मी शांत याचा अर्थ मी गांडू नाही अस्वस्थ आहे
माझ्याकडे दिवसभरात भ्रष्ट्राचाराची जशीच्या तशी घडलेली प्रकरणे अनेक येतात, शेकडोंनी पडलेली आहेत, ती जशी माझ्याकडे येतात त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी ती किरीट सोमय्या यांच्याकडे येतात माझ्याकडे तर किरीट सोमय्यांची देखील प्रकरणे येतात पण तरीही या राज्यावर या राष्ट्रावर आणि भाजपावर किरीट सोमय्या यांचे उपकार आहेत त्यांना आपण कायम गुण दोषांसहित स्वीकारलेच पाहिजे. त्याची नेमकी कारणे देखील एक दिवस तुमच्या समोर उघड करिन पण आज ती वेळ नाही कारण पुन्हा एकवार 2024 मध्ये मोदी सत्तेवर आले नाहीत तर दुप्पट चौपट दहापट वेगाने या देशातले मुसलमान माजतील आणि आपण हिंदू सारे गमावून बसू म्हणून ज्यांना ज्यांना हिंदू असल्याचा अभिमान आहे अशा कोणत्याही जातीच्या मतदाराने यावेळी मोदी यांच्या पाठीशी उभे असणे त्यांना मतदान करणे अत्यावश्यक आहे. मी नक्की अस्वस्थ आहे, पण पुढल्या लोकसभा आणि विधान सभा निवडणुका पार पडेपर्यंत निदान मला तरी या राज्यात जी समांतर यंत्रणा आहे जी हे राज्य मोठ्या खुबीने चालविते आहे ज्यात फक्त आणि फक्त या राज्यातले सरकारी, शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी व काही कर्मचारी आणि मूठभर दलाल सामील आहेत जे या राज्यातल्या दरवेळीच्या कोणत्याही पक्षातल्या सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून त्यांना विकत घेऊन त्यांना वाईट सवयी लावून त्यांना ताब्यात घेऊन हे जे राज्य हे जे राष्ट्र अक्षरश: नागडे करून उध्वस्थ करून स्वतः केवळ श्रीमंत होण्यात विकृत आनंद घेताहेत, त्या समांतर यंत्रणेला मी नक्की एक दिवस उध्वस्थ करून सोडेन आणि त्यासाठी मला फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीच्या पाठिंब्याची गरज आहे कारण त्याचा पाठिंबा मग मी समोर चवताळलेला भुकेला वाघ जरी आला तरी त्याला क्षणार्धात ठार मारून मोकळा होईल थोडक्यात अशा नरभक्षक पद्धतीच्या या यंत्रणेत सामील असणाऱ्यांना उध्वस्त करून नक्की मोकळा होईल…
www.vikrantjoshi.com
जे अजित पवारांच्या क्षणार्धात लक्षात आले काकांची जी मोठी खतरनाक चाल पुतण्याने एका क्षणात ओळखली आणि अजित पवार सावध झाले त्यांनी पुढले बंड तर केलेच पण त्या बंडाची फार पूर्वीपासून आधी तयारी केली समांतर राष्ट्रवादी अगदी काकांच्या डोळ्यादेखत त्यांना दाखवून देत उभी केली नेमकी काकांची हि गहिरी चाल घराबाहेर त्याआधी कधीही किंवा फारसे बाहेर न पडणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या ती लक्षात आली नाही आणि अजित पवार वाचले पण उद्धव ठाकरे फसले आणि त्यातून ते जवळपास राज्याच्या राजकारणातुन निदान पुढले काही वर्षे तरी संपले वरून त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे म्हणजे आदित्य आणि तेजस यांचे मोठे राजकीय नुकसानही करून ठेवले ज्याची कधी गम्मत वाटते तर कधी मनापासून वाईट वाटते. प्रत्येकाचा सल्ला धुडकावून लावायचा प्रत्येकाला कस्पटासमान मानायचे तसे वागायचे त्यातून उद्धव ठाकरे यांच्यावर हे राजकीय संकट ओढवले. रविवार 9 जुलै रोजी दैनिक लोकसत्तेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा एक अभ्यासू वाचनीय दीर्घ माहितीपूर्ण लेख छापून आलाय त्यावर पुढे मी कधीतरी नक्की उहापोह करणार आहे पण त्यातला एक मुद्दा येथे यासाठी घेतो कि त्यावरून काकांच्या बेरक्या चालीवर अजित पवार कसे सावध झाले आणि राजकारणातून बरबाद उध्वस्थ होता होता कसे वाचले ते नेमके तुमच्या लक्षात येईल. एक ठिकाणी पृथ्वीराज लिहितात कि अजित पवार यांनी जो फार मोठा सिंचन घोटाळा केलेला आहे केलेला होता त्या सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्यांच्या पुराव्यावर जी गंभीर अशी पोलीस चौकशी लावण्यात आली त्या चौकशी करण्याच्या आदेशावर त्यावेळेच्या गृहमंत्री आर आर पाटील यांनी शरद पवार यांच्याच आदेशावरून सूचनेवरून सांगण्यावरून सही केली, विशेष म्हणजे हे पुरावे जमा करण्यात शरद पवार यांचा मोठा हात होता आणि हे जेव्हा अजित पवार यांच्या लक्षात आणून दिल्या गेले तेव्हा काका आणि पुतण्यामध्ये मोठी वादावादी नव्हे तर चांगलीच खडाजंगी झाली आणि तेव्हाच अजित पवार काका शरद पवार यांच्यापासून मनापासून दूर गेले आणि प्रति राष्ट्रवादी उभी करण्याच्या तयारीला लागले…
महाराष्ट्रात त्या भारतीय जनता पक्षावर जर सर्वाधिक उपकार कोणी करून ठेवले असतील तर ते फक्त आणि फक्त शरद पवार यांनी म्हणजे त्यांनी अजित पवार यांना आपल्यापासून दूर केले पुढे हेच अजितदादा त्यामुळे भाजपाच्या गळाला लागले आणि ज्या उद्धव ठाकरे यांची नेमकी महत्वाकांक्षा त्यांची तीव्र इच्छा त्यांचे स्वप्न शरद पवार यांनी ताडले आणि त्यांना आधी सत्ता दिली थेट मुख्यमंत्री केले ज्याला साधे पोहे करता येत नाही त्याला थेट रेस्टारंटची चेन हाती सोपवून ती चालवायला दिली आणि येथेच अननुभवी पोरकट अभ्यासशून्य प्रशासन चालविण्यात कवडीचीही अभ्यास नसलेल्या या उद्धव ठाकरे यांना थेट मुख्यमंत्री करून आधी त्यांना मोठ्या खुबीने उघडे पाडले नंतर नागडे करून त्यांनी राज्यातली सर्वाधिक प्रभावी संघटना ताकदवान शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांना एकाच दगडात संपविले वरून त्या अडीच वर्षात आपल्या पक्षाचे आणि आपल्या नेत्यांचे फार मोठे आर्थिक फायदे करवून वरून उद्धव यांना पार खलास केले बदनाम केले आणि येथे मला शरद पवार हेच दुल्हे राजा या सिनेमातले निदान भाजपासाठी जॉनी लिव्हर वाटले कारण ते तसे सेम वागले. पवारांचे भाजपावर मोठे उपकार झाले कारण जे चतुर अजित पवार यांच्या लगेच लक्षात आले ते नेमके एकलकोंड्या आणि स्वतःला बेरकी बुद्धिमान धाडसी समजणार्या उद्धव ठाकरे यांच्या आजही लक्षात आलेले नाही. एका नटीला एड्स आहे माहित असूनही एक उद्योगपती तिच्याशी कंडोम न वापरता शारीरिक संबंध ठेवत होता ज्यात त्याचा पुढे मृत्यू झाला, उद्धव ठाकरे आजही यापद्धतीने सावध व्हायला तयार नाहीत, त्यांना आणखी स्वतःला आणि त्यांच्या उरल्या सुरल्या शिवसेनेला किती किती संपवून घ्यायचे आहे, समजायला मार्ग नाही कारण अजूनही मातोश्रीचे दरवाजे राजकीय अनुभवी आणि उद्धव प्रेमी मंडळींना बंद आहेत आणि उद्धव त्यात स्वतःला कोंडून आहेत…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी