फडणवीसांच्या हातून घडताहेत चुका मुख्यमंत्र्यांना त्यातून फार मोठा धोका

फडणवीसांच्या हातून घडताहेत चुका
मुख्यमंत्र्यांना त्यातून फार मोठा धोका

पुण्यातल्या कुठल्याशा पंडित आडनावाच्या किरकोळ क्षुल्लक व्यक्तीने अस्वस्थ मनाच्या एका तथाकथित संघ स्वयंसेवकांची घेतलेली मुलाखत, वास्तविक त्या व्हिडिओकडे एरवी लक्ष देण्याची गरज देखील पडली नसती पण वरकरणी हा प्रकार किरकोळ वाटत असला तरी त्या व्हिडीओ आड अनेकांची कित्येकांची दडलेली अस्वस्थता मोठ्या खुबीने बाहेर काढण्यात आलेली आहे, व्हिडीओ एक केवळ निमित्त मात्र आहे कारण फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी आपल्या कार्यशैलीत केलेला बदल केवळ राज्य व राष्ट्र हिताचा पण तो अनेकांना विशेष म्हणजे त्यांच्या सभोवताली आधी वावरणारे आणि एकंदरच भाजपा तसेच महायुतीच्या बड्या नेत्यांना त्यांनी आपल्या कार्य शैलीत अचानक केलेला फार मोठा बदल न रुचल्यामुळे किंवा त्यातून आपले फार मोठे व्यक्तिगत आर्थिक नुकसान होते आहे हे बेरकी प्रोफेशनल नेत्यांना खटकल्यामुळेच सुरुवातीला दबक्या आवाजात देवेंद्र विरोधी चर्चा धुसफूस आता त्याचे व्हिडिओत रूपांतर हाच नेमका प्रकार घडल्याचे माझ्या नेमके लक्षात आले आहे किंबहुना मला स्वतःला देखील फडणवीसांनी केलेला आपल्या कार्य शैलीतला मोठा बदल अजिबात रुचला नव्हता, मी देखील मनातून अस्वस्थ झालो होतो त्यांच्यावर मनातून मनापासून चिडलो होतो मात्र ज्यांनी माझ्या पद्धतीने सकारात्मक विचार करून चार पावले मागे येत फडणवीसांच्या या कार्य शैलीला सलाम केला त्यांच्या मनातला राग आणि गैरसमज पटकन लोप पावला वरून कौतुक वाटले कि फडणवीस यांनी हुबेहूब मोदी पद्धतीने आपल्या कार्य शैलीत आमूलाग्र बदल करून राज्य व राष्ट्र हिताचे फार मोठे पुढले पाऊल उचलले आहे…

www.vikrantjoshi.com

यावेळी मुख्यमंत्री झाल्यानंतर विस्कटलेली घडी पुन्हा व्यवस्थित बसविण्यासाठी वरून सत्ते सभोवतालच्या भ्रष्ट नेते दलाल अधिकारी इत्यादींच्या लागलेल्या सवयी मध्ये मोठा आमूलाग्र बदल करण्यासाठी फडणवीसांनी स्वतःला बदलवून घेतले अर्थात त्यातून त्यांचे सारेच निर्णय मनासारखे घडले असे अजिबात नाही, आजही सत्ता आणि त्यांच्याही सभोवताली नाही म्हणायला अनेक बदमाश काही केल्या हलायला तयार नाहीत पण सारे काही राष्ट्र व राज्य हितासाठी हा त्यांचा निर्णय पक्का झाल्यामुळे नेहमीच्या लालची संधीसाधू मंडळींना त्यांनी त्यातल्या काहींना दूर केले तर काहींचे महत्व कमी केले जे त्यामुळे दुखावले आणि त्याच त्यांच्या व्यथेतून अलीकडे काही दिवसांपासून फडणवीस यांच्या बाबतीत माणूसघाणा असा अपप्रचार सुरु केल्या गेला आहे जो अगदीच अर्थहीन आहे, सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत त्यांच्या हातून विकासकामांचे जे वेगवान गणित यादिवसात मांडल्या जाते आहे जे मला तंतोतंत धनात येत असल्याने किंवा ज्यांच्या ते ध्यानात येते आहे, त्यांच्या मनातला राग व गैरसमज त्यातून केव्हाच कोसो दूर पळाला आहे. पंडित नावाच्या अगदीच किरकोळ माणसाचा तो व्हिडीओ म्हणजे लेकी बोले सुने लागे पद्धतीचा आहे विशेष म्हणजे कुठलाही संघाचा स्वयंसेवक कधीही अशी बंडाची किंवा आपल्याच माणसाची बदनामी करणारी भाषा काहीही झाले तरी कधीही अजिबात जाहीर व्यक्त करणार नाही. हे सारे कोणीतरी मुद्दाम घडवून आणले आहे कारण ज्या मतलबी धंदेवाईक मंडळींना फडणवीस अगदी सहज भेटत नाहीत त्यांच्या मनातली हा व्हिडीओ एक अस्वस्थता आहे. स्पेशल ट्रीटमेंट भेटीची हा प्रकार देवेंद्र यांनी यावेळी बंद केला आहे कारण त्यांना तो तद्दन फाल्तुक वेळ वाचवून हे राज्य राष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आणून ठेवायचे आहे. शेवटी अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि खाजगी भेटीची वेळ मागण्यात वेळ न घालविता जे नेते आमदार मंत्री राज्यमंत्री लोकसेवक समाजसेवक संघ स्वयंसेवक भाजपावाले थोडक्यात ज्यांचे काम मुख्यमंत्र्यांकडे असते आणि जे या दिवसात भेटून आपले काम पुढे करतात त्यातल्या एकालाही असे वाटले का कि देवेन्द्रजी बदलले आहेत सहकार्य करीत नाहीत त्यांना गर्व झाला आहे त्यांना आता आपली गरज नाही, नाय नो नेव्हर, त्यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या अडचणी मांडणारा त्यातला एकही शंभर टक्के अजिबात नाराज नाही, भेटणाऱ्यांची कामे स्वतः फडणवीस तेथल्या तेथे निर्णय घेऊन करवून देतात फक्त अघळपघळ गप्पा त्यातून मी कसा फडणवीसांच्या जवळचा, हा दलालांचा नेहमीचा प्रकार मात्र त्यांनी यावेळी नक्कीच हणून पाडला आहे…

अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top