलाच नेमकी माहित असतील पण झाले तेही
छान झाले म्हणजे बिग बॉस च्या माध्यमातून का होईना इतरांनी त्यांना प्रकाशझोतात आणले, बघूया पुढे काय घडते ते….
पत्रकार हेमंत जोशी