प्रत्येकास का वाटली करावीशी अजितदादांची ऐशीतैशी :
वास्तविक अजित पवार यांची याठिकाणी त्या पराक्रमी महाभारतातल्या महान अभिमन्यूशी तुलना करणे नवक्कीच तुलनात्मक दृष्टया अजिबात रास्त नाही योग्य नाही पण दुसरे अन्य उदाहरण आठवले नाही, माफ करा. चारही बाजूंनी बलाढ्य शत्रूंनी घेरलेले, आत घुसून कित्येकांना थेट यमसदनी पाठविणाऱ्या अभिमन्यूला मात्र संध्याकाळी युद्धाची समाप्ती होता होता नेमके कसे कोठून केव्हा कोणत्या मार्गाने बाहेर पडावे, कळत नव्हते त्याच्या मनाचा उडालेला गोंधळ एका अनुभवी सेनापतीच्या लक्षात आला, गोंधळलेला अभिमन्यू मग त्याचठिकाणी जणू खिंडीत गाठला गेला नि त्याक्षणी त्याला एकाचवेळी अनेकांनी वार करीत ठार मारले, येथे बेरकी काका त्या सेनापतीच्या भूमिकेत, वयोवयुद्ध पण दीर्घ अनुभवी शरदकाका ज्यांच्या अंगाखांदयावर सतत जवळपास साथ वर्षे पवारांच्या घरातला एकमेव हाच अजितदादा कधी खेळलेला तर कधी मुतलेला, त्यामुळे अजितची नेमकी व नक्की कोंडी करून त्याला राजकीयदृष्ट्या कसे जखमी करायचे त्काकांना तोंडपाठ, ऐन मोक्याच्या क्षणी आधी दादाने त्यांना धोका दिला मग नेमकी संधी साधत काकाने देखील असा काही एकच वार केला ज्यात दादा पूर्णतः घायाळ झाला काकाने आज त्याचा थेट अभिमन्यू करून ठेवला आहे वास्तविक मी सतत अनेक काही वर्षांपासून मिशन देवेंद्र फडणवीस राबवित असतांना त्यांच्या बेभरवशाच्या सवंगड्याचे वाभाडे काढणे नैतिकदृष्टया योग्य नाही पण साऱ्यांचीच टीका गळ्यापर्यंत आलेली असल्याने मी किमान अजित पवारांवर दोन लेख लागोपाठ लिहून काढत असतांना नैतिकता नक्कीच बाजूला ठेवलेली आहे…
www.vikrantjoshi.com
अतिशय महत्वाच्या मुद्द्याला हात घालत या लिखाणाला सुरुवात करतो, या राज्यातली प्रत्येक व्यक्ती मग ती डाव्या किंवा उजव्या कुठल्याही विचारांची असेल, भाजप संघाची असेल किंवा ठाकरे अथवा शिंदे शिवसनेतली, काँग्रेस राष्ट्रवादी शेकाप लाल बावटा वंचित आप इत्यादी किंवा थेट कडवा मुसलमान असेल थेट संघाचे स्वयंसेवक किंवा भाजपा महायुतीला मतदान करणारे असतिल अथवा नसतील पण एकमेव फॅक्ट सांगतो नेमके सत्य सांगतो कि राज्यात प्रत्येकाचे म्हणजे अगदी कट्टर विरोधकांचे सुद्धा त्या देवेंद्र फडणवीसांवर मनापासून उत्तम नेता या नात्याने फडणवीसांची जात बाजूला ठेवून अगदी अतोनात प्रेम आहे आणि त्यातल्या प्रत्येकाचेहेच म्हणणे किंवा सांगणे आहे कि देवेंद्र फडणवीस तुम्ही अजित पवारांवर प्रेम केले तेथपर्यंत ठीक होते पण त्यांना तुम्ही महायुतीमध्ये आधी स्थान देऊन लगेच सत्तेत का घेतले, ज्याची काहीही गरज नव्हती, फडात नाचणारीला तेथेच सोडून घरी परतायचे असते घरात सून म्हणून स्थान द्यायची अजिबात गरज नसते. देवेन्द्रजी, केवळ अजित पवार गटाला जवळ घेतल्याने त्यांचे प्रत्येकाचे त्यामुळे गुन्हे माफ झाल्याने त्यातल्या अजितदादांसहित समस्त बदमाशांना सत्तेत घेतल्याने तुम्ही तुमच्या महायुतीने स्वतःच्या पायावर भला मोठा धोंडा तर मारून घेतलाच आहे पण संघ विशेषतः भाजपा ज्याच्या त्याच्या मनातून बऱ्यापैकी उतरला आहे, जो विश्वास पुन्हा मिळविण्यासाठी देवेन्द्रजी तुम्हाला लोकसभा मतदान आटोपण्यापूर्वी मोठे प्रयास करावे लागणार आहेत नक्की…
तुम्हाला तर मी हे सांगितलेच आहे कि इतर मीडिया काय सांगते बोलते जमल्यास दुर्लक्ष करा पण मी जे अंदाज वर्तवणार आहे ते अगदी शंभर टक्के खरे ठरणार आहेत म्हणून आजच उद्याच्या बारामती लोकसभा निवडणुकीचा निकाल येथे तुम्हाला सांगतो आहे आणि निकाल असा कि सुनेत्रा अजित पवार या महायुतीच्या उमेदवाराचा पराभव जवळपास नक्की आहे आणि सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे आजचे स्पष्ट चित्र आहे. असा नेमका कोणता नेता आहे तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही कि जो नेता अनेकदा जेव्हा पुण्यात रात्रीच्या मुक्कामाला असतो तेव्हा जेथे बायको मुले वास्तव्याला तेथे तो मुक्कामाला न थांबता त्याचा हमखास मुक्काम एका वेगळ्याच महालात असतो, नेमके हेच दृश्य आजही त्या बारामतीत पाहायला मिळते आहे म्हणजे केवळ शरीराने त्या विजय शिवतारे हर्षवर्धन पाटील राम शिंदे मंत्री चंद्रकांत पाटील पद्धतीचे महायुतीचे अनेक नेते आहेत कि जे एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेमाखातर किंवा आग्रहावरून जरी वरकरणी सुनेत्रा पवारांना आम्ही निवडून आणू सांगत सुटले असले तरी वस्तुस्थिती नेमकी वेगळी आहे किंबहुना महत्वाचे नेमके कोणते नेते केवळ दिखावा म्हणून सोबतीने आहोत सांगताहेत पण आतून विरोधात आहेत, मी तर नावांची यादीच शिंदे फडणवीसांसमोर सादर करून मोकळा होईल अर्थात असे रिकामे उद्योग करीत बसल्यापेक्षा अतिशय महत्वाचे सांगतो कि जोपर्यंत शिंदे व फडणवीस एक आव्हान म्हणून इज्जतीचा मुद्दा म्हणून त्या बारामती लोकसभा मतदार संघाची सूत्रे स्वतःकडे घेत नाहीत घेणार नाहीत तोपर्यंत स्वतः अजित पवार यावेळी कोणताही चमत्कार घडवून आणत सुनेत्रा पवारांना लोकसभेला निवडू आणतील दूरदूरपर्यंत वाटत नाहीत, शिंदे फडणवीस आगे बढो मग नक्की बारामतीकर नेते व मतदार महायुतीचा झेंडा हाती घेतील, अजित पवार अनेकांचा कित्येकांचा प्यारा दुश्मन आहे तो कायम ताठ मानेनेच जगायला हवा…
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी