अशी हि बनवाबनवी फसवाफसवी आणि लपवाछपवी
लबाड संधीसाधू ढोंगी नेत्यांना कायम मांजरीच्या डोळे मिटून दूध पिण्याच्या भूमिकेचे समर्थन करायला आवडते पण ज्यांच्या हाती मतदान रुपी काठी आहे असते ते या राज्यातले समस्त मतदार अतिशय चाणाक्ष चतुर हुशार असतात हे नेत्यांच्या लक्षात दुर्दैवाने येत नाही मग त्या त्या वेळी या मतदारांची मतदान रुपी काठी अशा नेत्यांच्या ढुंगणावर बसली कि मग त्यांची नाठाळ वृत्ती भानावर येते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. शरद पवारांनी जेव्हा ज्याक्षणी राजकीय निवृत्तीची घोषणा केली त्यावेळी तरी त्यांनी निदान सभोवताली अवतीभोवती चार चांगली माणसे नेते उभे करायचे होते पण आयुष्यभर सत्तेच्या मस्तीत वावरणार्या पवारांच्या ते लक्षातच आले नसावे किंवा चार वाईट माणसे नेते अधिकारी सभोवताली ठेवणे हा मला वाटते पवार यांना अंगावरच्या अनमोल अमोल किंमती दागिन्यांसारखा वाटतो, एखाद्या नामचीन दादा गुंड सभोवताली जसे केव्हाही बघा, आठ दहा टगे गुंड आडदांड उभे असतात तेच कायम पवारांचे, क्वचित त्यांनी आर आर आबांसारखे जंटलमन सभोवताली अवतीभोवती उभे केले असतील पण जेव्हा केव्हा शरद पवारांना बघावे, सभोवताली त्यांच्या चांगल्या नेत्यांचा गराडा कधी आढळलाच नाही, कधी छगन भुजबळ तर कधी मजीद मेमन कधी हसन मुश्रीफ तर कधी नवाब मलिक, भ्रष्ट आणि ओवाळून टाकलेले नेते, त्यादिवशी राजकीय संन्यास घेतांना देखील म्हणजे राजकारणाच्या अखेरच्या क्षणी देखील त्यांना बिलगून होते अति भ्रष्ट तुरुंगात जाऊन आलेले वादग्रस्त अनिल देशमुख, पवारांना या अशा नेत्यांचा कायम अभिमान वाटत आलेला पण वर जे म्हणालो, नेमके तेच सत्य कि चाणाक्ष मतदारांचे या अशा दृश्यांवर वृत्तीवर बारीक लक्ष असते, सूक्ष्म निरीक्षण असते. पवारांच्या बाजूला अनिल देशमुख छाप नेते बघून किळस आली…
www.vikrantjoshi.com
ज्या नेत्यांकडे बघून घृणा वाटावी किळस यावी अशा नेत्यांना मोठे करणे यापुढे शरद पवार किंवा अन्य राजकीय पक्षांनी देखील थांबवावे, अन्यथा प्रत्येक बड्या नेत्याची आणि त्यांच्या राजकीय पक्षाची अवस्था नंतरच्या काही वर्षात हुबेहूब शरद पवार यांच्याच सारखी होईल, हे अंतिम सत्य आहे त्यात बदल नाही. भाकरी फिरवण्याचा पवार यांनी घेतलेला निर्णय म्हणाल तर अचूक म्हणाल तर कौतुकास्पद, पण भाकरी फिरवतांना जर याच शरद पवार यांनी मागल्या चुका पुन्हा पुढे केल्या म्हणजे त्याच अनिल देशमुख नवाब मलिक वृत्तीच्या नव नेत्यांना पिढ्यांना चुकून संधी दिली तर भविष्यात पवारांचे किंवा त्यांच्या राजकीय वारासदारांचे किंवा त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आहे त्यापेक्षा देखील अधिक अतोनात हाल होतील यात शंका नाही. म्हणजे आदिती तटकरे यांच्यासारख्या महत्वाकांक्षी मेहनती सुस्वभावी तरुण तरुणींना पवारांनी नक्की पुढे नेण्यास हरकत नाही पण दहा पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती बापाने वाममार्गाने मिळविल्या नंतर देखील जर आदिती मंत्री झाल्यानंतर सुनील तटकरे तिच्या कार्यलयात सतत ठाण मांडून बसणार असतील तर पवारांनी केवळ चेहरे बदलले वृत्ती तीच ठेवली, असे म्हणून मतदार पवारांचा अधिक राग करून मोकळे होतील. उत्तम संस्कारांचे तरुण संस्कारी जातीयवादी नसलेले भ्रष्टाचारापासून दूर राहणारे नेते हि केवळ शरद पवार यांचीच नव्हे तर राज्यातल्या प्रत्येक राजकीय पक्षाची ती गरज आहे. यापुढे थोड्याच दिवसात पवार ज्यांच्या हाती पक्षाची उद्याच्या राजकारणाची राज्याची धुरा सोपविणार आहेत त्यातली बहुतांश यादी जी माझया हाती आली आहे ती वाचून पवारांनी फक्त चेहरे बदलले, वृत्ती तीच घाणेरडी, असे म्हणण्याची नक्की पुन्हा आपल्यावर वेळ येणार आहे…
क्रमश : हेमंत जोशी