महाबिलंदर मंत्री, मस्तवाल मंत्रिमंडळ आणि महाजन
माझा हा लेख तुम्ही वाचून संपवता संपवता मला आम्हाला आणि तुम्हाला मंत्रिमंडळ बदल व विस्ताराचे वेध लागलेले असतील, विस्तार नक्की आहे बदल करण्याची घडण्याची शक्यता खूप कमी आहे कारण काही अतीभ्रष्ट नालायक नीच हलकट भरकटलेले बाईलवेडे विकाऊ मंत्री शिंदे मंत्रिमंडळातून हाकलून लावणे तशी राज्याची आणि सत्तेतल्या युतीची महागरज आहे पण गावगुंड असला म्हणून काय झाले त्याच्या मागे मतदार आहेत हा शरद पवार फॉर्म्युला आता साऱ्याच राजकीय पक्षांमध्ये रूढ झाला असल्याने, अमुक एखादा मंत्री किंवा अधिकारी जेवढा अधिक भ्रष्ट किंवा जेवढा अधिक नालायक तेवढी त्याला डिमांड अधिक त्यामुळे ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अनेक मंत्री अजिबात लायक नसतांना देखील त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू मिळण्याची अजिबात शक्यता नाही मात्र पुढल्या काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार मोठ्या प्रमाणात धुमधडाक्यात होईल हि आता काळ्या दगडावरची रेघ आहे. मला वाटते आपल्या या राज्याचा मंत्री किंवा प्रशासकीय अधिकारी होणे हि त्या त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला आणि त्या त्या मंत्र्याला अमरत्व बहाल करणारी नामी संधी त्यांना थेट परमेश्वराने बहाल केलेली असते पण बहुतेकांच्या ते लक्षात येत नाही, त्यातले अगदी बोटावर मोजण्याएवढे नाव आणि पैसेही कमावून मोकळे होतात बहुतेक केवळ पैसा आणि ऐय्याशी मागे लागून थेट नरकाचा रस्ता धरून मोकळे होतात. आर आर आबा पाटील यांचे ग्रामविकास खात्याचे मंत्री म्हणून उत्तम कारकीर्द त्यांनी पार पाडल्यानंतर दुरदैवाने त्यांच्या नंतर त्यांच्यासारखा उत्तम मंत्री ग्रामविकास खात्याला मिळालाच नाही नव्हता बहुतेक नालायक हसन मुश्रीफ म्हणून काम करून मोकळे झाले पण ग्रामविकास राज्याच्या या अतिशय महत्वाच्या खात्याविषयी माझया अनेक वर्षानंतर आशा पल्लवित झाल्या आहेत कारण अति धडपड्या गिरीश महाजन यांच्याकडे शिंदे आणि फडणवीस यांनी या खात्याची धुरा सोपविली आहे. आजही मला आर आर आबा यांची ग्रामविकास मंत्री म्हणून जशीच्या तशी कारकीर्द डोळ्यासमोर उभी राहते किंबहुना ते खर्या अर्थाने ज्यापद्धतीने त्यांनी ग्रामविकास खात्याची धुरा सांभाळली होती त्यानंतरच ते प्रत्येकाच्या गळ्यातले ताईत बनले प्रचंड लोकप्रिय एवढे ठरले कि त्यावेळेच्या खतरनाक अण्णा हजारे यांना देखील आर आर आबा यांच्याशिवाय पण हलत नसे, नेमके तेच आज कित्येक वर्षानंतर अण्णा हजारे यांचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बाबतीत घडते आहे घडले आहे, गिरीशजी अण्णांचे अतिशय लाडके आहेत…
www.vikrantjoshi.com
जे आर आर पाटलांच्या बाबतीत मी अगदी जवळून बघितले न्याहाळले तेच नेमके आज गिरीश महाजन यांच्या बाबतीत घडते आहे म्हणजे ग्रामविकास खात्याचे त्यावेळेचे अभ्यासू आदर्श सचिव सुधीर ठाकरे, उपसचिव वसंतराव कुलकर्णी आणि आबांचे खाजगी सचिव चंद्रकांत दळवी हि आबांची अत्योत्तम टीम हेच आबांच्या यशाचे जसे मोठे गमक होते नेमके आज तेच गिरीश महाजन बाबतीत घडते आहे त्यांचे उत्तम टीम वर्क हेच त्यांच्या यशाचे आणि ग्रामविकास खात्याच्या विकासाचे नेमके गमक आहे अर्थात काळ झपाट्याने बदलला असल्याने महाजन यांच्या टीममधल्या एखाद्या दुसऱ्याचा उद्देश काही प्रमाणात पैसे मिळविणे हा देखील असू शकतो पण दर्जेदार विकास साधणाऱ्यांनी चार पैसे बाजूला काढले तर त्यावर माझे कधीच काही म्हणणे नसते म्हणून तर मी कोट्यवधी कमावून निघून जाणार्या विकास पुरुष माजी प्रशासकीय टी चंद्रशेखर किंवा नितीन गडकरी यांचे नाव कायम कौतुकाने घेत आलोय. आर आर आबा पाटील आणि गिरीश महाजन या दोघांमध्ये मोठा फरक असा कि आबा पूर्णतः ग्रामविकास खात्याला केवळ वाहून घेतलेले मंत्री होते आणि गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांची द्रौपदी आहे तरीही महाजन फ्रेश असतात उत्साही आहेत हेल्दीही आहेत त्यांना आळस ठाऊक नसल्याने ते नक्कीच आर आर पाटलांच्या पंक्तीला नक्की बसणारे आहेत विशेष म्हणजे महाजन हे फडणवीस यांची मोठी असेट आहे आणि त्यांना मी द्रौपदी यासाठी उपमा दिली कि कमी तेथे आम्ही हि भूमिका या गिरीश महाजन यांना ते मंत्री झाल्यापासून असतांना कायम वठवावी लागते लागत आलेली आहे. फडणवीस यांची किंवा युती सरकारच्या कोणत्याही कुठल्याही कठीण क्लिष्ट कामाची कामगिरीची जबाबदारी नेमकी गिरीश महाजन यांच्यावर असते त्यामुळे जेथे राजकीय कामगिरी किंवा संकट तेथे हमखास त्या कामगिरीवर नक्की गिरीश महाजन यांना सतत पाठवावे लागते त्यांना जावेच लागते आणि एवढे करूनही त्यांना आपल्या खात्यात वेगळी आकर्षक कामगिरी करायची असते म्हणून मी वर सांगितले कि त्यांचे टीम वर्क हेच त्यांच्या यशाचे मोठे गमक आहे, कोणा एकाचे नाव घेऊन मला येथे महाजन यांच्या टीमचे कौतुक करणे अशक्य आहे म्हणून त्या साऱ्यांचे कौतुक येथे आवरते घेतो. द्रौपदीच्या भूमिकेत शिरून एकाचवेळी पाच पाच वेगवेगळी आव्हाने स्वीकारणारे गिरीश महाजन, त्यांच्यावर उद्या फडणवीसांनी जर केवळ मंत्रीपद सांभाळ असा हुकूम केला तर याच महाजन यांना वेड लागेल कदाचित ते भर सभेत अशावेळी एकनाथ खडसे यांना वाकुल्या दाखवून मोकळे होतील…
क्रमश: हेमंत जोशी