जिल्ह्यात दारूबंदी तरीही नेत्याची चांदी
तारुण्याच्या उंबरठ्यावर उघडे नागडे फोटो किंवा लैंगिक विषयावर आकर्षणापोटी वयात आलेली मुले भीतीपोटी आकर्षण किंवा उत्सुकतेपोटी वरून श्यामची आई पुस्तक ठेवून आणि आत या अशा लैंगिक भावना चेतावणारी पुस्तके, वाचण्याचा एक जमाना होता, नंतर व्हिडीओ प्लेअर्स चा जमाना आला आणि घरा घरातून किंवा मित्र एकत्र येऊन व्हिडीओ भाड्याने घेऊन वीक एंड्सला हमखास ब्लू फिल्म्स बघायचे त्यावर कितीतरी चावट गप्पा रंगायच्या,आता अगदी सऱ्हास ब्ल्यू फिल्म्स बघता येत असल्याने ती उत्सुकता जशी केव्हाच संपली आहे, तेच दारूच्या व्यसनाचे, ज्या वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे तेथेच नेमकी दारूला प्रचंड मागणी असल्याने दारूच्या बाटल्या अगदी सहज या दोन्ही जिल्ह्यात उपलब्ध असतात आहेत. स्थानिक अधिकारी आणि पुढारी दोघांच्या सहमतीने कृपेने तेथे अवैध दारू विक्रीचा खुलेआम व्यापार सुरु असतो, हाकेच्या अंतरावर दारू अगदी सहज विक्रीला उपलब्ध असते, राज्याबाहेरून आलेली स्वस्त किंवा नकली दारू गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात थेट चोवीस तास उपलब्ध असते. एरवी सतत विरोधात राहून बसून तत्वाच्या सत्वाच्या जाहीर गप्पा मारणार्या आणि वाईट काळ्या आणि दारू विक्रीच्या धंद्यात व्यवसायात फार मोठा ” विजय ” मिळविणाऱ्या एका भाजपा विरोधातल्या विदर्भातील खादाड आणि लबाड नेत्याची हि एक सत्य कथा. जे मला समजते किंवा समजले जे पुरावे माझ्या हाती आले ते सत्ताधाऱ्यांच्या मग ते शंभूराजे देसाई असतील किंवा गडचिरोली या दुर्गम जिल्ह्यावर सतत नजर व लक्ष ठेवून असणारे थेट देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अथवा स्थानिक मंत्री धर्मराव बाबा आत्राम असतील, जे मला या नेत्याच्या दारू विक्रीबाबत नेमके समजले पुरावे हाती आले ते या उल्लेख केलेल्या मंडळींकडे नाहीत हे असे येथे सांगणे म्हणजे सेक्स विषयी धृतराष्ट्राला लालू यादवला काहीही ज्ञान नव्हते असे म्हणणे.गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना देखील तेथे संपूर्ण जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात तीही परराज्यातून नियमित दररोज येणारी दारू अगदी सहज विकत मिळते आणि या अवैध दारू विक्रीमागे एकमेव मोठा नेता आहे ज्याच्या नावात आणि ज्याला काळ्या धंद्यात आजतागायत सतत ” विजय ” मिळाला आहे या भामट्या लबाड गुंड नीच नेत्याने त्यातून कोट्यवधी रुपये मिळवून प्रचंड मालमत्ता मुलींच्या नावाने आणि कुटुंबाच्या नावाने जमा केलेली आहे. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे या नेत्याची विवाहित मुलगी जी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सतत धुमाकूळ घालते आहे तीच या अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात आघाडीवर आहे प्रमुख आहे, ऐन तारुण्यात तिला अवैध दारू विक्रीच्या व्यवसायातले ” आंटी ” म्हणून ओळखतात किंवा याच नावाने तिचा उल्लेख केल्या जातो. अर्थात काळ्या धंद्यांचा हा सम्राट विदर्भातल्या नेमक्या आणखी या पद्धतीच्या कोणकोणत्या व्यवसायात गुंतलेला आहे हे मी नक्की क्रमाक्रमाने उघड करणारच आहे. आमदार होण्यापूर्वी त्यावेळेचे शिवसेना नेते नारायण राणे यांच्या तुकड्यावर जगणारा हा नेता ज्याने गरज संपल्यानंतर त्याच राणेंना फसविले त्यांच्याकडे पाठ केली, आज त्याच नेत्याकडे दिपवून टाकणारी संपत्ती बघून त्याच्याकडे आयकर खात्याचे किंवा ईडीचे लक्ष गेल्याचे मला अलीकडे समजले आहे, ऐनवेळी संकटातून बाहेर पाडण्यासाठी प्रसंगी भाजपा नेत्यांचे पाय पकड्ण्यात लज्जा सोडून वागणाऱ्या या नेत्याला विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी अजिबात पाठीशी घालू नये असे समस्त गडचिरोली जिल्ह्यातील बहुसंख्य भाजपा नेत्यांना किंवा संघवाल्यांना अगदी मनापासून वाटते, विशेष म्हणजे विजयबाबू यांचे हे काळे धंदे आणि दारू विक्रीच्या व्यवसायातले पुरावे एक धाडसी भाजपा नेत्या गोळा करतोय त्याला या नेत्याच्या विरोधात मोठा लढा उभा करायचा आहे….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी