समृद्धीचा महामार्ग भाग १ : पत्रकार हेमंत जोशी
मी पत्रकार यदु जोशी म्हणजे माझ्या धाकट्या भावाचा आयुष्यभर ऋणी यासाठी आहे कि त्याच्या सद्वर्तणुकीमुळे माझा मोठा मुलगा विक्रांत पत्रकारितेत आला, पत्रकार अतुल कुलकर्णी च्या लिखाणामुळे मी असाच अलीकडे भारावून यासाठी गेलोय कि त्याचे जसे पैशांवर खूप खूप प्रेम आहे तसे त्याचे स्वतःच्या बायकोवर देखील म्हणे खूप प्रेम आहे, मी कोरोना महामारीचा यासाठी आभारी आहे कि या कठीण काळात नेमके आपले कोण आणि आपले कोण नाही हे मला अचूक समजले, मी अभिनेता निलेश साबळे याचे यासाठी आभार मानतो कि अमुक एखाद्याची डोकेदुखी वाढवायची झाल्यास, ब्लडप्रेशर वाढवायचे झाल्यास अमुक एखाद्याला त्रास द्यायचा झाल्यास आपणहून अशांना मी साबळेंचा लाव रे तो व्हिडीओ किंवा चला हवा येऊ द्या सारखे अतिशय टुक्कार व भिक्कार कार्यक्रम मुद्दाम बघायला सांगतो, तद्वत मी गिरीश ओक आणि निवेदिता जोशी यांचेही मनापासून यासाठी आभार मानतो कि त्यांच्या सासूबाई सिरीयल मुळे देखील मी मोठ्या खुबीने हि सिरीयल बघायला सांगून अनेक हितशत्रूंची डोकेदुखी वाढवून ठेवतो. अलीकडे अभिनेता आणि मित्र प्रशांत दामलेशी बोलतांना, निवेदिता किंवा गिरीश अशा फाल्तुक सिरीयलमधून अभिनय करून स्वतःची किंमत का कमी करून घेतात त्यावर जसे सांगतात तसे त्यांना भूमिका निभवावी लागते उगाच त्यांचा नाईलाज असतो, काही सांगितले तर हातचे काम जाऊ शकते, प्रशांत म्हणाला मला ते पटले पण वाईटही वाटले कि निवेदिता किंवा गिरीश सारखे आमचे दर्जेदार मित्र मैत्रिणी प्रसंगी किती टुकार मालिकेतून कामे करतात. जो राजू श्रीवास्तव एकेकाळी रसिकांच्या गळ्यातला ताईत होता,दुःख विसरायला लावणारा विनोदवीर होता आज त्याच राजू श्रीवास्तव चे तेच ते पाचकळ बाष्कळ विनोदाचे थोबाड जसे बघवत नाही तेच एक दिवस किंवा लवकरच, अगदी अलीकडे नावारूपाला आलेल्या महाराष्ट्राची हास्यजत्रा मधल्या समीर चौगुले सारख्या सर्वसामान्य विनोदवीरांचे नक्की होणार आहे, एकदा का यांच्या पाचकळ विनोदांना रसिक कंटाळले कि अशा समीर चौगुलेंसारख्या सामान्य कलाकारांना मग इतरही भूमिकेत रसिक नाकारतात हा इतिहास आहे. जसे मी वर काहींचे मनापासून आभार मानले तसे मी येथे खरोखरी म्हणजे अगदी मनापासून मनोज सौनिक, राधेश्याम मोपलवार या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा, अनिल गायकवाड या सार्वजनिक बांधकाम खात्यातील उच्च स्थानी असलेल्या अभियंत्यांचा आणि आजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांचा मनापासून आभारी आहे त्यांना अगदी हृदयातून धन्यवाद देतो त्यांचे येथे आभार मानतो…
बहुसंख्य नालायक खादाड व्यसनी जातीयवादी आळशी नेत्यांमुळे आणि इतरांच्या दुर्लक्षातून माझा विदर्भ कायम मागे पडला, अडगळीत सापडला, आर्थिक दृष्ट्या खचला संपत गेला त्यामुळे जेव्हा केव्हा एखादा तडफदार कर्तृत्ववान नेता तेही विदर्भाचे भले साधण्या विदर्भातून पुढे येतो आणि विदर्भासाठी काहीतरी चांगले करून जातो त्यावर आधी तर माझा विश्वासच बसत नाही पण कृतीतून एखाद्या नेत्याचे स्वतः ऐवजी विदर्भाचे भले साधतांना दिसले कि मी त्यानंतर दिवसातून एकदा तरी स्वतःभोवताली आनंदाने गिरकी घेतो नाचायला बागडायला लागतो पण असे लायक नेते तेही आमच्या विदर्भातले, खचित क्वचित घडते, बहुतेक नालायकांना आपले जीवनमान सुधारायचे असते आणि कुटुंबाचे नातेवाईकांचे भले करायचे असते. काही बोटावर मोजण्याएवढ्या चांगल्या नेत्यांमध्ये अर्थात टॉपवर देवेंद्र फडणवीस, ज्यांचे उपकार आम्हा विदर्भवासियांना न विसरता येणारे कारण त्यांनी मुख्यमंत्री असतांना समृद्धी महामार्गाला जन्म दिला आणि मनापासून धन्यवाद याही मुख्यमंत्र्यांचे ज्यांनी समृद्धी महामार्ग स्वप्न पूर्ण होत असतांना पैशांना कमी पडू दिले नाही, कामात खो घातला नाही थोडक्यात कोणतीही आडकाठी न आणता उद्धव ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, विशेष म्हणजे जयंत पाटील किंवा शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना आम्ही विदर्भातले, कायम आमचे शत्रू या नजरेने बघत आलो आहोत या अशा नेत्यांनी देखील कुठेही आडकाठी अद्याप आणलेली नाही, निदान एकतरी भव्य दिव्य स्वप्न मराठवाड्याचे आणि विदर्भवासियांचे नक्की पूर्ण होते आहे, लवकरच समृद्धी महामार्ग काहीअंशी सुरु होतो आहे. मित्रहो, समृद्धी महामार्ग आमच्यासाठी साक्षात परमेश्वर कृष्ण आणि हो कृष्णाला जसे देवकीने जन्म दिला आणि यशोदेने घडविले वाढविले तसे फडणवीस आणि ठाकरे त्यातल्या देवेंद्र फडणवीसांनी समृद्धीला जन्माला घातले आणि पुढे अतिशय आनंदाने घडविले वाढविले ते उद्धव ठाकरे यांनी. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर उद्धव यांनी खोडा न घालणे हे त्यांचे उपकार न विसरता येणारे. पहिल्यांदा काही चांगले घडले म्हणजे सचिव म्हणून ज्या प्रशासकीय अधिकारी मनोज सौनिक यांनी अगदी जवळून राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते बघितले सांभाळले हाताळले तेच सौनिक राज्याचे वित्त खात्याचे सचिव असल्याने झाल्याने समृद्धी महामार्ग पूर्ण होत असतांना निदान आजपर्यंत तरी कुठे काम अडकले नाही, हा महामार्ग पूर्ण होत असतांना वित्त सचिव वित्त मंत्री मुख्यमंत्री आणि अन्य महत्वाचे अधिकारी पदाधिकारी, कोणीही कोणतीही आडकाठी आणू नये अशी विदर्भ व मराठवाड्याची नम्र विनंती…
जसे माझे विदर्भावर अतिशय मनापासून प्रेम आहे तेच अनिल गायकवाड आणि राधेश्याम मोपलवार या दोघांच्याही बाबतीत येथे हेच सांगता येईल कि जसा समृद्धी महामार्गाचा फायदा विदर्भाला तोच मराठवाड्याला देखील आणि हे दोघेही नेमके मूळ मराठवाड्यातले असल्याने जणू आपल्या घरासाठी हे भले काम असे समजून उमजून त्यांनी प्रत्येक अडचणींवर अगदी सहज मात केली आणि समृद्धीचे काम झपाट्याने पूर्णत्वाकडे जाऊ लागले आहे. अनिल गायकवाड म्हणतात, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जवळपास ७०१ किलोमीटर लांब व १२० किलोमीटर रुंद एवढा भव्य असल्याने केवळ एखाद्या दुसऱ्या कंत्राटदाराला एवढे प्रचंड काम देऊन आम्ही मोठी डोकेदुखी वाढवून घेतली असती म्हणून एक युक्ती केली, हे काम अनेकांना विभागून देण्यात आले. प्रकल्प तेही विहित म्हणजे ठरलेल्या वेळेत दर्जेदार राबविण्याच्या दृष्टीने आम्ही आव्हान स्विकारले, महामार्गाचे बांधकाम १६ भागात विभागण्यात आले. समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी अतिशय अनुभवी व दर्जेदार कंत्राटदारांकडून स्पर्धात्मक निविदा मागविण्यात आल्या त्यातून नेमक्या १३ कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली, युती नंतर आघाडी सरकार आले पण काम कुठेही फारसे थांबले नाही आणि अतिशय अनुभव व वाक्बगार कंत्राटदार कामाचा नेमका दर्जा राखत झपाट्याने कामाला लागले. पुढल्या काही महिन्यात नागपूर ते शिर्डी हा महामार्ग जनतेला प्रवाशांना खुला होण्यास हरकत नाही. मी खूप समाधानी आहे कि माझ्यासारख्या स्वप्न बघणाऱ्या व स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याची क्षमता व ताकद ठेवणाऱ्या मोपलवार साहेबांसारख्या मोठ्या अधिकाऱ्यांकडून आमचे हे स्वप्न प्रत्यक्षात तेही लवकरच उतरते आहे…
क्रमश: हेमंत जोशी