राज्याच्या राजकारणात मिशन आणि कमिशन :
तळे राखी तो पाणी चाखी उक्तीनुसार जबाबदारी किंवा एखादे मिशन पार पाडताना स्वतःसाठी काकणभर बाजूला काढून ठेवणाऱ्यांना भ्रष्टाचार हाच त्यांचा शिष्टाचार आहे असे निदान मी तरी म्हणणार नाही पण हे आपल्या या राज्यात क्वचित घडते, स्वतःच्या जास्तीत जास्त फायद्यासाठी जो तो धडपडतांना दिसतो त्यातून झपाटयाने महाराष्ट्राच्या विकासकामांचा ह्रास होतांना निदान मी तरी अगदी जवळून बघतो अंगाचा दरक्षणी तिळपापड होतो. मेट्रोवूमन अश्विनी भिडे कमिशन म्हणून नव्हे तर मिशन म्हणून काम करतील हि फडणवीसांना मनोमन खात्री होती जे पुढे नेमके घडले म्हणून प्रखर विरोध करणारे आदित्य आणि उद्धव सत्तेत आल्यानंतर देखील त्यांनी अश्विनी यांना झिडकारले नाही, राष्ट्राच्या राज्याच्या भल्यासाठी झटणाऱ्यांची हि अशी किंमत केल्या जाते. आज मनातले सांगतो, माझ्या आयुष्यातल्या एका मोठ्या गुपितचा थोडा अंश त्यातला सांगतो कि एकेकाळी मला शरद पवार आणि सुधाकरराव नाईक आळीपाळीने या दोघांच्या सानिध्यात राहून मिशन म्हणून एखाद्या पाद्र्यासारखे त्यांच्या सावलीखाली काम करायचे होते, पण दुरदैवाने ते घडले नाही त्यानंतर अमुक एखाद्या नेत्यासाठी भावुक होऊन आजतागायत मी कधीही काम केले नाही, अनेकांच्या उपयोगी आजही पडतो पण त्यात सातत्य ठेवत नाही त्यामुळे पदरी आता कधीही निराशा पडत नाही. पवारांकडे गुरुनाथ कुलकर्णी होते, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतीने सुधीरभाऊ जोशी किंवा फडणवीसांच्या सोबतीने जसे शैलेश जोगळेकर पद्धतीचे मोठ्या उत्तुंग नेत्यांच्या सोबतीने मिशन राबविणारे क्वचित खचित, पेक्षा कमिशन मिळवून श्रीमंत होणारे पण मिशन म्हणून काम करतो असा केवळ भास निर्माण करणारे मोठ्या प्रमाणावर प्रत्येक नेत्यांच्या सत्तेच्या आसपास सतत असतात त्यातूनच आजची अराजकता निर्माण झालेली आहे…
www.vikrantjoshi.com
कमिशन म्हणून नव्हे तर मिशन म्हणून आधी सर्वस्वाचा त्याग करून उभे आयुष्य केवळ राष्ट्र हितासाठी चोवीस तास झटणारे बघण्यासाठी तुम्हा आम्हा कोणालाहि राष्ट्राबाहेर जाण्याची अजिबात गरज नाही एकट्या मोदींवर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन कार्यपद्धतीवर जवळून नजर टाका, जगभरात या संघात दरदिवशी असे कितीतरी नरेंद्र मोदी राष्ट्राच्या भल्यासाठी आणि मूठभर हिंदुत्व टिकविण्यासाठी आजही राब राब राबतात हे सडका मेंदू असलेल्या महाराष्ट्रातल्या बहुसंख्य भ्रष्टाचारी स्त्री पुरुषांच्या देखील एका क्षणात ते लक्षात येईल. हिंदुत्व रा. स्व. संघ आणि हिंदुस्थान बघता बघता केवळ अलिकडल्या सात आठ वर्षात याच मोदींनी आदराच्या प्रगतीच्या भूमिकेतून जगाच्या कानाकोपऱ्यात आणि हिंदुस्थानातील घराघरात कौतुकाचा विषय करून सोडला कारण मोदी आणि संघ मिशन म्हणून राबले राबतात आणि राष्ट्रभक्तीची महाराष्ट्राच्या प्रगतीची प्रेमाची हीच नेमकी फार मोठी मस्ती त्या देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात चोवीस तास असते म्हणून अलीकडे माझ्यासारख्या निर्भीड निरपेक्ष पत्रकाराला आवडलेले हे नरेंद्र आणि देवेंद्र. निदान माझ्यासारख्या पत्रकाराची भूमिका एखाद्या गाव न्हाव्यासारखी असते म्हणजे तो गावातल्या हमालाचा चमन गोटा करून मोकळा होतो आणि गाव प्रमुखाची देखिल त्याला मान खाली घालायला सांगून भादरून ठेवतो तेच माझेही, पण धाकधुकीच्या संशयाच्या वातावरणात गवसले हे नरेंद्र आणि देवेंद्र म्हणून त्यांच्या भूमिकांकडे सातत्याने निरखून पाहतो त्यावर बिनधास्तपणे लिहून मोकळा होतो….
सुरुवात नेमकी कोठून किंवा कशी करावी, आज दुसऱ्यांदा माझा असा गोंधळ उडाला आहे, पहिल्यांदा गोंधळ उडाला तो मधुचंद्राच्या राती, फार वर्षांपूर्वी, आता तसे अजिबात नाही म्हणजे मित्र तर मला मधुचंद्र आणि लैंगिक समस्येतले तद्न्य म्हणून ओळखतात तसा अनेक माझा सल्ला देखील घेतात किंबहुना मलूल पडलेल्या म्हातार्या मित्रांचा तर मी आणि प्रशांत दामले आशेचा किरण समजल्या जातो. आज दुसऱ्यांदा गोंधळ उडालाय त्या विश्वास पाठक यांच्यामुळे कारण पाठक यांच्यावर खूप काही लिहिण्यासारखे असल्याने नेमकी सुरुवात कशी किंवा कोठून करावी सुचत नाही, प्रयत्न करतो. “माझ्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे मी ती सतत लक्ष घालून पार पाडेलच पण माझे काम हलके करण्याची यापुढे तुमची मोठी जबाबदारी, ऊर्जा खात्याचा मंत्री या नात्याने मला मान खाली घालायची नाही कारण ऊर्जा खाते हा या राज्यातील सर्वसामान्यांचा शेतकार्यांचा नागरिकांचा अतिशय स्फोटक आणि जिव्हाळ्याचा विषय. महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या विद्युत महामंडळाच्या तिन्ही प्रमुख फांद्यांचा एक संचालक म्हणून मोठी जबाबदारी मी तुमच्यावर पुन्हा एकवार टाकतो आहे, माझी सरकारची आणि राज्याची राष्ट्रात मान उंचावेल अशी मोठी महत्वाची कामगिरी पार पाडण्याची जबाबदारी आता तुमची” असे अगदी ठणकावून त्या फडणवीसांनी जेव्हा ते उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली केवळ पुढल्या काहीच दिवसात त्यांनी ऊर्जा या विषयाचे अब्दुल कलाम म्हणून अल्पावधीत ओळखल्या जाणार्या कट्टर संघ स्वयंसेवक म्हणून ख्याती असलेल्या विश्वास पाठक यांना वर उल्लेख केलेले कडक शब्दातले बोल सुनावले आणि मित्र प्रेमाने जवळ घेत एकत्र विद्युत महामंडळाच्या एका प्रमुख व महत्वाच्या पदाची जबाबदारी दुसऱ्यांदा टाकली आणि अल्पावधित पाठक यांनी जनतेचा व फडणवीसांचा विश्वास नावाप्रमाणे सार्थ ठरविला, तो कसा आणि नेमके चकित करणारे भारावून टाकणारे सत्य किस्से अर्थात पुढल्या भागात….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी