विठ्ठल विठ्ठल : पत्रकार हेमंत जोशी
विठ्ठल म्हणजे विठ्ठल पाटील, आपण अतिशय साधे सरळ आणि देवभक्त आहोत, वारकऱ्यांचे नेते आहोत, वारकरी संप्रदायाचे फॉलोअर आहोत हे सदैव सांगत सुटणारा, मंत्रालयात साखर पेरणी करता करता म्हणजे मधुर मधाळ वाणी वापरून नेमकी कामे काढून घेणारा पश्चिम महाराष्ट्रातला एक नेमका न समजलेला बिलंदर माणूस. वरकरणी, आपण वारकरी संप्रदायाला वारकरी साहित्याला कसे वाहून घेतले आहे हे गळ्यात माल घालून सांगत सुटणारा पण अंतरी नको त्या नाना कळा आणि कला असलेला धूर्त माणूस, पण पितळ कधीतरी उघडे पडते तसे येथे त्या विठ्ठल पाटलांचे झाले आहे, ते नेमके वाह्यात कसे, सिद्ध करतो…
तत्पूर्वी, उद्धव ठाकरे हे उदाहरण म्हणून घेतो. एखादा नेता अगदी सहज शक्य असूनही स्त्रियांच्या बाबतीत आपले चारित्र्य कसे जपतो त्यावर मला वाटते, तुमचे आमचे, रश्मी वहिनींचे अगदी राज ठाकरे नारायण राणे किंवा अन्य कोणाचेही दुमत नक्की नसावे. अमुक एखाद्या आभाळाला टेकलेल्या व्यक्तीने स्त्रियांच्या बाबतीत चारित्र्य संप्पन्न राहणे असणे तेवढे सोपे नसते, म्हणून देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे यांचे कौतुक करावेसे वाटते. मध्यन्तरी दादरला महाराष्ट्र कला दालनाचे काम कसे सुरु आहे हे बघण्या साठी उद्धवजी गेले होते, जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान सोबतीला होते, उद्धवजी तेथे गेल्यानंतर त्यांनी तेथे असलेल्या ओळखीच्या एका जोडप्या कडून केवळ कौतुक म्हणून त्यांचे बाळ आपल्या कडेवर घेतले, नंतर त्या बाळाचे आई वडील त्याला पुन्हा आपल्याजवळ घेण्यासाठी कित्येकदा झेपावले पण बाळ काही केल्या उद्धवजींना सोडेना, त्याच्या आई किंवा बाबाने जवळ घ्यायला हात पुढे केले रे केले कि ते रडायचे, मान वळवून पुनःपुन्हा उद्धवजींना बिलगायचे, हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. बाळाचे ठीक आहे हो पण जर उद्धवजी त्या दिवंगत भय्यू महाराज यांच्या रांगेत बसणारे असते तर तरुण मुलींच्या आईवडिलांचे किंवा त्यांच्या नवऱ्याचे देखील हे असेच अगदी सहज त्या लहान बाळाच्या आईवडिलांसारखे नक्की झाले असते, नशीब उद्धवजी ते तसले नाहीत. आम्ही नाही सोडत जा त्या उद्धवजींना असे सांगणार्या त्या लहान बाळासारख्या कित्येक धीट तरुणी आपल्याला बघायला मिळाल्या असत्या. बरे झाले उद्धवजी स्त्रीदाक्षिण्य राखणारे आहेत….
www.vikrantjoshi.com
आपण जसे आहोत तसे सांगितले कि बरे असते, आपल्याला त्रास होत नाही, आत्महत्या करावी लागत नाही. विठ्ठल पाटलांना नेमके वारकऱ्यांचे नेतृत्व करायचे आहे कि त्यांची मनोवृत्ती भलत्याच विकृतीकडे वळलेली आहे हे समजत नाही कारण वारकरी पंथातल्या या विठ्ठल पाटलांनी ३१ डिसेंबरला जी कविता व्हाट्सअप वर पाठविली आहे त्यात त्यांनी चक्क दारूचे गुणगान गायले आहे…वारकरी संप्रदायाचे वादग्रस्त नेते श्रीमान विठ्ठल पाटील म्हणतात, आजपासून जागतिक मदिरा/सोमरस आठवडा सुरु झाला आहे, सर्व मदिरा प्रेमींना सोमरस आठवड्याच्या हार्दिक शुभेच्छा…संत आणि वारकरी संप्रदायात सतत वावरतो, हेच माझे जीवन सांगणारे विठ्ठल पाटील कसे भंपक आणि भीषण हे येथे सहज लक्षात येते.
कविता,
आपल्या आयुष्यातील अडचणी
HAYWARDS 2000 ते
HAYWARDS 5000
पर्यंत जाऊ शकतात
पण त्या सर्व अडचणी आपण
ROYAL CHALLENGE
म्हणून स्वीकारल्या पाहिजेत
अन्यथा लोक आपल्याला
OLD MONK म्हणतील आणि
BLACK LABEL लावतील
तेव्हा आपण परिस्थितीशी
JACK DANIEL
सारखेच लढले पाहिजे
व जीवन हे
BAGPIPER
सारखे जगले पाहिजे
आणि
JOHHNY WALKER
सारखे चालले पाहिजे
तरी काम हे ८ PM पर्यंत
केले पाहिजे आणि बुद्धी
KINGFISHER प्रमाणे चालली
तरच सर्व अडचणी KNOCKOUT
होतील,
मग पहा जीवन कसे
IMPERIAL
सारखे होऊन आपण
ARISTOCRAT होऊ
मग आपल्या SIGNATURE
PREMIUM ला महत्व प्राप्त होणार
हा मेसेज पुढे पाठवा जेणेकरून आपणास
PITER SCOTCH चे आशीर्वाद मिळतील.
हि अशी बेशरम विठ्ठल पाटलांनी कित्येकांना, स्त्री पुरुषांना, विशेषतः तरुण तरुणींना पाठवलेली दारूची महती आणि महत्व सांगणारी कविता. जर या राज्यातल्या समस्त वारकरी संप्रदायाला जनाची नाही किमान मनाची लाज हि कविता वाचल्यानंतर वाटलीच तर त्यांनी त्यांच्या पायातले काढून विठ्ठल पाटलांच्या गालावर उमटवावे. आपण कसे समस्त वारकऱ्यांचे विशेषतः वारकरी संत साहित्याचे तारणहार हे सांगून स्वतःला कायम सतत मिरवून आणणार्या विठ्ठल पाटलांचे मनातले हिडीस विचार बघा कसे अलगद बाहेर आले आणि विठ्ठल पाटील मग आपोआप ‘ वरून कीर्तन आतून तमाशा ‘ या पद्धतीने वाटचाल करणाऱ्या बदनाम बेशरम बेअक्कल मंडळींच्या पंक्तीला येऊन बसले. विठ्ठल पाटील नेमके कसे हे आणखी आणखी लोकांसमोर यायला हवे त्यासाठी त्यांच्या सभोवताली आधी वावरले नंतर दूर झालेल्यांनी आम्हाला नेमके सांगायलाच हवे, विठ्ठल पाटलांचे विचार सडलेले कसे…
तूर्त एवढेच :
पत्रकार हेमंत जोशी