माझा खुलासा शिंदेंना दिलासा :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच दिल्लीत जातील केंद्रात मंत्री म्हणून शपथ घेतील हे मी 23 ऑगस्ट रोजी सकाळी लिहिले त्यावर भाजपा आणि शिंदे अंतर्गत दिवसभरात काही खलबते घडून आली खळबळ माजली अस्वस्थता पसरली चिंतेचे नाराजीचे वातावरण तयार झाले आणि त्याच दिवशी संध्याकाळी, एकनाथ शिंदे हि पंचवार्षिक योजना संपेपर्यंत कोणत्याही परिसस्थित पायउतार होणार नाहीत हे स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तेही थेट मीडियासमोर जाहीर केले. लोकसभा आणि विधान सभा निवडणुका पार पडेपर्यंत फडणवीस शिंदे आणि अजित पवार या तिघांवर मोठी राजकीय जबाबदारी टाकण्यात आलेली आहे तिघेही त्यातून मोठ्या राजकीय तणावाखाली असल्याची माझी माहिती आहे किंबहुना येणाऱ्या निवडणुकांच्या नेमक्या यशापयशावर त्यांचे प्रत्येकाचे राजकीय भविष्य भवितव्य अवलंबून आहे अशावेळी नको ते राजकीय बदल घडवून आणायचे आणि महायुतीने स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेणे नक्की कटकटीचे ठरणारे असल्याने एकनाथ शिंदे यांच्याऐवजी फडणवीस किंवा अजितदादा यांचा विचार करणे नक्कीच मागे पडलेले आहे, वास्तविक निवडणुकांचे नियोजन जर देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्यावरून या राज्यात पूर्णतः केल्या गेले असते तर फार मोठे यश महायुतीच्या पदरात पडले असते पण ते नेमके घडले नाही, ज्यांना नेमका भावनिक महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या फारसा समजलेलाच नाही त्यांनी केवळ देवेंद्र फडणवीस यांचे महत्व मर्यादित ठेवण्यासाठी नको तेवढा अधिक राजकीय हस्तक्षेप केला आणि राज्याच्या राजकारणाची विशेषतः संघ भाजपा परिवाराची घडी विस्कटवून ठेवली आहे आणि दिल्लीतल्या शाह पद्धतीच्या प्रभावी नेत्यांचे कान भरण्याचे पाप दुर्दैवाने येथल्या काही नेत्यांनी करून ठेवलेले आहे. 2024 लोकसभेला नरेंद्र मोदी पुन्हा एकवार पंतप्रधान होतील मात्र त्यांना अपेक्षित असलेले महाराष्ट्रातून मोठे संख्याबळ मिळणे तेवढे सोपे नाही, त्यावर आलेल्या मर्यादा भरून काढणे अजिबात शक्य नाही तरीही शिंदे फडणवीस आणि अजित पवार जीवाचे रान करून दिल्लीकरांनी विस्कटून ठेवलेली घडी पुन्हा सावरण्याचा नक्कीच प्रयत्न करतील कारण त्यावरच त्या तिघांचे नेमके राजकीय भवितव्य ठरणार आहे….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी