संघाला महत्व द्यावे कि डोक्यातून
हद्दपार करावे :
शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातली उभी केली मोठी केली पण आज हीच शिवसेना जशी ठाकरे घराण्याच्या हातात फारशी उरलेली नाही नेमके ते तसेच रा स्व संघाचे झाले आहे म्हणजे संघाची स्थापना उभारणी व बांधणी नेमकी आणि नक्की अभिमानाने सांगावेसे वाटते कि आमच्या विदर्भातून नागपुरातून झाली आणि संघाची निर्मिती व उभारणी मराठी ब्राम्हणांनी केली, संघाचा जन्म झाल्यानंतर कोणतीही संघटना जशी आर्थिक पाठबळा शिवाय उभी राहू शकत नाही तेच संघाचेही होते सुदैवाने संघाच्या पाठी जसे भटजी तसे शेटजी उभे राहिले आणि बघता बघता संघाने सुरुवातीला विदर्भात नंतर महाराष्ट्रात आणि त्याच दरम्यान हिंदुस्थान झेप घेतली, संघ वाढतोय हे लक्ष येताच शेटजी आणि भटजींची हिंदू संघटना असे विरोधकांनी बदनाम करायला सुरुवात करताच, हिंदूंचे विशाल संघटन या हेतूने प्रेरित झालेल्या संघाच्या सुरुवातीच्या पिल्लर्सनी मग शेटजी भटजी बाजूला होत देशातल्या समस्त हिंदूंच्या हाती संघ विस्ताराची व विचारांच्या प्रसाराची धुरा सोपवली तरीही त्यानंतर अगदी आजतागायत संघ विरोधकांनी शेटजी भटजींची हिंदू संघटना असा अपप्रचार करणे सुरु ठेवले त्यातूनच मग त्या त्या वेळेच्या सरसंघचालकांनी संघाच्या इतर फांद्या म्हणजे मानद संस्था जन्माला घातल्या. जनसंघ, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, संस्कार भारती, स्वदेशी जागरण मंच, सहकार भारती, सेवा भारती, राष्ट्र सेविका समिती इत्यादी जवळपास 34-35 मानद संस्था संघाने देशाच्या कानाकोपऱ्यात नेल्या आणि मोठ्या खुबीने विरोधकांचा जातीयवादी आरोप खोदून काढला ज्यामुळे पुढे भाजपा वाढण्यास संघाची हि अशी युक्ती उपयोगी पडली. ज्यांना अगदी मनापासून राष्ट्र सेवेची आवड आहे त्यांनी उगाच संघ व भाजपाच्या स्पर्धेत न उतरता संघाने देशभर जगभर स्थापन केलेल्या या अशा मानद संस्थांना वाहून घ्यावे, नानाजी देशमुख पद्धतीने हिंदू बांधणीला प्रसंगी आयुष्याचे योगदान द्यावे…
www.vikrantjoshi.com
अत्यंत महत्वाचे म्हणजे जेव्हा मोहन भागवत सरसंघचालक झाले तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपाची नेमकी पीछेहाट झाली होती आणि काँग्रेस जवळपास सर्वत्र सत्तेत होती, विशेषतः मनमोहनसिंग पंतप्रधान असेपर्यंत संघ आणि हिंदुत्व विचार तसेच भाजपाला देशातून हद्दपार करण्याचा मोठा अजेंडा काँग्रेस कधी उघड कधी छुप्या पद्धतीने राबवत होती ज्यात त्यांना मुस्लिम धर्मगुरू, नेते आणि ख्रिश्चन पाद्री अतिशय ताकदीने सहकार्य करीत होते तसेच विदेशातून येणारी वेगवेगळ्या पद्धतीची मदत आदिवासी, गोरगरिबांना वाटून ख्रिश्चन पाद्री मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर घडवून आणण्यात आघाडीवर होते किंवा लव्ह जिहाद पद्धतीने मुसलमान देखील हिंदूंना बाटविण्यात धर्मांत घडवून आणण्यात जोमाने कामाला लागलेले होते, हे जेव्हा संघाने हेरले तेव्हापासून मग समस्त हिंदूंना जागे करण्यात त्यांनी आघाडी घेतली ज्यात मोहन भागवत यांचे मार्गदर्शन संघ आणि त्यांच्या समस्त मानद संस्थांना उपयोगी पडले. आजही तुम्ही जर वेषांतर करून त्या धारावी मध्ये मुक्कामाला गेलात तर तेथल्या गोरगरीब गरजू हिंदूंना धर्मांतर करण्यास ख्रिश्चन चर्च व पाद्री कसे सतत आघाडीवर असतात, बघून तुम्ही नक्की अस्वस्थ व्हाल. संघावर उघड बंदी घालून फसलेले प्रयोग उलट त्यातून झपाट्याने वाढलेला भाजपा हे संघ भाजपा म्हणजे हिंदुत्व संपवायला निघालेल्या काँग्रेस श्रेष्ठींच्या नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर संघाला दहशतवादी संघटना ठरवून संघ भाजपाची प्रतिमा डागाळण्याचे नवे प्रयोग कसे राबविल्या जाताहेत हे त्याकाळी लक्षात आणून देण्याचे मोठे व महत्वाचे काम प्रणव मुखर्जी, नरसिंह राव इत्यादी अनेक कडव्या हिंदू पण काँग्रेस नेत्यांनी सरसंघचालकांच्या किंवा ललवाणी वाजपेयी सारख्या प्रभावी भाजपा नेत्यांच्या लक्षात आणून दिले त्यातून या पद्धतीच्या काँग्रेस नेत्यांना आजही संघ भाजपात मोठ्या आदराने बघितले जाते किंवा त्यांचे नाव घेतले जाते. अतिशय तरुण वयात त्याकाळी मोहन भागवत यांनी संघातल्या आक्रमक स्वयंसेवकांना हेरून राजकारणात पुढे केले ज्यातून मोदी शाह गडकरी फडणवीस मुंडे पद्धतीचे नेते मोठे झाले आणि काँग्रेसचे वासे फिरले ते देशोधडीला लागले…
क्रमश: हेमंत जोशी