गल्लीत घातला गोंधळ फडणवीसांना दिल्लीतून पाठबळ :
नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीसांच्या अजित पवारांना लिहिलेल्या पत्रावरून उगाचच संशयाचे धुके कडाक्याच्या थंडीत पसरले, फडणवीस व दादा वाद निर्माण झाला अशा अफवा मुद्दाम पसरविल्या गेल्या त्यात अजित पवारांची भूमिका काहीशी संशयास्पद बरीचशी नाराजीची असल्याने विविध बातम्यांना त्यातून खतपाणी मिळाले आणि तिकडे काका शरदरावांच्या एकाच गालावर छद्मी हसूही फुटले मात्र नेमकी वस्तुस्थिती समोर न आल्याने किंवा याआधी नवाब मलिक पद्धतीची जी दोन प्रकरणे घडलेली आहेत त्याकडे नेमके लक्ष न गेल्याने संशयाचा फायदा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विनाकारण फडणवीस विरोधकांना मिळाला. नवाब मलिक पद्धतीची जी दोन प्रकरणे याआधी घडलेली आहेत त्यावर मी स्वतः नेमकी माहिती देऊन मोकळा झालो होतो, तुम्हाला मात्र त्याचा विसर पडल्याने नेमका हा गोंधळ उडाला. अजित पवार जेव्हा काकांना लाथाडून महायुती मध्ये दाखल झाले तेव्हाच अजितदादा आणि फडणवीसांच्या एकमेकांना दोन महत्वाच्या अटी होत्या, काहीही झाले तरी रोहित पवारांना भाजपा मध्ये प्रवेश द्यायचा नाही हि माझी एकमेव महत्वाची अट, दादांनी फडणवीस किंवा तत्सम दिल्लीतल्या त्यांच्या नेत्यांना त्यांचा खास खर्जातला आवाज काढून अगदी स्पष्ट सांगितले होते आणि रोहित पवारांना विशेषतः फडणवीस जरी प्राधान्याने भाजपात प्रवेश देणार होते त्यांनी तो विचार तडकाफडकी मनातून काढून टाकला त्याचवेळी अजित पवार यांनी देखील अगदी मनातून मनापासून तीव्र इच्छा असतांना केवळ देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेवरून आग्रहावरून त्या एकनाथ खडसे यांचे पार्सल तिकडे काकांकडे सोडून देणे पसंत केले म्हणजे फडणवीसांच्या या सूचनेला जर अजितदादांनी रेस्पॉन्ड केले नसते तर कदाचित हा महायुतीचा राज्याची मोठी राजकीय उलथापालथ ठरलेला डाव बारगळला असता. जेथे अतिरेक होतो अशा पद्धतीच्या भूमिका त्याही फडणवीस घेऊन मोकळे होतील अजिबात शक्य नाही त्यामुळे महायुतीला मान खाली घालावी लागेल हे लक्षात येताच कुठलीही कोणतीही तेही श्रेष्ठींच्या परवानगीची अनुमतीची वाट न पाहता किंवा इतरांच्या नाराजीची पर्वा न करता देवेंद्र उठले आणि अजितदादांना पत्र लिहून मोकळे झाले, मुस्लिमांविषयी त्यांना आकस किंवा द्वेष असता तर त्यांनी हसन मुश्रीफ किंवा अब्दुल सत्तर यांना सत्तेपासून अगदी सहज दूर ठेवले असते पन्नते त्यांच्याकडून घडले नाही मात्र वादग्रस्त नवाब मालिकांना ते महायुतीच्या नेत्यांमधले एक, बघणे शक्य नव्हते, कडक भूमिका घेऊन फडणवीस पुढल्या कामाला लागले…
www.vikrantjoshi.com
आता आणखी एका महत्वाच्या बातमीकडे किंवा मोठ्या राजकीय उलथापलीकडे तुमचे जरी दुर्लक्ष झालेले असले तरी लोकसभा निवडणुकीआधी मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात घडवून आणल्या गेलेले मनोमिलन त्यावर मला येथे नेमके तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. एकनाथ खडसे पद्धतीने पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नेत्यांशी वागू नये, देवेंद्र फडणवीसांशी विनोद तावडे पद्धतीच्या अंतर्गत विरोधक असणाऱ्या मंडळींच्या सल्ल्यांना बळी पडून स्वतःचे एकनाथ खडसे पद्धतीने आयुष्याचे राजकीय नुकसान करवून घेऊ नये, माझे काही महिन्यांआधीचे लिखाण वाचा त्यात नेमके हेच संदर्भ तुम्हाला नक्की वाचायला ऐकायला मिळतील. राजकीय जीवनात किंवा ग्रामविकास खात्याच्या मंत्री असतांना किंवा बीड जिल्ह्याच्या राजकारणात कदाचित अनुभव नसतांना अचानक फार मोठे यश मिळाल्याने पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी सुरुवातीच्या दिवसात आपल्या उथळ आणि उद्धट स्वभावातून यशातला अतिआत्मविश्वास दाखवतांना नेमका फडणवीस आणि धनंजय मुंडे या दोन प्रभावी नेत्यांशी विशेषतः खडसे तावडे घोळक्याच्या सांगण्यावरून सूचनेवरून प्रचंड आर्थिक व राजकीय गोंधळ घातला, या दोघांशी उघड पंगा घेत राज्यात आणि बीड जिल्ह्यात मोठी खळबळ आणि अस्थिरता निर्माण केली आणि त्यात त्या अडकल्या, ज्याचा मोठा राजकीय फायदा धनंजय मुंडे यांना झाला आणि पंकजा आधी पराभूत झाल्याने नेमक्या त्या मंत्री मंडळात देखील दिसल्या नाहीत, त्यातूनच त्यांना व्यक्तिगत आयुष्यातील अतिशय कठीण व काटकटींचा सामना करवा लागला, जणू नशिबाचा मोठा फटका त्यांना बसला….
मात्र सुदैवाने पंकजा मुंडे यांचा इतरांनी जसा फडणवीसांशी पंगा घेऊन स्वतःचा राजकीय कचरा करवून घेतला ते येथे घडले नाही, आधी त्या शांत झाल्या त्यानंतर त्यांनी संतांचे दर्शन व मार्गदशन घेऊन विविध अनेक मंदिरांना साकडे घालत त्या राजकारणातून अलिप्त राहून राज्यात ठिकठिकाणी फिरल्या जेथे त्यांचे नाही म्हणायला बऱ्यापैकी स्वागतही झाले थोडक्यात काय तर कठीण प्रसंगी त्या दोन पावले मागे आल्या आणि आपणहून त्यांनी फडणवीस आणि धनंजय मुंडे किंवा राज्यातल्या त्यांच्या मान्यवर नेत्यांशी सुसांवाद सुरु केला त्यातून पुन्हा आता त्यांना पूर्वीचे राजकीय सुगीचे बागडण्याचे दिवस येण्याची म्हणाल तर प्रक्रिया सुरु झालेली आहे म्हणाल तर त्यांच्या यश दृष्टीक्षेपात आल्याने आता यादिवसात आधीच्या नाराज निराश पंकजा स्वतभोवती आनंदाच्या गोल गोल गिरक्या मारताहेत, बागडताहेत आनंदाने नाचताहेत. आधी जे शिंदे फडणवीस धनंजय आणि अजित पवार यांच्यात नेमके ठरले होते बोलणे झालेले होते तेच बीडच्या अलिकडल्या जाहीर सभेत समस्त मंडळींना बघायला मिळाले, फडणवीस आणि धनंजय यांनी अगदी मनापासून पंकजा यांना धाकटी बहीण म्हणून जवळ घेतले आहे आणि त्याचवेळी एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी त्यांना आशीर्वाद दिले असल्याने यापुढे पुन्हा एकवार अगदी झपाट्याने पंकजा यांना सत्तेतले सुगिचे दिवस आल्याचे तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे. पंकजा, प्रीतम आणि पूनम महाजन वास्तविक या तिघींच्याही पाठीशी त्यांच्या वडिलांची भली मोठी राजकीय पुण्याई पण जसे घरातले लेकरू लाडके असले तरी आपण स्वतःच्या कानात त्याला मुतवून घेत नाही तेच नेमके येथे घडले म्हणजे लाडक्या नेत्यांच्या पोरी पण वाट्टेल त्या पद्धतिने राजकारणात वागून बोलून चालत नसतांना त्या विनाकारण आड वळणाने निघाल्या आणि पायावर त्यांनी कुर्हाड मारून घेतली मात्र अलीकडली पंकजा यांची बदललेली भूमिका आणि वृर्ती, चांगले मार्ग त्यातून पटापट निघतील. पंकजा आणि धनंजय कायमस्वरूपी सतत एकत्र, बीड जिल्ह्यात त्यांचा त्यातून कायम वरचष्मा राहील…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी