भान हरविलेले भानावर आले : पत्रकार हेमंत जोशी
राज्यातल्या भाजपा नेत्यांना कार्यकर्त्यांना आमदारांना खासदारांना कार्यकर्त्यांना संघ स्वयंसेवकांना भानावर येणे गरजेचे होते, मंथली पिरियड्स गमावून बसलेल्या एखाद्या वृद्धेने, मला दिवस जाणार आहेत, सांगण्यासारखे सत्ता हातून गेल्यानंतर सत्ता हातून गमावल्यानंतर भाजपा संघातले पार पडलेल्या विधान सभा निवडणुकीनंतर बोलत सुटायचे बोलत सुटले, आणि त्यांच्या या बोलण्याला सांगण्याला फारसा अर्थ नव्हता पण अचानक एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रेताच्या घरातल्यांना तो मेला, कायमचा सोडून गेला यावर जसा काही काळ विश्वास बसत नाही तसे राज्यातल्या भाजपाचे झाले होते जे ऐकून ऐकून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची करमणूक व्हायची. अर्थात अद्यापही या धक्क्यातून भाजपा पूर्णतः सावरलेली नाही. अगदी अलीकडे भाजप ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे देखील पुन्हा हेच म्हणाले कि महाआघाडी सरकार पुढल्या ११ दिवसात कोसळणार आहे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अलीकडेच जे जाहीर वक्तव्य केले ते मात्र अतिशय अर्थपूर्ण वाटले. ते म्हणाले यापुढे आमचे शिवसेनेशी कायमस्वरूपी संबंध संपले आहेत तुटले आहेत त्यामुळे आमची त्यांच्याशी पुन्हा युती, अशक्य आहे अजिबात शक्य नाही…
भाजपा नेत्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या असलेल्या युतीच्या जगण्याची मोठी आशा होती, उद्धव पुन्हा आपल्याकडे परततील अशी त्यांना आशा होती पण उद्धव यांचे घटस्फोट घेतलेल्या तरुणीसारखे झाले होते पुन्हा पूर्वीच्या नवर्याकडे परत न येता नवीन संसार थाटून लेकरबाळे होऊ द्यायची, पद्धतीचे उद्धव यांचे धोरण ठरलेले असल्याने पुन्हा सेना भाजपा युती होणार नाही. नेमके हे लक्षात आल्यानेच, शरद पवारांपासून दुखावलेल्या दुरावलेल्या त्यांच्या नेहमीच्या स्वभावाला बळी पडलेल्या राज ठाकरे यांना विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी चुचकारायला सुरुवात केली त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले आहे, त्या दोघात म्हणजे मनसे आणि भाजपा मध्ये युती होण्याचीच आता अधिक शक्यता निर्माण झाल्याने पवार देखील काहीसे अस्वस्थ झाले आणि त्यांनी पुन्हा नेहमीच्या स्वभावानुसार जाहीर बोलून दाखविले, सांगून टाकले कि त्यांचे राज यांच्याशी बोलणे होते थोडक्यात त्यांचे आणि राज यांचे अद्याप राजकीय संबंध दुरावलेले नाहीत असेच पवारांना सुचवायचे होते पण पवार यांची हि राजकीय थाप राज ठाकरे आणि भाजप यांच्यात नक्की कटुता निर्माण करणारी नाही…
www.vikrantjoshi.com
उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका पुन्हा हाती घ्यायची आहे पुन्हा त्यांना तेथे सत्ता मिळवायची आहे, त्यामुळे ते माआघाडीतून बाहेर पडणार नाहीत आणि पवारांचा तर प्रश्नच उद्भवत नाही कारण त्यांना महाआघाडीतून बाहेर पडणारे या वयात या अवस्थेत परवडणारे नसल्याने त्यांनी राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेच्या खांद्यावर मोठ्या खुबीने बंदूक ठेवून राष्ट्रवादीची पाळेमुळे अधिकाधिक खोलवर रुजविण्यास सुरुवात केली आहे, स्वतः शरद पवार, अजित पवार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे पवार पायाला भिंगरी लागल्यागत राज्यातल्या कानाकोपऱ्यात फारसे इतरांच्या नजरेत येऊ न देता दिनरात एक करून आपला पक्ष बळकट करण्यात गुंतले आहेत. त्यामानाने शिवसेना विशेषतः काँग्रेस तर फार बेसावध आहे निदान माझ्या नजरेला तरी तसे जाणवते आहे. खुर्चीच्या मोहाला बळी न पडता जर काँग्रेस महाआघाडीतून बाहेर पडली तरच काँग्रेस महत्व आणि अस्तित्व वाढेल, कमी होणार नाही. काँग्रेसमध्ये एकटे पृथ्वीराज चव्हाण सोडल्यास इतर साऱ्या नेत्यांची मंत्र्यांची अवस्था ओवाळून टाकलेल्या बाईवर फिदा होणाऱ्या वेड्या माणसासारखी झालेली आहे. त्यांच्यातले विजय वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण असे बोटावर मोजण्या इतके नेते ज्यांच्यां लक्षात आले आहे कि पवारांनी त्यांना मोठ्या खुबीने उल्लू बनविलेले आहे ज्यामुळे नजीकच्या काळात भविष्यात काँग्रेसचे स्वतःचे मोठे नुकसान होणार आहे. उद्धव सावध नाहीत असे भासवितात मात्र त्यांचे डावपेच प्रसंगी भल्याभल्यांना घाम फोडणारे असतात, उद्धव केवळ वरून शांत भासतात प्रत्यक्षात ते तसे अजिबात नाहीत, ते कोणाचीही विकेट पाडू शकतात एवढे जरी इतरांनी लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी