खिंडीत गाठले, विरोधक फसले आणि अडकले
राज ठाकरे तुम्हाला तो धोका आज नसेल पण उद्या नक्की आहे म्हणजे कुटुंबा पलीकडे जे इतरांचा कधी साधा विचार देखील करीत नाहीत त्या सर्वांचे आज ना उद्या शंभर टक्के गांधी घराणे होते, गांधी नेहरू कुटुंबाने अवाढव्य काँग्रेस जणू आपल्या बापाची मालमत्ता यापलीकडे कधी विचार केला नाही नेमका याउलट भाजपाने विचार केला त्यामुळे हळूहळू काँग्रेसचा वटवृक्ष उन्मळून पडण्याची प्रोसेस अलीकडे झपाट्याने सुरु झाली आहे आणि हे तर नक्कीच आहे कि यापुढेही जर देशातली काँग्रेस सोनिया राहुल प्रियांका आणि त्यांच्या पुढल्या पिढीच्या बाहेर येणार नसेल तर काँग्रेसचे नामोनिशाण मिटायला फारसा उशीर लागणार नाही नेमके हेच आपल्या या राज्यात घडू लागले आहे म्हणून मी राज ठाकरे यांना आजच सावध केले आहे कि अमित राज ठाकरे यांचे राजकारणात येणे आणि पुढे काहीच वर्षात त्यांच्या हाती मनसेची सूत्रे चालून येणे, असे जेथे घडते घडले आहे त्या साऱ्यांचे नक्की वाटोळे झालेले आहे हा आपला इतिहास सांगतो, एखादा राजा पराक्रमी म्हणून त्यांची पुढली पिढी देखील त्या राजाच्या तोडीची असे क्वचित घडते आणि तेथूनच राज घराणे आणि त्यांची सत्ता मातीमोल होण्यास सुरुवात होते जे मातोश्रीवरील ठाकरे यांचे बाळासाहेब गेल्यानंतर काहीच वर्षात घडले आहे, ठाकरे शिवसेनेची बाळासाहेब गेल्यानंतर एवढ्या लवकर छकले पडून बलाढ्य शिवसेना महाराष्ट्रात बऱ्यापैकी धुळीस मिळेल असा साधा विचार देखील अगदी आत्ता आत्ता पाईयंत एकाच्याही मनाला शिवलेला नव्हता पण जे घडायला नको होते ते खूप झपाट्याने घडले कारण पुढल्या पिढीतल्या उद्धव आणि त्यांच्या पत्नीच्या रश्मीच्या अघोरी महत्वाकांक्षा एवढ्या परकोटीला पोहोचल्या कि त्यांनी थेट बाळासाहेब यांच्याच देखत अगदी ठाकरे कुटुंबाची छकले पाडली आणि क्षणिक सुखासाठी अख्खी शिवसेना वेठीस बांधली वरून स्वतःची मोठी नाचक्की करवून घेतली. मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही कि उद्धव आणि रश्मी यांनी ज्या पद्धतीने इतर ठाकरे कुटुंब देशोधडीला लावले, नजीकच्या काळात जर आदित्य आणि तेजस या दोघांपैकी त्यातले एक जर जयदेव निघाला म्हणजे आई बापाच्या हाताबाहेर गेला तर हेच ते उद्धव आणि रश्मी, न ऐकणार्या पोटच्या मुलाचा देखील जयदेव करून मोकळे होतील किंवा राज ठाकरे बाबतीत जसे घडले त्याच पद्धतीने त्यातल्या एकाला थेट घराबाहेर काढून मोकळे होतील आणि जे कानावर पडते त्यावरून जोशी म्हणून भविष्य वर्तवितो कि दोघांपैकी एकाला नक्की बाहेर पडावे लागणार आहे…
www.vikrantjoshi.com
काँग्रेस पद्धतीने जे वागले म्हणजे ज्या पक्षाचे प्रमुख किंवा पक्ष उभे करणारे आपल्या कुटुंबा पलीकडे विचार न करते झाले त्यात एक आता एकदम हॉट सीटवर शरद पवार आहेत म्हणजे शरद पवार यांची गेली अनेक वर्षे सारी धडपड केवळ सुप्रिया सभोवताली आहे आणि नेमके हे अजित पवार या त्यांच्या अति महत्वकांक्षी पुतण्याने ओळखल्याने जे गांधी ठाकरे घराण्याचे व त्यांच्या पक्षाचे झाले त्यापेक्षा कितीतरी अधिक झपाट्याने आता राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचे होऊ लागलेले आहे, आता पवारांनी यापुढे कितीही प्रयत्न केलेत तरी त्यांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीला काचेसारखा तडा गेला आहे जो काहीही केले तरी पुन्हा जोडणे अशक्य आहे. आता तर मी तुम्हाला खास गोटातून मिळालेल्या माहितीतून सांगतो कि शरद पवार यांनी आपला हा पक्षांतर्गत पराभव मान्य करून अजित आपला नाही हि खूणगाठ बांधून ते मोकळे झाले आहेत म्हणून त्यांनी सुप्रिया यांच्या सोबतीला मनातून फारशी इच्छा नसतानाही रोहित पवार यांनी घेतले आहे जोपर्यंत सुप्रिया यांची कन्या राजकारणात तयार होत नाही तोपर्यंत रोहित पवार यापुढे सुप्रिया संगतीने राष्ट्रवादीचा किल्ला लढतांना दिसतील, जे स्वप्न नेमके रोहित यांचे आई वडील बघत होते. पण पुन्हा तेच कि पवार आणि राष्ट्रवादी दोघेही राजकीय दृष्ट्या खड्ड्यात चालले असतांना देखील शरदरावांचे देखील तेच कि ते आपल्या कुटुंबांपलीकडे विचार करायलाच तयार नाहीत अगदी जयंत पाटील आणखी कितीही वेळा धाय मोकलून रडले तरी. प्रकाश आंबेडकर असोत वा राज ठाकरे, बलाढ्य उद्धव असोत अथवा अति बलाढ्य शरद पवार आणि अजितदादा देखील जर लायक नसलेल्या पार्थ यांचाच विचार या पद्धतीने जो तो पुढे रेटणार असेल तर या साऱ्यांचे नेतृत्व कुपमंडु वृत्तीचे असल्याने त्या सर्वांचे राजकीय आयुष्य नक्की दीर्घायुषी नाही नसेल…
क्रमश: हेमंत जोशी