होय ! लोकसभा निवडणुकीतले महायुतीचे उमेदवार ठरले :
श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवतील हे तुम्हाला सांगणे म्हणजे प्रशासकीय अधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर हे बाबा सिद्दीकी यांचे नेमके कोण,
व्यावसायिक भागिदार कि घनिष्ठ मित्र त्यावर आमदार आशिष शेलार यांना सांगण्यासारखे, थोडक्यात सुधीर मुनगंटीवार जसे चंद्रपूरातून भाजपातर्फे लोकसभा लढविणार आहेत तद्वत कल्याण लोकसभा मतदार संघातून श्रीकांत एकनाथ शिंदे महायुतीचे उमेदवार असतील आणि महायुतीमधल्या काही स्थानिक प्रभावी नेत्यांचा जरी शिंदे यांना अंतर्गत मोठा विरोध असला तरी मतदानापर्यंत हा विरोध बऱ्यापैकी मावळलेला असेल आणि श्रीकांत नेहमीप्रमाणे पुढले खासदार असतील तद्वत का कोण जाणे पण रत्नागिरीच्या सामंत बंधूंच्या विद्यमान खासदार युद्ध सेनेचे आक्रमक नेते विनायक राऊत गेल्या काही वर्षांपासून डोक्यात बसल्याने, एकनाथ शिंदे यांनाही राऊतांविषयी नफरत असल्याने आज नाही तर गेल्या दोन वर्षांपासून किरण व उदय दोघांनीही किरण सामंत यांनी लोकसभा निवडणुकीत उतरवायचे नक्की केल्याने त्यांनी केव्हाच लोकसभा जिंकण्याच्या दृष्टीने जेव्हा तयारी सुरु केली तेव्हापासूनच भाजपाने देखील रत्नागिरी सिंधुदुर्गातून उमेदवार न लादण्याचा निर्णय घेतलेला असून नारायण राणे परिवार किरण सामंत यांच्या प्रचारात मुसंडी मारतांना हिरिरीने भाग घेतांना तुम्हाला दिसेल, किरण सामंत यांचा विजय जवळपास आजच निश्चित झालेला असूनही किरण तरीही वेड्यागत हा मतदार संघ पिंजून काढण्यात राज्यात आघाडीवर आहेत आणि हि त्यांची मोठी जमेची बाजू आहे, एक मात्र नक्की कि काहीही झाले तरी उदय सामंत लोकसभेचे उमेदवार नसतील त्यांना नेहमीप्रमाणे आमदार होण्यात तेवढा रस आहे…
www.vikrantjoshi.com
केवळ पुण्या मुंबईत नव्हे केवळ राज्यात नव्हे केवळ उत्तरेत नव्हे तर उभ्या देशात ज्या सुनील देवधर यांची भाजपाच्या कठीण कामांची धुरा अंगावर घेऊन टाकलेली जबाबदारी तडीस नेणारा नेता अशी ओळख आहे ते सुनील देवधर दिवंगत गिरीश बापट नसल्याने त्यांच्याऐवजी पुण्यातून लोकसभा लढविण्यास सज्ज आहेत पण आगामी काळात सुनील देवधर हे नितीन गडकरी पद्धतीचे दिल्लीतले प्रभावी नेते म्हणून तुमच्या मार्गात अडचणी निर्माण कारू शकतात हे म्हणे विनोद तावडे यांनी शहा आणि मोदी यांनी नेमके पटवून दिलेले असल्याने तसेच अलीकडे सुनील देवधर यांची पत्रकार योगेश कुटे यांनी घेतलेली मुलाखत हि प्रमोद महाजन पद्धतीची अति महत्वाकांक्षी आहे असेही मोदी आणि शाह यांच्या कानावर मुद्दाम टाकले गेलेले असल्याने, आपला लालकृष्ण अडवाणी संजय जोशी प्रकाश जावडेकर होणार नाही याची मोठी काळजी, दक्षता स्वतः देवधर यांनी घेणे अत्यावश्यक ठरते. सुनील देवधर, मी कायम आपल्या पाठीशी, हे मोदी शाह यांना पटवून देण्यात यशस्वी ठरले तर त्यांची उमेदवारी नक्की आणि पक्की शिवाय ते हमखास निवडूनही येतील. देवधरांनी एक साधे गणित कायम डोक्यात ठेवावे कि वर्गातला हुशार विद्यार्थी सर्वांना आवडतो पण जर तो आगाऊ असेल तर मात्र शिक्षकांच्या आणि इतर विद्यार्थ्यांच्या देखील डोक्यात जाऊन विरोधकांच्या द्वेषाला डावपेचांना बळी पडून शेवटी तो हमखास एक दिवस नापास होतो…
विदर्भातल्या एका विद्यमान आमदाराचा सत्य किस्सा तुम्हाला सांगतो, मुंबई ठाण्यातल्या लेडीज बार वर बंदी येण्यापूर्वी हे आमदार महाशय नित्यनियमाने लेडीज बार मध्ये जायचे आणि नाचायला नवीन पाखरू आले कि बारवाले त्या पाखराला चांगली किंमत मिळते म्हणून हमखास पहिल्यांदा त्या आमदारासोबत पाठवायचे, म्हणजे पहिल्या रात्री आणि पहिल्या रांगेत जशी त्या आमदाराची डिमांड असायची नेमके ते तसेच खासदार सुनील तटकरे बाबत आहे म्हणजे निवडणूक मग ती युतीतर्फे असो वा आघाडीतर्फे, रायगडातून सुनील तटकरे हे ठरलेले उमेदवार आणि हमखास निवडून येणारे खासदार असल्याने यावेळी देखील नवीन असे काहीच नाही, पुन्हा तेच म्हणजे सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार असतील आणि आघाडीतून उमेदवार कोणीही असो, मोठ्या फरकाने ते पुन्हा निवडून येतील. तिकडे नारायण राणे आता थकले आहेत आणि मला यापुढे लोकसभा लढविण्यात अजिबात रस नाही हे निलेश राणे यांनी आधीच सांगितलेले असल्याने आपोआप किरण सामंत यांना आता महायुतीमध्ये स्पर्धा उरलेली नाही विशेष म्हणजे यापुढे नारायण राणे राजकीय निवृत्ती लवकरच जाहीर करतिल त्याचवेळी भाजपा आणि फडणवीस यांनी नितेश राणे यांना पक्षांतर्गत मोठे महत्व बहाल केलेले असल्याने राज्यात पुढल्या पंचवार्षिक योजनेत ते हमखास मंत्री म्हणून शपथ घेतील, नितेश राणे यांना यापुढे फार मोठ्या प्रमाणावर सत्तेतल्या सुवर्ण संधी चालून येतील. रक्षा खडसे आणि पूनम महाजन यांना यावेळी भाजपाची उमेदवारी देण्यात येणार नसल्याने कदाचित विद्यमान खासदार रक्षा खडसे पक्षांतर करतील त्याचवेळी भाजपा या दोन महिलांऐवजी कोणत्या नव्या महिला उमेदवारांना संधी देणार आहे ते देखील मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. रक्षा खडसे ऐवजी तुम्ही, असं गिरीश महाजन यांना भाजपाने कानावर आधीच घातलेले असल्याने तेही जोमाने तयारीला लागले आहेत…
क्रमश: हेमंत जोशी