छप्पर फाडके असंख्य कार्यकर्त्यांसहित नेते निघाले भाजपाकडे

छप्पर फाडके असंख्य कार्यकर्त्यांसहित नेते निघाले भाजपाकडे :

एखाद्या मंदिरातला भटजीने खिरापत वाटायला सुरवात केल्यानंतर बालकांपासून तर वृद्धांपर्यंत जसे एकाचवेळी असंख्य हात तेही दाटीवाटीने पुढे येतात किंवा नळावर पाणी भरण्या आलेल्या बायका जशा, आधी माझी आधी माझी पद्धतीने तावातावाने आपापल्या पाण्याच्या बादल्या पूढे करण्यात रेटारेरी भांडाभांडी मारमारी करतात तेच राज्यातल्या काँग्रेसमध्ये घडणार आहे किंवा घडलेले आहे म्हटल्यास वावगे ठरू नये कारण कार्यकर्त्यांपासून तर नेत्यांपर्यंत नेमकी सत्तेची सवय लागलेल्या असलेल्या ज्याला त्याला राज्यातल्या आणि देशातल्या निष्प्रभ ठरलेल्या काँग्रेस नेतृत्वाचा उबग आलेला आहे किंवा नजीकच्या काळात पुन्हा एकवार काँग्रेस जोमाने जोशात पुढे येऊन सत्ता काबीज करेल असे चिन्ह दूरदूरपर्यंत दिसत नसल्याने अपेक्षाभंग झालेले महाराष्ट्रातले अनेक असंख्य, राज्याच्या कानाकोपऱ्यातले आमदार नेते आणि कार्यकर्ते पुढल्या काही दिवसात अगदी शंभर टक्के तेही विचारांशी कमालीची तफावत असलेल्या भाजपा मध्ये दाखल होणार आहेत झुंडीच्या झुंडी सामील होणार आहेत आणि त्यानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा लगेचच विस्तार होईल ज्यात राज्यातल्या किमान दहा काँग्रेस आमदारांचा समावेश असेल विशेष म्हणजे विस्तारात महिला आमदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश असेल. शॉकिंग न्यूज अशी कि संघ आणि भाजपाचे हिंदू मिशन हे त्या ख्रिश्चन मिश्नर्यांपेक्षा देखील एवढे खतरनाक असते कि जसे आजतागायत बौद्ध किंवा ख्रिश्चन धर्म अलिकडल्या शतकात जगभर झपाट्याने पसरला त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने याच संघ भाजपावाल्यांनी आपला हिंदू धर्म जर जगभर नेऊन अनेक धर्मांतरे घडवून आणली किंवा उत्स्फूर्त धर्मांतरे घडली तर ती माझी नेमकी माहिती होती हे तुम्ही लक्षात ठेवावे. राज्यातल्या काँग्रेस मधल्या अनेक हिंदू कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना याच हिंदू प्रेमापोटी त्या भाजपाचे वेध लागलेले होते पण अलीकडे राज्याच्या राजकारणात चाललेला माजलेला अभूतपूर्व गोंधळ त्यातून काँग्रेस कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा भाजपा प्रवेश नेमका लांबणीवर पडत होता पण अलीकडे पार पडलेल्या पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुका ज्यातून हिंदुत्व आणि मोदी यांचे प्रभावी ठरलेले नेतृत्व, महाराष्ट्रातल्या घडामोडींना अचानक वेग आला आणि आता कोणत्याही क्षणी मोठ्या प्रमाणावर राज्यातले काँग्रेसचे अनेक आमदार नेते आणि कार्यकर्ते ज्यात महिला व तरुणांचा मोठा भरणा असेल, भाजपावासी झालेले असतिल, ज्यांचा संघाशी दूरदूरपर्यंत कधी संबंध आलेला नाही असे हे कार्यकर्ते नेते उद्या जर नमस्ते सदा वत्सले मातृभूमे म्हणताना दिसले तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका, उद्या आम्हा हिंदूंचा आहे आणि समस्त हिंदूंना इतर धर्मांविषयी अजिबात राग नाही द्वेष नाही तिरस्कार नाही. आणखी एक सांगतो, मोदी आणि शाह मोठ्या तयारीला लागलेले आहेत कारण पुढल्या वेळी तेलंगणा त्यांना ताब्यात घ्यायचाच आहे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top