राज्यातले राजकारण : जो भी कहूँगा सच कहूँगा
माझे प्रत्येक लेख आणि व्हिडीओ तुम्ही मनात हृदयात कोरून ठेवा कारण त्यात जे घडणार आहे ते खूप आधी सांगून ठेवलेले असते. 16 जुलै रविवारच्या खुपते तेथे गुप्ते कार्यक्रमात अमृता फडणवीस जे देवेंद्र फडणवीस यांना थेट स्पष्ट न लपविता म्हणाल्या तेच मी खूप महिने आधी तुम्हाला सांगून ठेवले होते किंबहुना मी जे भय्यू महाराजांना सांगत असे तेच फडणवीसांना देखील येथे सांगितलेले आहे कि आपला राजा किंवा आपला देव आजारी आहे आजारी असतो त्याला दुर्धर व्याधींनी पछाडलेले आहे हे त्याच्या अनुयायांना त्याच्या प्रजेला त्याच्या चाहत्यांना आवडणारे नसते त्यांना ते अस्वस्थ करते अर्थात भय्यू महाराज अनेकदा आजारी नसतांना देखील आजारी आहोत सांगून एकतर नको त्याठिकाणी गायब असायचे किंवा त्यांना या पद्धतीची सिम्पथी त्यांना त्यांच्या भक्तांकांकडून मिळविण्यात स्वारस्य असायचे आणि अमृता तेच म्हणाल्या कि देवेंद्रजींनी वेळेवर जेवण घ्यावे खावे प्यावे तसेच त्यांनी व्यायाम तोही नियमित करून स्वतःचे प्रकृती स्वास्थ्य सर्वप्रथम जपणे अत्यावश्यक आहे असते. फडणवीसांच्या दोन पावले पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना तर सडकून भूक लागल्यास रस्त्यावरचा वडा पाव देखील चालतो, शिंदे त्या दिवंगत आनंद दिघे यांची प्रत्येक बाबतीत फक्त सिगारेट सोडल्यास हुबेहूब नक्कल करतात म्हणजे खिसे उपडे होईपर्यंत गरजूंना वाटायचे, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष आणि दररोज न चुकता उशिरापर्यंत जागून लोकांच्या गराड्यात मिसळायचे, भेटणार्या प्रत्येकाच्या कामात जातीने लक्ष घालायचे, धाप लागेपर्यंत लोकांना भेटून त्यांचे समाधान करायचे आणि सतत यापद्धतीच्या बेशिस्त दिनचर्येचा फडणवीस शिंदे जोडगळीवर फार मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो किंवा हळूहळू होऊ लागलाय म्हणून त्यांच्यवर निस्सीम प्रेम करणाऱ्यांना त्यांच्या या अस्ताव्यस्त कष्टाळू लाईफ स्टाईल ची चीड येते काळजी वाटते…
www.viktantjoshi.com
आमच्या गावात आमच्या शाळेत जोशी आडनावाचे शिस्तीचे कोकणस्थ ब्राम्हण मुख्याध्यापक होते, त्यांच्या घराची दारे एक वाजता बंद व्हायची आणि तीन वाजता उघडायची समजा एखाद्या दिवशी दारे बंद करायला किंवा उघडायला पाच मिनिटे उशीर झाला तर त्यादिवशी जोशी सर लंघन करायचे स्वतःला शिक्षा करून घ्यायचे, या जोशी सरांमध्ये आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये काडीचाही कवडीचा देखील फरक नाही म्हणजे मला तर कायम अजितदादा बघितले रे बघितले कि जोशी यांची आठवण होते. दादांचे सारे काही अगदी वेळेवर म्हणजे बंगल्यातला साधा सोफा देखील किंचित सरकलेला त्यांना दिसला कि ते स्वतः तो जागेवर आणून मोकळे होतात, कार्यालयात पोहोचायला पाच मिनिटे उशीर झाला तर हेच अजितदादा म्हणे अँटी चेंबर मध्ये येऊन दहा उठाबशा काढतात, गमतीचा भाग सोडा पण दोनच वाईट सवयी सोडल्या तर प्रत्येक नेत्याने त्यांचा आदर्श घ्यावा मात्र पैसे कमविणे आणि आणखी एक वाईट सवय अजितदादांना बदनाम करून गेली. शिंदे फडणवीस हे मात्र दिवंगत आनंद दिघे आणि शरद पवार या दोघांच्याही पावलावर पाऊल, स्वतःकडे पूर्णतः दुर्लक्ष करून स्वतःला सतत कार्यमग्न ठेवणे, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना वाटते, या दोघांचे हे असे धाप लागेपर्यंत कार्यव्यस्त असणे अजिबात योग्य नाही. पिणे फार दूर पण जेवणाच्या बाबतीत देखील अजित पवार यांनी पाळलेल्या मर्यादा, गेल्या चाळीस वर्षात मी दादांना आहेत तसेच बघत आलोय आणि हे असेच लोकनेत्यांनी जगायला हवे. इकडे पार वाटोळे व्हायची वेळ आली तरी स्वतःच्या ऐषोरामी दिनचर्येत तसूभसरीही आजही अजिबात फरक न करणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे, आजही ते स्वतःला बदलवून घ्यायला अजिबात तयार नाहीत आणि त्यांच्या याच वाईट दिनचर्येने आणि लोभी स्वयंकेंद्रित वृत्तीने त्यांना खूप खाली खेचले, तिकडे आग लागो हे इकडे झोपा काढण्यात आराम करण्यात आनंद घेणारे मानणारे…
आता संघ आणि भाजपा परिवारासाठी खुश खबर किंबहुना देवेंद्र फडणवीसांनी भिवंडी येथे भाजपा कार्यकार्त्यांसमोर केलेले भाषण तसेच खुपते तेथे गुप्ते कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केलेली खंत, आणि त्यावर फडणवीसांनी त्यांच्या सहकाऱ्यांना केलेल्या सूचना, मला मिळालेली माहिती अशी कि ज्या संघ परिवार सदस्यांना आणि भाजपा नेत्यांना व कार्यकर्त्यांना त्यांनी मनात दडवून ठेवलेली अस्वस्थता किंवा सार्वजनिक किंवा वैयक्तिक स्वरूपाची देखील जर काही कामे पेंडींग असतील आणि कार्यव्यस्ततेमुळे जर आपली गाऱ्हाणी आपले मते आपल्या मनातले थेट देवेंद्र फडणवीसांसमोर सांगणे मांडणे शक्य नसेल तर त्याऐवजी या मंडळींनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील किंवा थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दोघांची अगदी भेटीची वेळ न ठरविता सुद्धा त्यांच्याकडे नेमके बोलून सांगून मोकळे व्हावे, पुढल्या काही दिवसात त्यांना भेटणाऱ्यांना नक्की न्याय मिळेल मिळावा स्वरूपाच्या सूचना या मंडळींना प्राप्त झाल्याची माझी माहिती आहे आणि असे घडले तर मला चंद्रकांतदादा आणि बावनकुळे या दोघांच्याही काम करण्याच्या पद्धती पाठ असल्याने, बहुसंख्य कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ नक्की दूर होईल. ज्याची नक्की गरज होती ते घडले, चांगले झाले….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी